पिंपरी - शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांद्वारे बाल वैज्ञानिकांचे भावविश्व उलगडले. मनोरंजक विज्ञान दालन व ऊर्जा दालनाला भेट देऊन विज्ञानाचा आविष्कार चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. या वेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पार्कमध्ये ठेवलेल्या विमानासमवेत सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांनाही आवरला नाही.

No comments:
Post a Comment