अनधिकृत बांधकामे कायदेशीर करा
त्यातच पिंपरी- चिंचवड परिसरात अवैध बांधकामांना स्थानिक नेतृत्व पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ठाणे आणि मुंब्रा परिसरात झालेल्या दुर्घटना तसेच अन्य तक्रारी लक्षात घेता ही फार मोठी समस्या असल्याचे सांगण्यात येते ... |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 30 April 2014
मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांत तीन जखमी
सोमाटणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावानजीक एकाच ठिकाणी मंगळवारी तीन वेगवेगळे अपघात झाले. यात टेंपोचालक गंभीर जखमी असून अन्य अपघातांतील पिकअप जीप आणि ट्रक चालक किरकोळ जखमी आहेत. तसेच, लोणावळ्याजवळ एसटीची सर्व्हिस .
PCMC set to extend two BRTS corridors up to city
Two BRTS corridors in Pimpri Chinchwad are likely to be extended to Pune city to provide seamless connectivity between the two cities.
पीसीसीएफतर्फे गुरुवारी माहिती ...
पुण्यामध्ये माहिती अधिकार कट्ट्याचे आयोजन होत असतानाच पिंपरी -चिंचवडमध्ये प्रथमच पिपरी -चिंचवड सिटीझनतर्फे गुरूवारी (दि. 01) निगडी प्राधिकरण सिटीझन फोरमच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त माहिती अधिकार कट्ट्याचे आयोजन निगडी येथे करण्यात आले आहे.
मावळ मतदारसंघात फेरमतदान घेण्याची ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मावळ लोकसभा मतदार संघातील तब्बल 2 लाख 18 हजार 417 मतदारांना मतदान करता आले नसल्याने मावळ लोकसभा मतदार संघात फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांनी केली.
निवडणूक निकाल ‘एलसीडी’वर
पिंपरी : मतदानासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब केला जात असताना, मतमोजणीवेळी निकाल जाहीर करण्यासाठी खर्चिक असूनही अशीच यंत्रणा वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. १६ मे रोजी होणार्या या मतमोजणीचा निकाल दुपारी बारापर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. या वेळी प्रथमच मतमोजणीचा फेरीनिहाय निकाल पाहण्यासाठी मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी एलसीडी स्क्रीन लावले जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली.
जीवरक्षकांना धरणार जबाबदार
पिंपरी : तरण तलावामध्ये दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित जीवरक्षक व कर्मचार्यांवर राहील. त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आदेश महापालिकेच्या क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त सुनील थोरवे यांनी दिले. तसे परिपत्रक काढून सर्व तलावाच्या व्यवस्थापकांना आज स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.
Tuesday, 29 April 2014
टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टचे ऑनलाईन बुकिंग
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे चालविण्यात येणा-या टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टचे ऑनलाईन बुकिंग बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन बुकिंग महानगरपालिकाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडा विभागाचे प्रशासन अधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.
'वायसीएम'मध्ये 1 मे पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी
370 आजारांवर मोफत उपचार मिळणार
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) येत्या 1 मे पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये 370 आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. महापालिकेच्या उर्वरित 7 रुग्णालये व 22 दवाखान्यांमध्ये शहरातील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) येत्या 1 मे पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये 370 आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. महापालिकेच्या उर्वरित 7 रुग्णालये व 22 दवाखान्यांमध्ये शहरातील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी पालिकेच्या क्षेत्रीय समित्यांत ‘महिला राज’
पिंपरी पालिकेतील सहा क्षेत्रीय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडले गेले. सहावी जागा काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने ‘मोठे मन’ दाखवले.
जगताप गटाची बाजी
पिंपरी : महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या (प्रभाग समिती) सभापतिपदाच्या निवडणुकीत सुभद्रा ठोंबरे (अ प्रभाग), शेखर ओव्हाळ (ब), सोनाली जम (क), आरती चोंधे (ड), सुरेखा गव्हाणे (ई) आणि वनिता थोरात (फ) यांची निवड झाली. लोकसभा निवडणुकीत घडलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद या निवडणुकीत उमटले. आमदार लक्ष्मण जगताप सर्मथंकांनी तीन जागांवर बाजी मारली. ब प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीवर मतदानाला सामोरे जाण्याची वेळ आली.
आंब्याच्या किमती आल्या आवाक्यात
पिंपरी : अक्षय तृतीया सणामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. त्यामुळे आंब्याचे भाव घटले असून, तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. अक्षय तृतीयेला सर्वांनाच आंब्याची चव चाखता येणार आहे.
पुुन्हा आपल्याच शाळेत अर्ज भरावा
पिंपरी : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असून, आतापर्यंत एकूण ३५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पुणे शहराचीही संख्या आहे. शहरातील सुमारे १0 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अर्ज स्वीकारले गेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्याच शाळेत अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Monday, 28 April 2014
PCMC comes clean on Durga tekdi drive
Last January, Salunkhe, Garden Superintendent of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), along with his team, started a plastic reduction initiative at Durga tekdi in Nigdi, which is popular among picnic-goers, joggers and children. Saying ...
|
PCMC to make its pools safer
Pune: Against the backdrop of Wednesday's incident where a 30-year-old drowned in one of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation swimming pools, the PCMC administration has planned to reduced the depth of water in its swimming pools to ensure ...
Widening of road near CME begins
Driving through the Dapodi stretch of Pune-Mumbai highway should become easy as the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started widening the road from Phugewadi to the College of Military Engineering.
Nigdi residents put up with stench, litter, stray menace
Waste scattered on vast tracks of defence land adjoining Nigdi and Talawade areas of Pimpri Chinchwad is proving a nuisance for over 60,000 residents who have to live with stench, flies and stray dogs.
Skewed math holding up lifeguard appointments in PCMC
Pimpri: The skewed ratio of people using the swimming pools as compared to the number of lifeguards had resulted in a proposal of appointing more lifeguards at the Pimpri Chinchwad Municipal Corporatio
खुशखबर... पोलीस दलात भरती
पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.
निगडीत गुरुवारपासून छत्रपती व्याख्यानमालेचे आयोजन
निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने 1 ते 5 मे दरम्यान छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
निगडीतील सावरकर सभागृह याठिकाणी गुरूवारी (दि. 01) सायंकाळी सात वाजता पिंपरी -चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.
महिलांसाठी पीएमपीच्या 100 स्पेशल बस
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधून दररोज सुमारे 13 लाख प्रवासी पीएमपीतून प्रवास करतात. त्यात महिलांची संख्या निम्मी म्हणजेच सुमारे साडेसहा लाख इतकी असते. मात्र त्यांच्यासाठी सध्या अवघ्या चार-पाच मार्गांवरच "महिला स्पेशल' बस आहेत.
|
पिंपरीत रामदेवबाबांच्या प्रतिमेला ...
प्रतिकात्मक अंतयात्रा काढली
राहुल गांधी 'हनीमून आणि पिकनिक'साठी दलितांच्या घरी जातात, असे वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू रामदेवबाबा यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने त्यांच्या प्रतिमेला 'जोडा मारो' आंदोलन केले. तर बहुजन सम्राट सेनेने रामदेवबाबांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली.
राहुल गांधी 'हनीमून आणि पिकनिक'साठी दलितांच्या घरी जातात, असे वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू रामदेवबाबा यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने त्यांच्या प्रतिमेला 'जोडा मारो' आंदोलन केले. तर बहुजन सम्राट सेनेने रामदेवबाबांची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली.
शहरातील उद्याने गर्दीने फुलली
पिंपरी : दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असून आज शहरातील तापमान ४0.६ अंश सेल्सीयस नोंदविले गेले. त्यामुळे दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे उकाडयापासून सुटका मिळावी, म्हणून सायंकाळी शहरातील उद्यानांमध्ये अबालवृद्धांची गर्दी दिसून आली. तर दुपारी शहरातील तरणतलावांवर पोहण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
जीवरक्षकांचे खासगी प्रशिक्षण वर्ग
पिंपरी : सार्वजनिक जलतरण तलावामध्ये पोहण्यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्तव्य सोडून जीवरक्षक खासगी प्रशिक्षण वर्ग घेत असल्याचे धक्कादायक बाब पुढे आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत मुलांना प्रशिक्षण देण्यात हे जीवरक्षक अधिक व्यस्त आहेत. यास क्रीडा विभागाचे अधिकारीही सामील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘निमा’ राष्ट्रीय परिषदेत ९00 डॉक्टर सहभागी
पिंपरी : नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशनची (निमा) २0१४ राष्ट्रीय परिषद आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर येथे संपन्न झाली. निमा शहर शाखा व डॉ.डी.वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय आयोजित परिषदेत ९00 डॉक्टर्स सहभागी झाले.
डॉ. डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यकारी संचालक स्मिता जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘निमा’ च्या केंद्रीय शाखेचे कोषाध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, राज्य शाखेचे सचिव डॉ. शैलेश निकम, शहर अध्यक्ष डॉ. सुहास जाधव, सचिव डॉ. उत्तम माटे, डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. ज्योती मुंदरगी, प्राचार्य डॉ. बी.पी. पांडे आदी उपस्थित होते.
