सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकले असून शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार असा अजब फतवा काढण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट टाकण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या अजब कारभाराचा विरोध करत आरपीई व जनता दल युनाईटेडच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
No comments:
Post a Comment