Friday, 9 March 2018

भक्‍ती-शक्‍ती चौकातील ‘ग्रेडसेपरेटर’ आणि उड्डाणपुलाच्या कामास वेग

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौक येथे ग्रेडसेपरेटर  व उड्डाणपूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. नियोजित पुलाच्या 17 पैकी 16 पिलरचे काम सुरू असून, 10 बांधून पूर्ण झाले आहेत. रोटरी (वर्तुळाकार) रस्त्याचे फाउंडेशनचे काम झाले आहे. प्राधिकरणाच्या बाजूकडील ग्रेडसेपरेटरच्या भिंतीचे काम 55 टक्के पूर्ण झाले आहे; तसेच प्राधिकरणाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे येणार्‍या पुलाच्या पिलरचे काम सुरू करण्यात आले आहे. 26 डिसेंबर 2019 पर्यंत ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे.

No comments:

Post a Comment