पिंपरी : महामेट्रो, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्यावतीने शहरातील रिक्षा चालकांसाठी रिक्षा वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाशिक फाटा चौक कासारवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी आणि महावीर चौक चिंचवड येथे ही मोहीम राबविली.यावेळी महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (मार्गिका एक) गौतम बिर्हाडे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, महामेट्रोचे सुरक्षा अधिकारी किशोर करांडे, व्यवस्थापक बापूसाहेब गायकवाड, पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, पोलीस निरीक्षक आबासाहेब म्हसवडे आदी उपस्थित होते. रिक्षाचालकांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, सुरक्षेच्या दृष्टीने कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत माहिती सांगितली.
No comments:
Post a Comment