डॉ. डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यकारी संचालक स्मिता जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘निमा’ च्या केंद्रीय शाखेचे कोषाध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, राज्य शाखेचे सचिव डॉ. शैलेश निकम, शहर अध्यक्ष डॉ. सुहास जाधव, सचिव डॉ. उत्तम माटे, डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. ज्योती मुंदरगी, प्राचार्य डॉ. बी.पी. पांडे आदी उपस्थित होते.
आकुर्डीत माऊली व्याख्यानमालेचे आयोजन
आकुर्डी येथील माऊली ज्येष्ठ नागरिक संघ आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 4 मे या दरम्यान माऊली व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनंजय काळभोर यांनी दिली आहे.
काळभोरनगरच्या मनपा शाळेची दुरवस्था
काळभोरनगर येथील पिंपरी -चिंचवड महापलिकेच्या शाळेची सुरक्षेबाबत व सर्वाजनिक स्वच्छतेबाबत दुर्दशा झाली आहे. स्थापत्य विभागाची कामे पूर्ण होण्या अगोदर रंगरंगोटी करून बिले लाटणे व त्यावर सह्या करून आर्थि लाभ लाटण्याचा प्रकार होत असून यासर्व प्रकाराला महापालिकेचे शिक्षण खाते जबाबदारआहे असा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केला आहे.
Saturday, 26 April 2014
Shrikar Pardeshi's email hacked
Former PCMC commissioner and State Inspector General of Registration (IGR) Shrikar Pardeshi's email account was recently hacked by unidentified persons.
Police chief asks parents to verify drivers’ details
PUNE: Police Commissioner Satish Mathur has called upon parents to verify the details of the drivers with whom their children travel to and from school.
प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत ...
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळलेली बंडाळी प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत फसफसून वर आली आहे. शेकापच्या लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांनी आज परपस्पर अर्ज दाखल करत राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केले आहे. तर अधिकृत उमेदवारांना सूचक-अनुमोदकच न मिळाल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व सभागृहनेत्यांना दिवसभर कसरत करावी लागली. दरम्यान, सहा पदांसाठी 13 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
पिंपरी चिंचवड आभियांत्रिकी कॉलेजला आयएसओ ९००१-२००८
निगडी प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड इंजिनियरिंग कॉलेजला "टीयुव्ही नॉर्ड" या जर्मन कंपनीने आयएसओ ९००१-२००८ हे गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान केले आहे.
PF ची शिल्लक आता लगेच कळणार
कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून प्रॉव्हिडंट फंडासाठी (पीएफ) किती रकमेची कपात करण्यात आली आणि किती रक्कम खात्यात जमा झाली, याची खातरजमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता वर्षभर वाट पाहावी लागणार नाही.
पिंपरीमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर?
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली बंडाळी पिंपरी महापालिकेच्या प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत उफाळून आली असून, हा पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.
चोवीस कर्मचार्यांना नोटीस
पिंपरी : आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन राबवलेल्या महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला दांडी मारणार्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील २४ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामध्ये १४ बीट निरीक्षक, एक आरोग्य निरीक्षक, दोन लिपिक, ७ आरोग्य मुकादम यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांची वेगळी चूल
पिंपरी : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुकीनिमित्ताने दिसून येऊ लागले आहेत. पक्षनेत्यांनी इच्छुकांना अर्ज देण्याचे आवाहन केले, त्यास जुमानले नाही. शहराध्यक्ष, पक्षनेत्यांशी चर्चा न करता काहींचे परस्पर अर्ज दाखल झाले. ६ जागांसाठी १३ अर्ज आले आहेत. २८ एप्रिलला होणार्या या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिले आहेत.
पथारीवाल्यांचा विरोध; अधिकारी हतबल
पिंपरी : अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई करण्यास येणार्या अधिकारी, कर्मचार्यांच्या पथकाबरोबर छोटे व्यवसायिक हुज्जत घालतात. हातगाडी, पथारीवाल्यांचे नेतृत्व करणारे पुढारी संघर्षाची भूिमका घेतात. त्यामुळे कारवाई करता येत नाही. अशी हतबलता महापालिकेच्या अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.
लोढा यांच्या तडीपारीचा प्रस्ताव रद्द
पिंपरी : चिंचवड येथील स्वरूपा अनिल लोढा यांच्या तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्यात लोढा यांच्यावर गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यासाठी चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्याकडून तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध तडीपार करणे इतपत सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शवागृहातील शीतपेटी कुचकामी
पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या शवागृहातील शीतपेटी तांत्रिक बिघाडामुळे निरूपयोगी ठरू लागली आहे. सुविधा असूनही कामी येत नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
वसंत व्याख्यानमालेचे निगडीत उद्घाटन
यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
Friday, 25 April 2014
Maharashtra govt to reimburse fees from class one
Schools should not collect any kind of fees (brochure, tuition, registration) from parents and must provide free education to children up to primary level.
विशेष स्वच्छता मोहिमेत पाच ट्रक कचरा गोळा
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुरु केलेली विशेष स्वच्छता मोहीम आज (गुरुवारी) वाकड येथे राबविण्यात आली. त्यात अडीच तासात पाच ट्रक कचरा गोळा करण्यात आला.
यावेळी सहआयुक्त पांडुरंग झुरे, सहायक आयुक्त दिलीप गावडे, कार्यकारी अभियंता गुलाब दांगट, शरद जाधव, संदेश चव्हाण, उपअभियंता डी. एस. सोनवणे, सुधीर रत्नपारखी, रामनाथ टकले, विनय ओहोळ, फारुख शेख, रवींद्र पवार, नितीन देशमुख, सहायक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, विनोद बेंडाळे, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, सूर्यकांत मोहिते, अंकुश कोंडे, प्रवीण धुमाळ, संदीप पाडवी, नीलेश दाते, अमित दिक्षीत, गणेश राऊत, विश्वनाथ पाडवी, कुतुवळ, राऊत, मुख्य आरोग्य निरिक्षक रमेश भोसले, अजय जाधव, आरोग्य निरिक्षक रमेश सरोदे, राकेश सौदाई, अतुल सोनवणे, एस. एस. गायकवाड, अंकुश जीटे, संदीप कोतवडेकर यांच्यासह या मेहिमेमध्ये आरोग्य विभागाचे सत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
महापालिकेच्या लेखा विभागात 1863 मुदतबाह्य धनादेश पडून
महापालिकेच्या लेखा विभागात गेल्या चार वर्षापासून तब्बल 1 हजार 863 मुदतबाह्य धनादेश वाटपाअभावी पडून आहेत. धनादेश घेण्यासाठी संबंधित येत नसल्याने लेखा विभागाला मात्र अंदाजपत्रकीय ताळमेळ साधण्यात समस्या निर्माण होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विनोद यांनी क्रेंद्रीय माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. महापालिकेच्या विविध विभागाकडून देयके लेखा विभागाकडे मंजुरीसाठी पाठविली जातात. ही देयके लेखा विभागाकडून तपासून त्यांचे धनादेश काढले जातात. यामध्ये ठेकेदारांच्या हे धनादेश संबंधित कर्मचारी, ठेकेदार अथवा नागरिक हे लेखा विभागातून समक्ष स्विकारतात.
बेडौल, थकलेले, म्हातारे जीवरक्षक
पिंपरी : सुटलेले पोट, बेडौल अशी शरीरयष्टी.. काही पावलांचे अंतर चालत येण्यासाठी ज्यांना दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागेल, असे वयस्कर कर्मचारी महापालिकेच्या तरण तलावांच्या ठिकाणी दिसून येतात. अशा शरीरयष्टीचे जीवरक्षक एखाद्या बुडणार्या व्यक्तीचा जीव कसा वाचवतील? असा प्रश्न त्या ठिकाणी भेट देणार्याला पडल्याशिवाय रहात नाही. चिंचवड येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे तरण तलावांच्या व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, महापालिकेने त्वरित सुधारणा घडवून आणाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जीवरक्षक निरुपयोगी
पिंपरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुटीच्या प्रारंभीच महापालिकेच्या तरण तलावात एकाचा बुडून मृत्यू झाला. पोहायला शिकणार्यांची अमाप गर्दी आणि बेफिकीर जीवरक्षक ही यामागील प्रमुख कारणे आहेत. पण, महापालिका बदलाला तयार नाही. ही यातील शोकांतिका आहे. एका बॅचमध्ये किती जणांना प्रवेश द्यावा. नवोदितांनी किती खोल उतरावे, हुल्लडबाजांना कसे रोखावे, दुघर्टना घडू नये यासाठी कर्मचार्यांनी किती दक्ष राहावे, आणि घटना घडलीच तर हवी असणारी उपचार यंत्रणा तत्काळ कशी उपलब्ध होईल.. याविषयीचे नियम बासनात ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसले.
