http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32481&To=6
घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे उद्योगनगरीची सुरक्षा धोक्यात !
पिंपरी, 18 ऑगस्ट
पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कृत्ये आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात भाडेकरुंची संख्या सर्वाधिक आहे. पण येथील घरमालकांकडून भाडेकरुची कोणतीही माहिती ठेवली जात नसल्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भाडेकरुंची माहिती घेणे हे भोसरी पोलिसांसमोरील मोठे आव्हान झाले आहे.
No comments:
Post a Comment