Tuesday, 7 August 2018

जन्म-मृत्यू दाखले देणार्‍या संस्थेस काळ्या यादीत टाकावे

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांंतर्गत महानगर पालिका हद्दीतील नागरिकांच्या जन्म-मृत्यू नोंद ठेऊन, ते दाखले वितरीत केले जातात. हे काम ज्या संस्थेस देण्यात आले आहे त्या संस्थेला या कामाची माहिती नाही असे वाटते. आजपर्यंत करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, संस्थेमार्फत अनुभव नसल्या कारणामुळे नागरिकांना दाखले मिळण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. तसेच जन्म-मृत्यू नोंदी ठेवणे ही एक महत्वपूर्ण बाब आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अपेक्षित नाही. तसेच हे कामकाज शासनाच्या ‘सर्व्हिस टू ऑदर’ या कायद्याअंतर्गत येत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दंडात्मक कारवाई होऊ शकते. तरी आपण याची पडताळणी करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.

No comments:

Post a Comment