Tuesday, 21 August 2012

वॉर्डसभेची अंमलबजावणी करा

वॉर्डसभेची अंमलबजावणी करा-पुणे प. महाराष्ट्र-महाराष्ट्र-Maharashtra Times प्रभागनिहाय क्षेत्रीय (वार्ड) सभेची स्थापना करून त्याचे कामकाज चालू करावे, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल ३१ जुलैपर्यंत प्रशासनाला सादर करावा, असेही स्पष्ट केले आहे. 

केंद सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुननिर्र्माण अभियानांतर्गत केंद, राज्य आणि महापालिका यांच्यात (जेएनएनयूआरएम) २००६ मध्ये द्विपक्षीय करारनामा झाला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या सुधारणांची अंमलबजावणी व्हावी, असे सूचित केले आहे. त्याअंतर्गत पाच जून २०१२ रोजी झालेल्या बैठकीत क्षेत्रीय सभा स्थापन करण्याबाबत आणि त्यांच्या कामकाजाविषयी आदेश दिले आहेत. त्याविषयी महापालिकेच्या अ, ब, क आणि ड प्रभाग अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment