Saturday, 11 November 2017

दैनंदिन वापरातल्या 177 वस्तुंवरील जीएसटी दर कपात

28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍क्‍यांवर आणला दर
गुवाहाटी – जीएसटीतील वाढीव दरांमुळे सातत्याने होणारी टीका लक्षात घेऊन जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत 28 टक्के दराच्या वर्गवारीत असलेल्या 177 वस्तुंचा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर आता 18 टक्के इतकाच दर आकारला जाणार आहे. या वस्तु दैनंदिन वापरातील आहेत. 28 टक्‍क्‍यांच्या वर्गवारीत आता केवळ 50 वस्तुच राहिल्या आहेत अशी माहिती बिहारचे अर्थमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी आज या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.जीएसटीची विवरण पत्रे महिन्यातून तीन वेळा भरावी लागत असल्याने त्यातून व्यापारी आणि दुकानदारांना होणाऱ्या त्रासाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. हा त्रास कमी करण्याच्या प्रस्तावावरही यावेळी विचार करण्यात आला.

No comments:

Post a Comment