Monday, 4 February 2013

इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत जान्हवी कामथे हिचे यश पिंपरी, 3 फेब्रुवारी राज...

इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत जान्हवी कामथे हिचे यश
पिंपरी, 3 फेब्रुवारी
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत निगडी प्राधिकरणातील जान्हवी कामथे हिने गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकविला. याशिवाय स्थिरचित्र विषयात 'टॉपटेन' स्थान मिळविले आहे.

निगडी केंद्रात झालेल्या इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत जान्हवीला गुणवत्ता यादी पाचवा क्रमांक मिळविला. जान्हवी कामथे हिने भूमिती व अक्षरलेखन विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकविला आहे. राज्यस्तरीय खासगी देणगीदारांकडून आठ जणांसाठी मिळणा-या पारितोषिकांच्या यादीत तिचा समावेश आहे. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या माध्यमिक मराठी विभागाच्या नववीत जान्हवी शिकत आहे. तिचे वडील ज्ञानप्रबोधिनीचे कलाध्यापक अशोक कामथे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

काळभोरनगर (आकुर्डी) केंद्रात ती परीक्षेसाठी बसली होती. तिच्या या यशाबद्दल ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, मनोज देवळेकर, प्राचार्या सुमन शेणॉय यांनी जान्हवीचे अभिनंदन केले. तत्पूर्वी सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कल्चरल ऑलिंपियाड स्पर्धेत तिने युगल कथक नृत्य प्रकारात जान्हवीने सुवर्णपदक पटकविले होते.

No comments:

Post a Comment