सरकारी किंवा खासगी रुग्णालयात आपल्याला सर्वप्रथम ‘केस पेपर’ काढायला सांगितले जाते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पूर्ण संगणकीकरण झाले असले, तरी त्याचा फायदा रुग्णांना कमीच होतो. रुग्णालयांतर्गत प्रक्रिया संगणकीकृत झाल्या असूनही, रुग्णावरील उपचार, आजार किंवा रोगाचे निदान आणि त्यासंबंधात बरीचशी प्रक्रिया ‘कागदावरच’ होते. तंत्रज्ञान उपलब्ध असले, तरी त्याचा वापर न करण्याकडेच बहुतांश व्यवस्थापनांचा कल दिसतो. त्यामागच्या आर्थिक गणितांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढील काळात तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रुग्णालयांना लागू गोष्ट छोट्या क्लिनिकलाही लागू पडते.
No comments:
Post a Comment