महावितरणच्या डीपीतून 40 अनधिकृत जोड
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅंप ही मुख्य बाजारपेठ आहे. तेथे होणाऱ्या वीजचोरीची पाहणी "सकाळ'च्या प्रतिनिधीने व छायाचित्रकाराने केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली. एकेका डीपी बॉक्समधून तब्बल पंधरा ते वीस, तर काही ठिकाणी ...
|
शहर, उपनगरातील रिंग रोडचा प्रस्ताव अखेर मार्गी
मध्य पुणे आणि उपनगरांमधील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेला ३५ किलोमीटर लांबीचा रिंग रोड सत्तावीस वर्षांनंतर अखेर मार्गी लागला आहे.
Thursday, 24 April 2014
PCMC areas expand, so do water needs
The population of the twin township has increased from a 2.49 lakh in 1982 to 17.29 lakh as per the 2011 census.
दापोडी-निगडी रस्त्यावर पडणार 3 कोटीचे डांबर!
पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या सात वर्षात निगडी ते दापोडी दरम्यानच्या पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल 337 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. एवढेच नव्हे तर जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नाशिकफाटा चौकात सुमारे 120 कोटी रुपये खर्चून आधुनिक स्वरूपाचा उड्डाणपूल उभारला. त्यामुळे साडेअकरा किलोमीटर लांबीच्या महामार्गावर 457 कोटी रुपयांचा 'महाखर्च' झाला असताना आता महामार्गावरील डांबरीकरण व इतर कामांसाठी 3 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत.
निगडी-देहूरोड रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण
पुणे-मुंबई जुन्या हायवेवर निगडी ते देहूरोड या रस्त्याच्या गेली अनेक वर्षे रखडलेल्या चौपदरी करणाच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. या कामासह या रस्त्यावर सुमारे २८५ कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
वायसीएममधील 'शवागार' तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील 'शवागार' तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद पडले आहे. वारंवार बंद पडणारे शवगार गोरगरीबांसाठी असून नसल्या सारखेच आहे. या शवगारासाठी माफक दर आहेत. इतरत्र रुग्णालयांत आकारले जाणारे अव्वाच्या सव्वा दर गरिबांना परवडणारे नाहीत. प्रशासनाच्या चुकीच्या पध्दतीमुळे शवगाराअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.
पिंपरी आयुक्तांकडून कुदळवाडीमध्ये सफाई - तिसऱ्या दिवशीही मोहीम सुरूच
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी कुदळवाडी परिसरात साफसफाई करून तिसऱ्या दिवशीही साफसफाई मोहीम सुरु ठेवली.
प्रभाग सभापतिपदासाठी उदासीनता
पिंपरी : महापालिकेच्या सहा प्रभाग समितीच्या (क्षेत्रिय कार्यालय) सभापतिपदाची निवडणूक २८ एप्रिलला होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या इच्छुकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याच्या मुदतीत केवळ चारच अर्ज आले असून, प्रभाग समिती सभापतिपदासाठीची उदासीनता त्यातून दिसून आली आहे.
कमी उंचीचे फलाट ठरतायेत प्रवाशांसाठी धोकादायक
पुणे-लोणावळा दरम्यान असणा-या बहुतांश रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लोकलमधून चढणे-उतरणे प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी कमी उंचीच्या फलाटामुळे एका मुलीला आपले दोन्ही हात गमवावे लागल्याची घटना घडली होती. मात्र अजूनही रेल्वे प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही अशी तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
वाबळे यांचा दाखला रद्द
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक संजय वाबळे यांचा कुणबी जात पडताळणीचा दाखला रद्द ठरविणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. २७ जुलैपर्यंत वाबळे यांनी पडताळणी समितीकडे आवश्यक ते पुरावे सादर करून फेरपडताळणी प्रक्रिया करून घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. वाबळे यांच्या जात दाखल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवार योगेश भगवान लोंढे यांनी आक्षेप घेणारा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी झाली असून, या प्रकरणी शेवटपर्यंत न्यायालयीन लढा देण्याची भूमिका लोंढे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अर्जाची मुदत संपणार असल्याची अफवा
पिंपरी : अकरावी वर्ग ऑनलाइन प्रवेशअर्ज भरताना थोडीशी जरी चूक झाल्यास तो स्वीकारला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत काही शाळांचे शिक्षक मार्गदर्शन व सहकार्य करीत नसल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात अर्ज भरण्याची मुदत दहावी निकालापर्यंत नसून ३0 एप्रिलपर्यंतच असल्याची अफवा पसरल्याने अर्ज भरण्यासाठी त्यांची धांदल उडाली आहे.
Wednesday, 23 April 2014
तूट कमी करण्यास एलबीटीचा हातभार
पिंपरी : मार्चअखेर महापालिकेला एलबीटीचे ८६0 कोटींचे उत्पन्न मिळाले. परंतु जकात उत्पनाच्या तुलनेत ३00 कोटींची तूट होणार हे स्पष्ट झाले होते, परंतु मार्च ते २0 एप्रिलपर्यंतच्या एलबीटी उत्पन्नाची आकडेवारी पहाता, ६४ कोटींचे मिळालेले उत्पन्न तूट भरून काढण्यास काही अंशी पूरक ठरणारे आहे.
"फेरीवाल्यांचे कारवाईत जप्त करण्यात आलेल्या टप-या, हातगाड्या परत कराव्यात
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या टप-या, हातगाड्या परत कराव्यात, अशी मागणी फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींनी फेरीवाला शहर समितीच्या बैठकीत केली.
दापोडीच्या आई उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
दापोडी येथील नव्याने विकसित झालेल्या आई उद्यानाची दुरवस्था होत आहे. उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीच्या कामात दुर्लक्ष तसेच दिरंगाई होत असल्यामुळे हे उद्यान भविष्यात चांगले राहण्याच्यादृष्टीने त्याची योग्य प्रकारे निगा राखली जावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे.
चार हजाराची लाच घेताना प्रकल्प ...
रुग्णाच्या नातेवाईकाकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयातील राजीव गांधी आरोग्य योजनेच्या प्रकल्प समन्वयकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचा-यांनी रंगेहाथ पकडले. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली.
पोलिसी पाठलाग ३ महिन्यांनी यशस्वी
पिंपरी : पिंपरीतील एच. ए. मैदानावर तीन महिन्यांपूर्वी राहुल दिनेश सपकाळ (वय २४, रा. गांधीनगर, झोपडपट्टी, पिंपरी) या तरुणाचा गोळी झाडून खून करणार्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे.
योगेश राजाराम कदम (वय २३, रा. शिंगटे चाळ, नेहरूनगर, पिंपरी) व अश्पाक नबीलाल मेवेगार (रा. कामतारा कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार धमेंद्र सुबोध चौधरी हा फरार आहे. कदम व मेवेगार यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
योगेश राजाराम कदम (वय २३, रा. शिंगटे चाळ, नेहरूनगर, पिंपरी) व अश्पाक नबीलाल मेवेगार (रा. कामतारा कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार धमेंद्र सुबोध चौधरी हा फरार आहे. कदम व मेवेगार यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तळेगाव दाभाडे, कात्रज मार्ग बंद
किवळे : तळेगाव दाभाडे - कात्रज (मार्ग क्रमांक २२८) या मार्गावरील बसच्या फेर्या गेल्या दोन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्यामुळे देहूरोड, विकासनगर, किवळे वडगाव व तळेगाव भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपी प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. तर नवीन बस आल्यानंतर बस मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये ‘हॉटलाईन’ यंत्रणा उभारण्याची गरज
पुणे : रिक्षाचालक शहरात सर्वत्र वावरत असतात. त्यांचा अनेक नागरिकांशी थेट संबंध येतो. तसेच, समाजात घडणार्या घडामोडींची माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती रिक्षाचालकांनी पोलिसांना पुरवावी. त्याकरिता पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये ‘हॉटलाईन’ यंत्रणा उभारणे गरजेचे आहे, असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी व्यक्त केले.
पाणीकपातीला खासदार बाबर यांचा विरोध
पाटबंधारे खात्याच्या कुठल्याही सूचना नसताना महापालिकेने शहरातील ठराविक भागामध्ये पाणी कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला खासदार गजानन बाबर यांनी आक्षेप घेतला असून पाणी कपातीला विरोध दर्शविला आहे.
यासंदर्भात खासदार बाबर यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून 2 टीएमसी जादा पाणीसाठी आहे. त्यामुळे पुणेकर आणि खडकवासला कालव्यावरील शेतीलाही यावेळी पाणीटंचाईची झळ बसणार नाही, असे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.
आयुक्तांची सलग दुस-या दिवशी स्वच्छता मोहिम
महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये आयुक्त राजीव जाधव सलग दुस-या दिवशी सहभागी झाले. बिजलीनगरकडून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या चिंचवडेनगर रस्त्याच्या कडेचा परिसर, प्लास्टिक व इतर कच-यामुळे व्यापून गेला होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमध्ये या परिसराने मोकळा श्वास घेतला.
Tuesday, 22 April 2014
बीआरटीएस लेन सुरक्षित करावी
पिंपरी : बीआरटीएस मार्गिका (लेन) सुरू करण्यापूर्वी महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे अद्याप लावली नसल्याने मार्गिका धोकादायक ठरत आहे. यातूनच पिंपरीतील एच.ए. कंपनीसमोर एक कार बीआरटीएस ‘लेन’ला धडकून नुकताच अपघात झाला.
झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे अद्याप लावली नसल्याने मार्गिका धोकादायक ठरत आहे. यातूनच पिंपरीतील एच.ए. कंपनीसमोर एक कार बीआरटीएस ‘लेन’ला धडकून नुकताच अपघात झाला.
पिंपरी शहरात अर्धा तास मुसळधार पाऊस
पिंपरी - शहरास सोमवारी (ता. 21) सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधा उडाली. काही ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळित झाली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ...चिंचवड स्टेशन येथेही झाड पडले ...
|
पिंपरीत पिस्तुलधारी टोळक्याचा राडा
सशस्त्र टोळक्याचा गोळीबार, तोडफोड आणि दहशत
काळेवाडी येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी काल (रविवारी) पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये सुमारे 30-35 जणांच्या टोळक्याने तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवत हवेत गोळीबार केला. तसेच तिथल्या काही वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर या टोळक्यातील काहींनी आज (सोमवारी) पुन्हा याच ठिकाणी दहशत माजवली. लहान मुले व नागरिकांच्या डोक्याला पिस्तुल लावून आणि वाहनांची तोडफोड करीत राडा केला. दरम्यान, हा सगळा प्रकार अंतर्गत टोळीवादातून घडला असून, गुन्ह्यात पिस्तुल असले तरी या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
बजाज व्यवस्थापन व कामगार संघटनेतील ...
बजाज ऑटो कंपनीतील कामगार प्रश्नावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे बजाज ऑटो कामगार संघटना आणि व्यवस्थापनातील वाद विकोपाला गेले आहेत. व्यवस्थापनाने आरोप थांबवून कामगारप्रश्नी बैठक बोलवावी अन्यथा कामगारांमध्ये उद्रेक होईल, असा इशारा विश्व कल्याण कामगार संघटनेने दिला आहे.
१५ डब्यांची लोकलसेवा कागदावरच
पुणे-लोणावळा दरम्यान लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने या मार्गावर १५ डब्यांची लोकलसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मुख्यालयाकडे पाठवला असला, तरी त्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
चार लाख नागरिकांना मतदानाची संधी द्या
वालचंदनगर : पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, बारामती व शिरूर या चार मतदारसंघांतील मतदानापासून वंचित राहिलेल्या सुमारे चार लाख मतदारांना मतमोजणीपूर्वीच मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी. हक्कापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी वालचंदनगर नागरी हक्क कृती समितीचे निमंत्रक अतुल तेरखेडकर यांनी केली आहे.
मतदान न करणार्यांची नावे जाहीर करावीत
किवळे : यंदा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी अनेक मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाकडे पाठ फिरविली. मतदान करणार्या सर्व मतदारांची नावे निवडणूक आयोगाकडे आहेत. त्यामुळे मतदान न करणार्या सर्व मतदारांची नावे आयोगाने जाहीर करावीत. तसेच मतदान न करण्याचा कारणांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
उन्हाळा आला ! पोहायला चला !!
हिवाळ्यात तंदुरुस्तीसाठी भल्या सकाळी 'मॉर्निंग वॉक' करणारी व जीममध्ये जाऊन एक्सरसाईज करणा-या तरुणाईची पावले आता उन्हाळ्यात पोहण्याच्या तलावाकडे वळत आहेत. त्यामुळे वर्षभर तुरळक गर्दी असणारे शहरातील जलतरण तलाव गेल्या आठ दिवसांपासून पोहणा-यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
आंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हरिव्दार येथे 25 ते 27 एप्रिल दरम्यान या स्पर्धा होणार आहेत.
यामध्ये प्रणव सोरटे (धावणे), प्रणव जाधव,श्वेता घोलप (गोळा फेक) यांची 14 वर्षे वयोगटातून तर ओंकार भोसले (उंच उडी), शुभम ताम्हाणे (थाळी फेक) यांची 16 वर्षे वयोगटातून आंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांची निवड पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून करण्यात आली आहे.
विशेष स्वच्छता मोहिमेत आयुक्तांनी उचलला कचरा
वेळ सकाळी आठची..., विशेष स्वच्छता मोहिमेचा पहिला दिवस..., आकुर्डी रेल्वेरुळालगतच्या मोकळ्या प्लॉटपासून मोहिमेची सुरुवात होणार होती..., आयुक्त राजीव जाधव तेथे आले आणि थेट कचरा उचलायला सुरुवात केली..., आयुक्तच 'ऑन फिल्ड' उतरल्याचे पाहून त्यांच्यासोबतचा अधिका-यांचा फौजफाटाही कामाला लागला..., अन् पाहता-पाहता दोन तासातच दोन ट्रक कचरा गोळा झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आजपासून विशेष स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. प्रशासकीय कामकाजावर कोणताही ताण पडू नये यासाठी कार्यालयीन कामकाज सुरु होण्यापूर्वी सकाळी आठ ते दहा अशी वेळ निवडण्यात आली आहे.
विनापरवाना विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थांची तपासणीची मागणी
नागरिकांच्या आरोग्यास असलेला धोका टाळण्यासाठी विनापरवाना विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी पर्यावरण संवर्धन संस्थेने महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात विनापरवाना खाद्यपदार्थ विकणारे मोठय़ा प्रमाणात वावरताना दिसत आहेत. नागरिकांना अशास्त्रीय पद्धतीने कुल्फीसारखे पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे विशेषत: लहान मुले आजारी पडू लागली आहेत.
Monday, 21 April 2014
Restricted water supply in PCMC areas from today
All areas in Pimpri Chinchwad will face water cuts once a week in the evening to ensure equitable supply.
Commuters want FOB, subway to cross Nashik Phata chowk
Pedestrians and commuters using the Nashik Phata chowk on the Pune-Mumbai highway have demanded facilities that will help them cross the busy chowk safely.
क्षेत्रीय अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक
प्रशासकीय प्रभाग रचना रद्द करून अस्तित्वात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदासाठी येत्या शुक्रवारी (दि. 25) निवडणूक घेण्यात येणार आहे. 'मिनी महापौर' म्हणून ओळखल्या जाणा-या क्षेत्रीय अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
सुरक्षा उपाययोजनांअभावी बीआरटीएस मार्गिका धोक्याची
झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, वाहतुकीचे सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे आदींअभावी बीआरटीएस मार्गिका (लेन) धोकायदायक ठरत आहे. पिंपरीतील एच.ए. कंपनीसमोर एक कार बीआरटीएस 'लेन'ला धडकून नुकताच अपघात झाला. महापालिकेने त्याची वेळीच दखल घेवून सुरक्षा विषयक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
विशेष स्वच्छता मोहिमेसाठी आयुक्तांचा पाहणी दौरा
स्वच्छ-सुंदर शहर ठेवण्यासाठी महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त आणि संबधित अधिकारी 21 ते 26 एप्रिल या कालावधीत मोकळी जागा, पुलाखालचा परिसर, नदीच्या कडेचा परिसर, रल्वे परिसर आणि नियमितपणे स्वच्छता होत नसलेल्या परिसराची पाहणी केवी जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिली आहे.
आठवड्यातून एक वेळ शहराचा पाणीपुरवठा बंद
पिंपरी : पाणी समस्येबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून त्यावर उपाययोजना म्हणून आठवड्यातून एकदा काही भागातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या आणखी गंभीर होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा वेळापत्रकात महापालिकेने बदल केले आहेत. त्यामुळे काही भागात दोनऐवजी एकचवेळ पाणीपुरवठा होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार २१ एप्रिलपासून पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
वाहतूक पोलिसाला धमकवणा-या दोघांना अटक
वाहतूक पोलीस कर्मचा-याला शिविगाळ करून त्याची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. वाकड पोलीस चौकीसमोर शनिवारी (दि. 19) दुपारी हा प्रकार घडला.
भोसरी उत्सवाला रंगतदार कुस्त्यांची जोड
भोसरीत सुरू असलेल्या श्री भैरवनाथ उत्सवाला आज (रविवारी) तळ्याकाठी झालेल्या कुस्त्यांनी रंगत आणली. राज्यातील विविध आलेल्या मल्लांच्या रंगतदार लढतींचा भोसरीकरांनी आनंद घेतला. भोसरीत झालेल्या या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आंबा पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’ वापरल्यास कारवाई
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड येथून पुण्यात येणारा कच्चा आंबा कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने (एफडीए) दिला आहे.
