पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेची वार्षिक निवडणूक नुकतीच झाली. पिंपरी न्यायालयाच्या बाहेरचा परिसर बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरने रंगून गेला होता. निवडणुकीला उभे असणाऱ्या वकिलांनीच स्वतःची छबी असलेली भली मोठी होर्डिंग्ज प्रचारासाठी लावलेली पाहून नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. प्रतिस्पर्धी उमेदवारांची टर्र उडविणारा प्रचारसुद्धा सोशल मीडियावर झाला. एसएमएस, व्हॉटस्ॲप, फेसबुकवर ते दिसते. यंदाची वकिलांची ही निवडणूक अगदी हद्द झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
No comments:
Post a Comment