ईदनिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)
ईद साजरी करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी मुस्लीम बांधव उत्सुक आहेत. शांततामय वातावरणात सण साजरा व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसही सज्ज झाले आहेत.
उत्सवाला गालबोट लागून मुस्लीम बांधवांच्या उत्साहावर विरजण पडू नये याकरिता रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सुमारे ८00 ते एक हजार पोलीस बंदोबस्तावर असणार आहेत.
चिंचवड, आकुर्डी, काळेवाडीसह शहरातील बहुतांश मशिदींवर रोषणाई केली आहे. शहरात सुमारे ६५ ते ७0 मशिदींमध्ये, तसेच ईदगाह मैदानांवर सकाळी नऊच्या सुमारास नमाजपठण होणार आहे. साध्या वेषातील पोलीसही परिसरावर लक्ष ठेवून असतील. याखेरीज राज्य राखीव दल, पोलिसांची मोबाईल व्हॅन, पेट्रोलिंग व्हॅन, बीट मार्शलही बंदोबस्तावर आहेत.
No comments:
Post a Comment