पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राबरोबरच देशभरातील जनतेवर मागील चार वर्षात भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करीत अन्याय केला आहे. जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ३१ ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. कोल्हापूर येथून सुरु केलेली ही जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून शुक्रवारी ७ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवडमध्ये येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment