मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणा-यास अटक
पिंपरी, 3 जानेवारी
दुकानात खरेदीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणा-या सेल्समनला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रविवारी (दि. 3) दुपारी हा प्रकार घडला.
अब्दुल रेहमान युसूफ सय्यद (वय 19, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्याचे युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्र हे दोघे सय्यद काम करीत असलेल्या दुकानात आज दुपारी खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर काही वेळाने पीडित मुलगा घरी गेला व त्याने आजोबांना घडलेल्या प्रकार सांगितला. त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सय्यद याला अटक करण्यात आली आहे. मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार राहुल भुतेकर तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment