Tuesday, 7 August 2018

पोलीस आयुक्तालयासाठी आठ कर्मचार्‍यांची नियुक्ती

चिखलीसाठी 22 कर्मचार्‍यांची बदली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकीकरण वाढते आहे. औद्योगिक शहर असल्याने येथे कामधंद्यासाठी येणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळेच या शहरात पोलीस आयुक्तालय करावे, अशी मागणी राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार होत होती. आता नव्याने सुरु होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंत नियुक्ती करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या बरोबरच पोलीस कर्मचार्‍यांची देखील नियुक्ती करण्यात येत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस फौजदार पदावरील 235 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आठ पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्तालयासोबत नव्याने सुरु होत असलेल्या चिखली पोलीस ठाण्यात 22 कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment