Monday, 4 February 2013

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज महिला बीट मार्शल

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज महिला बीट मार्शल
पिंपरी, 2 फेब्रुवारी
महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात महिला बीट मार्शलचे पथक तैनात करण्यात आले आहे. आता या महिला बीट मार्शल शहरात गस्त घालून महिलांवरील अत्याचारांच्या, छेडछाडीच्या घटनांवर आळा बसविणार आहेत. आज परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी या बीट मार्शलना सतर्कतेच्या सूचना दिल्या.

दिल्लीतील सामूहिक बलात्कारासारख्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी व सुरक्षिततेकरिता पिंपरी-चिंचवड शहरात महिला बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत.

पुणे शहर परिमंडल तीनमध्ये आठ पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी दोन अशा 16 महिला बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी आज परिमंडल तीनमधील महिला बीट मार्शलना सतर्कतेच्या सूचना दिल्या. अन्यायग्रस्त महिलांना कशा पद्धतीने मदत करता येईल, नियंत्रक कक्षाकडून 'कॉल' आल्यानंतर महिला बीट मार्शल घटनास्थळी किती तत्परतेने पोहचावे, परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी यासारख्या सूचना उपायुक्त उमाप यांनी महिला बीट मार्शलना दिल्या.

No comments:

Post a Comment