Saturday, 11 November 2017

पंतप्रधान आवास योजना; चऱ्होली, रावेत आणि मोशीतील प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या “डीपीआर”ला (सविस्तर प्रकल्प अहवाल) राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शुक्रवारी (दि. १०) मंजुरी दिली. हा डीपीआर आता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये या योजनेअंतर्गत ३ हजार ६६४ घरे बांधण्याच्या प्रकल्पाला सुरूवात केली जाणार आहे. हे तीनही प्रकल्प एकूण ३७७ कोटी २८ लाख खर्चाचे आहेत. या योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ घरे बांधण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment