पिंपरी - शाळेतील मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुलाच्या वजनाच्या दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असे न्यायालय आणि सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बहुतांश शाळा याकडे दुर्लक्ष करतात. मुलाच्या वजनाच्या 25 ते 30 टक्के दप्तराचे वजन होत आहे. त्यामुळे मुले या ओझ्याखाली दबली जाऊ लागली आहेत. एवढे वजन पाठीवर घेत काही मुले अर्धा ते पाऊण तास चालत शाळेत येतात. त्यातून मुलांना अनेक व्याधी निर्माण होण्याची शक्यता आहे. दप्तराच्या वजनाबरोबरच मुलांच्या डोक्यावरील ताणही वाढत आहे.
No comments:
Post a Comment