विनयभंग करणा-या संगणक अभियंत्याला अटक
पिंपरी, 2 फेब्रुवारी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या हिंजवडी आयटी पार्कमधील एका संगणक अभियंत्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. निगडीतील गंगानगर येथील इंटरसेक सायबर कॅफेत शनिवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
कमलअल्ली अमीन दुकानदार (वय-26, रा. टेल्को सोसायटी, सेक्टर 24, प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी नऊ वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगानगर येथे इंटरसेक सायबर कॅफेमध्ये संबंधित मुलगी अभ्यासाच्या चौकशीसाठी आली होती. त्यावेळी या कॅफेत असलेल्या कमलअल्ली याने सायबर कॅफेत या मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक रूपाली देशमुख तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment