पिंपरी : विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार्या शहर आणि परिसरात यमुनानगर अवैध वृक्षतोड मोठया प्रमाणावर सुरू आहे. वृक्षतोडीबाबत अनेक कायदे आणि नियम असले तरीही ते डावलून वनखात्याच्या कार्यक्षेत्रातच सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे या खात्याच्या कार्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अवैध वृक्षतोडीचा निषेध म्हणून शहरातील काही वृक्षप्रेमी नागरिक एकत्र आले. व वृक्षाविषयी असलेले प्रेम अशा सहवेदक वृक्षमित्रांनी आज प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. मोशी स्पाईन येथे ही अंतयात्रा काढण्यात आली. यामध्ये वृक्षमित्र, भुगोल फाऊंडेशन, आंघोळीची गोळीयांचेही सभासद यावेळी उपस्थित होते. या अवैध वृक्षतो़डीचा निषेध करण्यासाठी डॉ. संदीप बहोत, प्रशांत राऊळ, प्रवीण जाधव, सूर्यकांत मुथियान, धनंजय शेंडबाळे, अशोक तनपुरे, संदीप रांगोळे, दिलीप राजपुत, हृषीराज डोंगरे, संदीप पाटील, महेश मैंदनकर, शरद सोनवणे, समीर कालेकर, निकल रेंगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment