पुणे : पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शहरात नदीपात्रामध्ये आणि इतर मोकळ्या मैदानांमध्ये विनापरवाना सराव करणाऱ्या पथकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सोमवारी दिले. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या अनेक ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू आहे. अनेक पथकांनी परवाना न घेताच, गेल्या अनेक दिवसांपासून ढोलताशांचा सराव सुरू केला आहे. या सरावादरम्यान ढोलताशांमुळे होणाऱ्या आवाजाचा त्रास होत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात येत आहे. त्या विषयी पोलिस आयुक्तांकडे विचारणा केली असता, त्यांनी विनापरवाना सराव करणाऱ्या ढोलताशा पथकांविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
No comments:
Post a Comment