पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या आयुक्तांना आपण दिलेल्या आश्वासनांचे स्मरण राहिलेले नाही. अवैध बांधकामे, बेकायदा हॉटेल्स, अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत त्यांनी स्पष्ट केलेली भूमिका निभावलेली नाही. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीच होत नसल्याने चित्र आहे. आश्वासनांच्या पुर्ततेबाबत विचारले असता त्यांनी निःशब्ध भूमिका घेतल्याने ते तोंडघशी पडले. त्यामुळे आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट झाले.
No comments:
Post a Comment