नंबरप्लेटवर अक्षरांचा खेळ
रहाटणी : वाहनांवरील आरटीओ नोंदणीच्या ‘नंबरप्लेट’वरील आकडे अक्षरांसारखे रेखाटण्याची क्रेझ वाढत आहे. आकड्यांमधून कुणी नावाची जुळणी करतोय, तर कुणी आडनावाचा रूबाब दाखवतोय. आकडे ‘फॅन्सी’ पद्धतीने रेखाटत काहींनी ‘लव्ह’ साकारलंय, तर देवतांची नावं टाकून काही श्रद्धेचे प्रदर्शन घडविण्याचा प्रयत्नकरीत आहेत. त्यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटवर आकड्याऐवजी अक्षरांचा खेळ दिसून येत आहे. हे नियमबाह्य असूनही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
‘डेटा एंट्री’चे काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाका
सदोष मतदारयादीबाबत संबंधित अधिकारी आणि डेटा एंट्री करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
भोसरीच्या काळभैरवनाथाची यात्रा उत्साहात सुरु
पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही मेट्रोसिटी म्हणून होत आहे. परंतु मेट्रोसिटी होत असली तरी येथील परंपरा टिकून आहे. भोसरीतील काळभैरवनाथाची जत्रा देखील याला अपवाद नाही. यंदा ही जत्रा 17 व 18 एप्रिल रोजी होती. परंतु 17 तारखेला लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने ग्रामस्थांनी ही जत्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आज (शनिवारी) सकाळी या जत्रेस सुरूवात झाली.
चापेकर बंधु स्मृतिदिनानिमित्त अभिवादन फेरी
क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या 115 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 18) चिंचवड येथे अभिवादन फेरी काढण्यात आली. या अभिवादन फेरीमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चापेकर बंधूंच्या अभिवादन फेरीची सुरूवात क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिरापासून करण्यात आली तर फेरीचा समारोप क्रांतीवीर चापेकर वाडा येथे झाला. अभिवादन फेरीमध्ये क्रांतिवीर चापेकर बंधुंची वेशभूषा केलेली मुले उभी करण्यात आली होती. प्रामुख्याने क्रांतिवीर बाळकृष्ण चोपेकर बालक मंदीर, क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यालय, खिंवसरा पाटील विद्या मंदिर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, पुनरूत्थान समरसता गुरूकुलम्, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, राजर्षी शाहू महाराज अभ्यासिका आदी शाळांनी सहभाग घेतला होता
Saturday, 19 April 2014
Flyover to come up at Sangvi phata
Joint city engineer Rajan Patil said, "The civic body is developing a 14-km Sangvi-Kiwale Road which starts from Mukai chowk in Kiwale to Rajiv Gandhi bridge on Mula river in Sangvi as a BRTS route.
उन्हाच्या तडाख्यातही फुलझाडे तरारणार
पिंपरी : कासारवाडी, नाशिक फाटा चौकातील उद्योगपती भारतरत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाणपुलाच्या हिरवळ टिकविण्यासाठी कुपनलिका खोदण्यात आलीे. त्या पाण्यातून सुशोभीकरण्यासाठी लावलेली रोपे व हिरवळ टिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुलाचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटल्यानंतर महापालिका प्रशासनास जाग आली आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा ‘लालफिती’च्या कारभाराचा प्रकार असल्याची चर्चा होत आहे.
अजित पवारांना दमदाटी भोवणार
‘सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावाचा पाणीपुरवठा तोडून टाकेन..’, बारामती लोकसभा मतदारसंघातील मुर्टी-मासाळवाडी गावातील मतदारांना दिलेली ही धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भोवण्याची चिन्हे आहेत.
मतदान ६0.१६ टक्के
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान शांततेत झाले. या मतदारसंघात ६0.१६ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली. एकूण १९ लाख ५२ हजार २0८ मतदारांपैकी ११ लाख ७४ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ४६ हजार ९८९ इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या ५ लाख २७ हजार ४७५ इतकी आहे. मतदान यंत्रातील बिघाडाव्यतिरिक्त या मतदारसंघात बोगस मतदान व अन्य तक्रारी आल्या नाहीत.
क्रांतीवीर दामोदर हरि चापेकर
आज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन ! इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने, प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणार्या या क्रांतिकारकाविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख प्रपंच !
दामोदर हरि चापेकर यांचे घराणे मूळचे कोकणातील वेळणेश्वरचे; मात्र त्यांचे पूर्वज पुण्याजवळील चिंचवडला येऊन स्थायिक झाले. तेथेच 25 जून 1869 रोजी दामोदरपंतांचा जन्म झाला. लहानपणापासूनच दामोदरपंत, त्यांचे दोन्ही बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव यांचा ओढा हिंदुस्थानला परदास्यातून मुक्त करण्याकडे होता. क्रांतीकार्याची आवश्यकता म्हणून ते प्रतीदिन बाराशे सूर्यनमस्कार घालीत, तसेच एका तासात अकरा मैल पळण्याचाही वेग त्यांनी प्राप्त केला होता !
मिस्ड कॉल द्या... ‘HIV’ची माहिती घ्या
‘एचआयव्ही’ म्हणजे काय...? एचआयव्हीची लक्षणे नेमकी काय...? हा आजार कसा रोखता येईल... यासारख्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत? मग संवाद हेल्पलाइनने सुरू केलेल्या मोबाइल क्रमाकांवर ‘मिस्ड कॉल’ द्या... आणि सर्व माहिती मोफत मिळवा..
डॉ. श्रीकर परदेशी यांचा ‘ई-मेल’ हॅक झाल्याचे उघड
राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाचे महासंचालक डॉ. श्रीकर परदेशी यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
खर्चात नार्वेकर आघाडीवर
पिंपरी : निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या र्मयादेत उमेदवाराने खर्च करणे अपेक्षित असते. ‘मावळ’मधील उमेदवारांनी खर्चाला हात सैल केल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांनी सर्वाधिक २६ लाख ९३ हजार ४९१ रुपये खर्च केला, तर अपक्ष उमेदवार वैशाली बोर्डे यांनी सर्वांत कमी १३, ७७0 रुपये खर्च केला.
महापालिका कर्मचारी सुटीवर
पिंपरी : मतदान होताच गुड फ्रायडे, नंतर लगेच आलेली रविवारची सुटी याची सलगता लक्षात घेऊन सुटीचे नियोजन केलेले महापालिकेचे काही कर्मचारी गुरुवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपताच बाहेरगावी निघून गेले. कालपर्यंत थोडीफार दिसून येणारी वर्दळही संपुष्टात आली. वाहनतळ रिकामे होते. शिवाय महापालिका इमारतीत सुरक्षारक्षकांशिवाय कोणीच दिसून आले नाही.
Friday, 18 April 2014
A village for IT wallahs
Sunil Bhore's blue two-storey house lies 16 km from Pune at Hinjewadi, in stark contrast with the MNC buildings that line the main road. For a decade ... So if the poor of Hinjewadi fall sick, we have to run to Pimpri—10 kilometres away,” Ganesh Kolte ...
From Shanghai to Chinchwad to cast his vote!
PIMPRI: Sriram Rajangam, purchase manager of a multinational company actually flew in from Shanghai to Chinchwad just to cast his vote.
आधी मतदान मग लग्नाची देव-देव...!
कालच त्यांचे लग्न झाले..., लग्नानंतरचा पहिला दिवस त्यांच्यासाठी देव-देव करण्याचा...परंतु, हळदीच्या ओल्या अंगाने ते थेट मतदान केंद्रात आले...मतदान करुन मगच गावाकडे गेले...हा आदर्श ठेवला आहे प्राधिकरणातील श्रध्दा व हर्षद पाटील या नवदाम्पत्याने.
शर्टला इस्त्री अन् पॅटीस फ्री !
मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदान न करणा-या व्यक्तींना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. सोशल मिडीयाद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता यामध्ये विविध व्यावसायिकांनीही मतदारांना आकृष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेच्या वतीने मतदान करा आणि एक शर्ट मोफत इस्त्री करून घ्या अशी योजना जाहीर केली. तर न्यू पुना बेकरीतर्फे मतदान करणा-या नागरिकांना दोन पॅटीसच्या खरेदीवर एक पॅटीस फ्री देण्याची ऑफर देऊ केली. या दोन्ही योजनांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
'एमपीसी न्यूज'च्या 'टीम'चे शंभर टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या वार्तांकनाची सकाळी सहा वाजल्यापासून लगबग असताना आमच्या 'एमपीन्यूज'च्या 'टीम'ने शंभर टक्के मतदान केले.
'एमपीसी न्यूज'ने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. एकीकडे ही जनजागृती करताना दुसरीकडे शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प आमच्या 'न्यूज टीम'ने केला होता.
पिंपरी-चिंचवडमध्येही गोंधळ
‘मतदार ओळखपत्र आहे… गेल्या अनेक वर्षांपासून मतदान करीत आहे… मात्र, या वेळी मतदार यादीतूनच नाव वगळले आहे. त्यामुळे तीव्र इच्छा असूनही मतदानापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवली आहे आणि आम्हाला हक्क बजावता आलेला नाही,’ अशा प्रतिक्रिया मावळ लोकसभा मतदारसंघातील काही मतदारांनी गुरुवारी व्यक्त केल्या.
‘फॉर्म ४-६’ ने चोळले जखमेवर मीठ
‘फॉर्म क्रमांक ४-६’च्या माध्यमातून मतदान करण्याचा हक्क आयत्या वेळेस का होईना मिळेल, अशी आशा पल्लवित झालेल्या पुणेकरांच्या जखमेवर अखेर मीठच चोळले गेले.
