आमदार चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत कमलनयन बजाज स्कूलची चमकदार कामगिरी
पिंपरी, 2 फेब्रुवारी - प्राधिकरणातील सिटी प्राईड स्कूलमध्ये शनिवारपासून (दि. 2 ) आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये बास्केटबॉल क्रीडा प्रकारात चिंचवडच्या कमलनयन बजाज हायस्कूलने बास्केटबॉलमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सीएमएसशाळेचा (0-27) असा पराभव करीत अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला आहे तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात निर्मल बेथने शाळेचा 41-22 असा पराभव करीत अंतिम फेरीत मजल मारली आहे. या स्पर्धेत 45 शाळांमधील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा आमदार अण्णा बनसोडे यांनी पुरस्कृत केली आहे.
आज दिवसभरात झालेल्या सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे- (कंसात गुण)
बास्केट बॉल 17 वर्षाखालील मुले- (उपांत्य फेरी) - इंदिरा राष्ट्रीय शाळा विरुद्ध सिटी प्राइड शाळा (37-15), कमल नयन बजाज विरुद्ध निर्मल बेथने शाळा (41-22)
अंतिमफेरीत पोचलेल्या शाळा- इंदिरा राष्ट्रीय शाळा आणि कमल नयन बजाज हायस्कूल
बास्केट बॉल 17 वर्षाखालील मुली- (अंतिम फेरी)
सीएमएस विरुद्ध कमल नयन बजाज (0-27), कमलनयन बजाज शाळेचा अंतिम सामन्यात विजय
व्हॉलीबॉल (उपांत्य फेरी)
महापालिका शाळा विरुद्ध वाघेश्वरी विद्यालाय (25-20 व 25-19), सिटी प्राईड विरुद्ध डी.वाय पाटील शाळा (25-17, 5-18)
महापालिका शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश तर सिटी प्राईड शाळा विजयी
व्हॉलीबॉल 17 वर्षाखालील मुली (अंतिम फेरी)
सिटी प्राईड विरुद्ध सेंट अन्ड्रुज (25-11,25-18) सिटी प्राईड विजयी
14 वर्षाखालील मुले (योगासन)
सुशात तरवडे (ज्ञानप्रबोधिनी विद्यालय), सुदर्शन अय्यर, हर्षल भुरे, दिशांत शहा (सिटी प्राईड शाळा), सौरव कळसे व धीरज जैस्वाल (संत तुकाराम प्राथमिक विद्यालय)
17 वर्षाखालील मुले (योगासन)
दीपक जैस्वाल, मोहसीन शेख (संत तुकाराम विद्यालय), जतीन आव्हाड (ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालय), राकेश कदम, दुर्गेश निखार, घनश्याम बांकर (एम.एम.विद्यामंदिर)
No comments:
Post a Comment