पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये अनेक नगरसेवक तीव्र इच्छुक आहेत. या पदासाठी इच्छुकांनी थेट दिल्लीसह मुंबईतील पदाधिकारी मंत्र्यांना साकडे घातले आहे. त्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी विशेषत: महापौरपदासाठी अनेक जण सरसावले आहेत. वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदास आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. हे प्रतिष्ठीत पद पदरारात पाडून घेण्यासाठी स्थानिक नेत्यांसह दिल्ली व मुंबईच्या वार्याही काही जणांनी केल्या आहेत.
No comments:
Post a Comment