Thursday, 17 April 2014
Three detained for distributing money
The Sangvi police detained three persons with Rs 60,000 in Pimple Gurav area on Wednesday.
मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन पिंपळेगुरव मधून तिघे ताब्यात
मतदार स्लिपा वाटत असताना 60 हजार रुपयांची रोकड बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल मावळ लोकसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तीन कार्यकर्त्यांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
.....तर लक्ष्मण जगतापांच्या सभेला गेलो नसतो
राज ठाकरे यांनी लक्ष्मण जगताप यांना पुन्हा फटकारले
शेकापचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप हे अनधिकृत बांधकामांचे समर्थन करीत आहेत, असे आपल्याला माहिती असते तर आपण त्यांच्या सभेलाच गेलो नसतो. आपण एका व्यक्तीसाठी आपली भूमिका बदलू शकत नाही, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप यांना फटकारले. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या या स्पष्टोक्तीमुळे जगताप यांना मोठा हादरा बसला आहे.
उमेदवारांचे सकाळच्या टप्प्यातच ...
सोनाली कुलकर्णीनेही बजावला मतदानाचा हक्क
मावळ लोकसभा मतदार संघातील मतदानाला 2185 केंद्रांवर आज (गुरुवारी) सकाळी सात वाजता शांततेत सुरुवात झाली. सकाळीच मतदान करण्याकडे बहुसंख्य मतदारांचा कल दिसून येत आहे.
मतदानासाठी 'ते' येणार चीनहून चिंचवडला
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असताना चीनमध्ये नोकरी निमित्ताने स्थलांतरीत झालेले जोडपे खास मतदानासाठी उद्या (गुरुवारी) चिंचवडला येत आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी उद्या सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यावेळी सर्वच स्तरातून प्रयत्न झाले. मात्र, त्याची दखल कितीजण घेतात हे उद्या समजणार आहे. मात्र, चिंचवड येथून चीनला कामानिमित्त स्थलांतरीत झालेले राजगंम श्रीराम व त्यांच्या पत्नी खास भारतात मतदानासाठी येत आहेत. महापालिकेच्या महात्मा फुले शाळेमध्ये त्यांचे मतदान आहे.
शहरातील बकाल उद्यानात सुधारणा ...
पिंपरी -चिंचवड शहरातील अनेक उद्यानांची अवस्था अतिशय बकाल असून सबंधित ठेकेदारास त्वरित जवाबदार धरून त्यात सुधारणा घडवून आणावी अशी मागणी पर्यावरण सवंर्धन समितीचे अध्यख विकास पाटील यांनी मुख्य उद्यान अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
पीएमपीएमएलकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल
शासकीय यंत्रणांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. परंतु पीएमपीएमएलने प्रवाशांच्या तक्रारनिवारणासाठी एक वेगळे पाऊल उचलून आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
मात्र, दंड करण्यापेक्षा पीएमपीएमएलच्या संबंधित अधिका-यांनी एक वेगळी शक्कल लढवली. त्यांनी संबंधित बस चालकाला दोन दिवस यमुना नगर बस स्टॉपवर उभे करून येणारी बस थांबविण्याचे काम सोपविले. प्रवासी तासन्तास बस स्टॉपवर थांबतात. त्यांच्या डोळ्यासमोरुन एखादी बस न थांबता निघून जाते त्यावेळी त्यांना किती त्रास होतो, याची जाणीव त्या चालकाला व्हावी. त्याच्याकडून अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये आणि प्रवाशांना चांगली सेवा मिळावी. असा त्या मागील त्यांचा हेतू होता.
मावळात पक्षविरोधी प्रचार करणाऱ्या तीन शिवसेना नगरसेविकांची हकालपट्टी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या शारदा बाबर, सीमा सावळे व आशा शेडगे या तीन नगरसेविकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा उपनेते शशिकांत सुतार यांनी बुधवारी केली.
मतदार ठरविणार आज ७१ उमेदवारांचे ‘भवितव्य’
पुणे, बारामती, शिरूर व मावळ या लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या उमेदवारांसाठीचे मतदान आज (गुरुवारी) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. लक्षवेधी चारही मतदार संघांतील ७१ उमेदवारांच्या निवडणुकीसाठी एकूण ७४ लाख १६ हजार ४0१ मतदार आहेत.
सौरभ मगर, ऐश्वर्या शिंदे प्रथम
पिंपरी : क्रीडा भारती, पिंपरी-चिंचवड शहर आणि ज्ञान प्रबोधिनी विद्यालय क्रीडाकुलतर्फे आयोजित जोर मारणे स्पर्धेत दहावीतील विद्यार्थी सौरभ मगरने १५00, तर ऐश्वर्या शिंदेने ३३१ जोर मारून अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
हनुमान जयंतीनिमित्त निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर जोर मारणे, तसेच, मल्लखांब आड्या मारण्याची स्पर्धा झाली. स्पर्धेत सहावी ते दहावीच्या २00 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन व मारुती स्तोत्राने स्पर्धेस सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण २५ हजार जोर मारले. केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर व क्रीडाकुलप्रमुख भगवान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
हनुमान जयंतीनिमित्त निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मैदानावर जोर मारणे, तसेच, मल्लखांब आड्या मारण्याची स्पर्धा झाली. स्पर्धेत सहावी ते दहावीच्या २00 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन व मारुती स्तोत्राने स्पर्धेस सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण २५ हजार जोर मारले. केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर व क्रीडाकुलप्रमुख भगवान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
परिमंडल तीन हद्दीतून सातजण तडिपार
पिंपरी : निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ तीनच्या हद्दीतून सात जणांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा जणांचा समावेश आहे.
सलीम मकबुल पटेल (वय २५, रा. राजीव गांधी वसाहत, नेहरुनगर, पिंपरी), किरण ज्ञानोबा रणदिवे (वय २६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), समीर शहाबुद्दीन शेख (वय २८, रा. जय भवानी काट्याजवळ, विद्यानगर, चिंचवड), उदय ऊर्फ ज्वाला केदारसिंग गोरखा (वय २२, रा. गांधीनगर, पिंपरी), प्रकाश दिलीप साळसकर (वय २१, रा. मिलिंदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय २0, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, पिंपरी), नीलेश हनुमंत कोळी (वय २४, रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
सलीम मकबुल पटेल (वय २५, रा. राजीव गांधी वसाहत, नेहरुनगर, पिंपरी), किरण ज्ञानोबा रणदिवे (वय २६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), समीर शहाबुद्दीन शेख (वय २८, रा. जय भवानी काट्याजवळ, विद्यानगर, चिंचवड), उदय ऊर्फ ज्वाला केदारसिंग गोरखा (वय २२, रा. गांधीनगर, पिंपरी), प्रकाश दिलीप साळसकर (वय २१, रा. मिलिंदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय २0, रा. आंबेडकर हौसिंग सोसायटी, पिंपरी), नीलेश हनुमंत कोळी (वय २४, रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
कासारवाडीत युवकांचा शंभर टक्के मतदानाचा निर्धार
कासारवाडीतील इतिहासात प्रथमच कासारवाडीतील युवकांनी शंभर टक्के मतदानाचा निर्धार केला असून यासाठी कासारवाडीतील सिटीझन फोरमने पुढाकार घेतला आहे.
Wednesday, 16 April 2014
Help desks in Pimpri to ensure maximum polling
Pimpri: To increase the voting percentage in the Pimpri segment of the Maval Lok Sabha constituency, the local poll administration has decided to open help desks at 29 locations in Pimpri on the voting day.
NCP crackdown on errant cadre imminent?
Pimpri: The local Nationalist Congress Party (NCP) leadership is understood to have furnished a list of over 20 names of party leaders and cadres who are allegedly involved in anti-party activities in the elections.
रेशनकार्ड हा पुरावा नाही!
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच निवडणूक यंत्रणेमार्फत वाटप झालेली व्होटर स्लिप मतदाराकडे नसेल तर अन्य अकरा पुराव्यांपैकी एक पुरावा असेल तरच मतदान करू दिले जाणार आहे.
मावळात 2185 मतदान केंद्र, 12 हजार कर्मचा-यांची नियुक्ती
21 लाख 52 हजार मतदार
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी (दि. 17) मतदान होत आहे. त्यासाठी 2185 केंद्रांवर मतदान होत असून त्यात 19 लाख 52 हजार 198 मतदार भाग घेणार आहेत. त्यासाठी 12 हजार 123 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या मतदार संघात 50 मतदान केंद्र संवेदनशील ठरविण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या गुरुवारी (दि. 17) मतदान होत आहे. त्यासाठी 2185 केंद्रांवर मतदान होत असून त्यात 19 लाख 52 हजार 198 मतदार भाग घेणार आहेत. त्यासाठी 12 हजार 123 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या मतदार संघात 50 मतदान केंद्र संवेदनशील ठरविण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.
भुमापक महिला अधिका-याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
पिंपरीतील परिरक्षक भुमापक अधिकारी सुनिता पठारे यांना दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या पिंपरीतील कार्यालयात सापळा लावून आज (मंगळवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
आता सोशल मीडियाद्वारेही प्रचार नको- जिल्हाधिकारी
प्रचाराची मुदत संपली असल्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आचारसंहिता भंगाच्या २00 तक्रारी
- ५५ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल : जिल्ह्यातील सर्व चेक पोस्टवर वाहनांची कडक तपासणी
पुणे: जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात गेल्या एका महिन्यात आचारसंहिता भंगाच्या २00 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ५५ प्रकरणांमध्ये प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
पुणे: जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात गेल्या एका महिन्यात आचारसंहिता भंगाच्या २00 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी ५५ प्रकरणांमध्ये प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
मतदान करूनच सहलीला जाऊ..!
पुणे : ‘मतदार राजा जागा हो’ अशी हाक देण्याची वेळ आता राहिलेली नसून जागृत झालेला मतदार स्वत:हून मतदानाकरिता पुढाकार घेत आहे. शासकीय सुटी आणि शनिवार-रविवारची जोडून सुटी आल्याने सहलीला जाण्याआधी मतदान करण्याकडे जास्त ओढा असणारे वातावरण पुण्यामध्ये निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्सची आरक्षणे १७ तारखेपेक्षा १८ एप्रिल रोजी मोठय़ा प्रमाणात झाली असून, मतदानाच्या दिवशी एसटीच्या ५0 टक्के फेर्या कमी होण्याची शक्यता आहे.
चिंचवडला आजपासून ज्ञानोत्सव कार्यक्रम
पिंपरी : चिरंजीव पीठ, निगडी आणि कल्याण प्रतिष्ठान, केशवनगर यांच्या वतीने पं. राजू सवार यांच्या ‘श्री दत्तात्रय मोक्षगीता महाभाष्य सप्तखंडा’चे प्रकाशन व त्यानिमित्त चिंचवड गावात बुधवारपासून ‘ज्ञानोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवनीत कौर यांच्या 'ग्लॅमरस' रॅलीला ...
मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारार्थ आज शेवटच्या दिवशी अभिनेत्री तथा अमरावती मतदार संघातील उमेदवार नवनीत कौर यांची रॅली काढण्यात आली. त्यात अभिनेत्री नेहा पेंडसे हिनेही सहभाग घेतल्याने रॅलीला 'ग्लॅमरस' स्वरुप आले होते. कौर यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अक्षरशः झुंबड उडाली होती.
प्राधिकरणबाधितांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात संताप
मावळ लोकसभेच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस प्राधिकरणबाधित शेतक-यांच्या परताव्याबद्दल कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे प्राधिकरणबाधितांमध्ये संताप पसरला असल्याचे प्राधिकरणबाधित संघर्ष कृती समितीचे नेते कैलास कुटे यांनी म्हटले आहे.
Tuesday, 15 April 2014
प्रचाराचा आज शेवट
पिंपरी : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणसंग्रामात उन्हाच्या तडाख्यातही उमेदवारांनी मावळ मतदारसंघ ढवळून काढला.
राजकीय नेत्यांच्या कडवट आरोप प्रत्त्यारोपाने वातावरण अधिकच गरम झाले आहे. ही तापलेली स्थिती मंगळवारी शांत होणार आहे. प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ६ ला थंडावणार आहेत.
राजकीय नेत्यांच्या कडवट आरोप प्रत्त्यारोपाने वातावरण अधिकच गरम झाले आहे. ही तापलेली स्थिती मंगळवारी शांत होणार आहे. प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ६ ला थंडावणार आहेत.
'लवासा नियमित होऊ शकते, तर गरीबांची बेकायदा बांधकामे का नाही ?'
उद्धव ठाकरे यांचा सरकारला खडा सवाल
काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांनी सत्ता भोग भोग भोगली. त्यातून स्वतःच्या घरावर सोन्याची कौले बसविली. आता गोरगरीबांच्या घरांवर नांगर फिरवायला निघाले आहेत. मात्र, शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे गोरगरीबांची घरे पाडाल तर याद राखा, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) सांगवी येथे दिला. लवासा अधिकृत होत असेल तर सर्वसामान्यांची घरे का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
मावळ लोकसभा मतदार संघ संवेदनशील जाहीर करावा - मारुती भापकर
शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मावळ लोकसभा मतदार संघात दहशत असून हा मतदार संघ संवेदनशील म्हणून जाहीर करावा, अशी मागणी या मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात मारुती भापकर यांनी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदार संघात शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे वास्तव्य करतात. त्यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत व गुंडगिरी आहे.
गर्दीचा उठविला प्रचारासाठी फायदा
पिंपरी : कोपरा सभा, जाहीर सभा, पदयात्रा, प्रचार फेर्यांसाठी गर्दी जमविण्यासाठी नाना क्लृप्त्या अवलंबणार्या निवडणुकीतील उमेदवारांना सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे पिंपरी चौकात मोठा जनसमुदाय आयता उपलब्ध झाला. या गर्दीचा प्रचारासाठी फायदा उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध पक्षांच्या उमेदवारांच्या डिजीटल स्क्रिन असलेल्या व्हॅन पिंपरी चौकात मोक्याच्या ठिकाणी उभ्या होत्या. त्यावर प्रचार सुरू होता.
बारणेंची काळेवाडीत पदयात्रा
पिंपरी : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काळेवाडीत सोमवारी पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. तापकीरनगरमधून सुरू झालेली पदयात्रा पुढे जोतिबानगर, नढेनगर, कोकणेनगर, सहकार कॉलनी, विजयनगर, पंचनाथ चौक या परिसरात गेली.
महामानवास उद्योगनगरीचे अभिवादन
पिंपरी - एससी, एसटी संघटना एचए कर्मचारी संघटना यांच्या वतीने महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. एचए कंपनीचे संचालक के. व्ही. वर्की, सरव्यवस्थापक के. पी. राजन, कार्मिक व्यवस्थापक टी. दास, नगरसेवक सद्गुरू कदम, नगरसेविका अमिना पानसरे, माजी उपमहापौर महंमद पानसरे, सुनील पाटसकर, ऑफिसर असोसिएशनचे शक्रुल्ला पठाण, लक्ष्मण रुपनर, धोंडिराज वारे, यू. के. गायकवाड, किरण सुवर्णा, एससी, एसटी संघटनेचे अध्यक्ष बी. बी. संकोनट्टी, राजेंद्र जाधव, मारुती बोरावके उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक यादव यांनी, प्रस्तावना फुलचंद जोगदंड यांनी केले.
नालंदा मित्र संघ
नालंदा मित्र संघ
Monday, 14 April 2014
Citizens in PCMC area frame agenda
The PCCF, a group of NGOs, is working on development issues concerning the city.The forum has prepared an 11-point agenda and plans to seek opinion from all the candidates, said Bilwa Deo Bhavsar, a member of the forum.
Pimpri Chinchwad Citizens' Forum releases People's Manifesto
Pimpri: After getting feedback from citizens, the Pimpri Chinchwad Citizens' Forum (PCCF) has published the People's Manifesto.
आकुर्डीच्या शुभश्री सोसायटीत मतदार जनजागृती
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी निवडणूक आयोग व उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आकुर्डी येथील शुभश्री रेसिडेन्शियल सोसायटीत आज, रविवार, 13 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.
लोकसभेतील विधेयकांवर जनमत घेणार; भापकर यांचा 'संकल्पनामा
लोकसभेतील प्रस्तावित विधेयकांवर जनमत आजमाविणार, मालमत्ता दरवर्षी जाहीर करणार, स्थानिक प्रश्नांवर जनतेला निर्णय घेता यावा यासाठी 'स्वराज'चा कायदा मांडणार, जनतेला विचारुन खासदार निधीचा वापर आदी संकल्प मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मारुती भापकर यांनी केले आहेत.
स्पर्धा भरवायच्या कशा?
पिंपरी : महापालिकेने मैदाने, हॉल, स्टेडिअम, स्केटिंग रिंक, जलतरण तलाव, व्यायामशाळा, कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत आदी क्रीडा सुविधांमध्ये भरमसाट वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य वर्गातील खेळाडूंना सराव करणे, तसेच स्पर्धा आयोजन करणे अधिक कठीण झाले आहे. स्पर्धांची संख्या घटल्याने खेळाडू निर्मितीस लगाम बसण्याची शक्यता असल्याची भीती शहरातील विविध क्रीडा संघटनांनी व्यक्त केली. सरावावर र्मयादा येणार के. ए. कांबळे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड जलतरण संघटना) : जलतरणाकडे अनेकांचा कल वाढत आहे. मोठय़ा प्रमाणात एकदम दरवाढ केल्याने सरावास र्मयादा पडणार असल्याने खेळाडू तयार करणे अवघड होणार आहे. यासंदर्भात चर्चा करुन पालिकेस निवेदन देण्यात येणार आहे.
आमदार जगतापांना विविध संस्थाचा जाहीर पाठींबा
मावळ लोकसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे, मनसे व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ लोकसभा मतदार संघातील विविध स्तरातील संस्थांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
अजितदादा व त्यांच्या बगलबच्च्यांनी वर्षांनुवर्षे पिंपरी पालिका लुटली - भापकर
पिंपरी पालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे टाकून पोती भरून पैसे बारामतीला नेले जातात. दुष्काळी जनतेला उद्देशून अजितदादांनी केलेले ते विधान मुजोरपणाचे होते, तो मुजोरपणा ठेचून काढण्याची वेळ आली आहे.
मुंडे आले.. अन् खाणाखुणा करून गेले
पिंपरी : आपण ज्यांचे विचार ऐकण्याची आतुरतेने वाट पाहात आहात, ते भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे थोड्याच वेळात दाखल होत आहेत, असे प्रत्येक वक्ता मनोगतात सांगत होता. काही वेळात, काही मिनिटांत असे सांगत लोकांना जागीच खिळवून ठेवण्यात आले.
अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा : ठाकरे
पिंपरी : अनधिकृत बांधकामांबाबत माझी भूमिका स्पष्ट आणि सरळ आहे. ज्या बिल्डरांनी अनधिकृत बांधकामे करून ज्या नागरिकांना फसविल त्या लोकांना संरक्षण द्यावे. मात्र, अन्य अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत जमीनदोस्त करायलाच हवीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
स्थानिकांना रोजगार देण्याची राज्यकर्त्यांचीच इच्छा नाही राज ठाकरे
चाकण प्रमाणेच महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात गेलं तर एकच ऐकायला मिळतं, कारखाने आले. मात्र त्यात परप्रांतीय घुसलेत. स्थानिक भूमिपुत्रांना नोक-यांमध्ये प्राधान्य मिळत नाही, राज्यकर्त्यांची तशी इच्छा नाही, राज्यकर्त्यांचाच कुणावरही वचक राहिलेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुम्ही साथ द्यालच पण त्यानंतर येणा-या विधानसभा निवडणुकांमध्येही साथ द्या, राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा, राज्य माझ्या हातात दिले तर सगळ्यांना वठणीवरच आणतो असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
जैन महासंघाच्यावतीने अहिंसा पुरस्काराचे वितरण
पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त आयोजित अहिंसा साप्ताहात शनिवारी, 12 एप्रिल रोजी अहिंसा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रुपीनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात
तळवडे : रुपीनगर परिसरातील पश्चिमेच्या बाजूस लागून असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असलेल्या कचर्यामुळे रुपीनगर-वासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रुपीनगरच्या पश्चिमेस लागून देहूरोड कॅन्टोन्मेंटची हजारो एकर जमीन आहे. या जमिनीला संरक्षक भिंत नाही, त्यामुळे बाहेरील नागरिकांच्या या ठिकाणी राजरोसपणे वावर आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील जागेत एका खासगी एजन्सीद्वारे देहूरोड कॅन्टोन्मेंटचा कचरा आणून टाकण्यात येत आहे. याशिवाय दुसर्या एका ठेकेदाराद्वारे हॉटेलमधील टाकाऊ अन्न टाकण्यात येत आहे.
रुपीनगरच्या पश्चिमेस लागून देहूरोड कॅन्टोन्मेंटची हजारो एकर जमीन आहे. या जमिनीला संरक्षक भिंत नाही, त्यामुळे बाहेरील नागरिकांच्या या ठिकाणी राजरोसपणे वावर आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील जागेत एका खासगी एजन्सीद्वारे देहूरोड कॅन्टोन्मेंटचा कचरा आणून टाकण्यात येत आहे. याशिवाय दुसर्या एका ठेकेदाराद्वारे हॉटेलमधील टाकाऊ अन्न टाकण्यात येत आहे.
Sunday, 13 April 2014
Special squads for demolition men: HC to State govt
Not impressed by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) contention that it requires over three years to go after the 66,000 illegal structures identified in its jurisdiction due to lack of police protection and manpower, the Bombay High ...
|
PCMC seeks GB nod to approach HC
Pune: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) wants to take the opinion of the high court for disqualifying two NCP corporators who have been accused of owning unauthorised constructions.
मतदानासाठी क्षेत्रीय अधिकारी सज्ज
मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांना आज (शनिवारी) प्रशिक्षण देण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या क्षेञीय अधिका-यांकरीता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे, समन्वय अधिकारी प्रशांत खांडकेकर, अजित रेळेकर, यांनी निवडणूक कामकाजा संदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना देऊन क्षेञीय अधिका-यांना कामकाजात उद्भवणा-या अडचणींचे निराकरणाबाबतही माहिती दिली. तसेच या प्रशिक्षण वर्गास संगणक अधिकारी नीळकंठ पोमण हे उपस्थित होते.
मोदी व गांधी सडलेले 'मॉडेल' - योगेंद्र यादव
काँग्रेसचे राहुल गांधी घराणेशाहीचे प्रतिनिधीत्व करतात तर भाजपचे नरेंद्र मोदी हे हुकुमशहा आहेत. विकासाच्या नावावर हे दोन्ही सडलेले 'मॉडेल' पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले आहेत. मतदारांवर लादण्यात येत हे दोन्ही पर्याय लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचा घाणाघात आपचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी आज (शनिवारी) चिंचवड केला. देशात मोदींची लाट असेल तर ते दोन मतदार संघातून निवडणूक का लढवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अवैध बांधकामामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक काळजे, तापकीर अडचणीत
पात्रतेबाबत महापालिका न्यायालयाचे मत मागविणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नितीन काळजे आणि नगरसेविका विनया तापकीर हे अवैध बांधकामामुळे अडचणीत आले आहेत. च-होलीतील अवैध बांधकामाबाबत न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर दोन्ही नगरसदस्यांनी सादर केलेल्या खुलाशावरून त्यांचे पद पात्र ठरवायचे की अपात्र याबाबत न्यायालयाचे मत मागविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.
पिंपरीत औषध विक्रेत्यांचा ‘FDA’वर मोर्चा
जाचक कारवाईच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमधील औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने औषध दुकाने बंद ठेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर शुक्रवारी सकाळी (एफडीए) मोर्चा काढला होता. नाहक कारवाई केल्यास औषध विक्रीचे परवाने परत करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
अनधिकृत बांधकामांबद्दल राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता
बेकायदेशीर बांधकामांना पाठिंबा देणाऱ्या जगताप यांच्या प्रचारसभेत ठाकरे काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.
जगताप यांच्या अवैध बांधकामामुळेच सगळे अडचणीत
पिंपरी : सांगवीतील न्यू मिलेनियम शाळेचे अनधिकृत बांधकाम केले. त्यामुळे शहरातील अन्य बांधकामे अडचणीत आली आहेत. हे निदर्शनास आणून देताना, आमदार लक्ष्मण जगताप स्वत:चे बांधकाम वाचवू शकले नाहीत, ते इतरांचे कसे वाचवणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
पोलिसांकडील तक्रारअर्जांचा निपटारा होईना
पिंपरी : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून कायदा-सुव्यस्था कायम राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. निवडणूक कामकाजात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने त्याचा परिणाम तपास यंत्रणेवर होत असून पोलिसांकडे येणार्या तक्रार अर्जांचा निपटारा करणेही कठीण झाले आहे.
एकाच बूथला परवानगी
पिंपरी: परिसरात एकापेक्षा अधिक मतदान केंद्रे असतील, तर त्या भागात एका उमेदवारास एकच बूथ टाकण्यास मुभा दिली जाणार
आहे. मतदान केंद्राच्या २00 मीटर अंतराच्या आत मतदानाच्या दिवशी कोणत्याही उमेदवारास प्रचार कार्यालय अथवा बूथ टाकता येणार नाही, असे नुकत्याच झालेल्या बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक आशिषकुमार यांनी स्पष्ट केले.
आहे. मतदान केंद्राच्या २00 मीटर अंतराच्या आत मतदानाच्या दिवशी कोणत्याही उमेदवारास प्रचार कार्यालय अथवा बूथ टाकता येणार नाही, असे नुकत्याच झालेल्या बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक आशिषकुमार यांनी स्पष्ट केले.
चार घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी : चिंचवड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
चिंचवड एमआयडीसीतील मयूरी को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील सत्यगीत सीताराम उमरजिकर (वय ४४) हे कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दरवाजाचा कडीकोयंडा व कपाटातील तिजोरी उचकटून त्यामधील १ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. तसेच उमरजिकर यांच्या शेजारीच राहणारे सदानंद प्रकाश बोरसे यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी १ लाख १५ हजार ८00 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ९ते पाचच्या दरम्यान घडल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवड एमआयडीसीतील मयूरी को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील सत्यगीत सीताराम उमरजिकर (वय ४४) हे कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दरवाजाचा कडीकोयंडा व कपाटातील तिजोरी उचकटून त्यामधील १ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. तसेच उमरजिकर यांच्या शेजारीच राहणारे सदानंद प्रकाश बोरसे यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी १ लाख १५ हजार ८00 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ९ते पाचच्या दरम्यान घडल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Saturday, 12 April 2014
PCMC hikes fee at sports centres
Sports enthusiasts will now have to shell out a lot more if they want to use the facilities made available by the Pimpri Chinchwad Municipal Corporation.
Subscribe to:
Posts (Atom)