विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागेवरही डावलेले
विकास महामंडळांच्या नियुक्त केलेल्या 21 जागांमध्ये समावेश नाही
पिंपरी-चिंचवड : पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून दिलेल्या 11 जागांमध्ये डावलल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना महामंडळ दिले जाईल असे बोलले जात होते. परंतु, राज्य सरकारने शनिवारी (दि.31) रिक्त असलेल्या विकास महामंडळाच्या 21 जागांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये देखील त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून चलबिचल सुरु आहे. दरम्यान, पानसरे पुन्हा पक्षांतर करण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment