चौफेर न्यूज – दिघी येथील सर्वात जुन्या मंदीरांपैकी एक असलेल्या श्री विठ्ठल मंदीरातील मुर्ती पुर्नस्थापने निमित्त व मंदीराच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त दिघी गावकर्यांच्यावतीने या मंदीरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. मंदीरात प्रवचन, भजन व कीर्तनाचेही कार्यक्रम सुरु आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून संपुर्ण परिसर रोषणाईने दिपुन गेला. हा सप्ताह २८ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
No comments:
Post a Comment