Saturday, 11 November 2017

वारंवार बदल्यांमुळे पीएमपीचे कर्मचारी त्रस्त

चिखली - कोणतेही कारण न देता वारंवार बदल्या केल्या जात असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

बदल्यांमुळे वारंवार रूम बदलावी लागत आहे. मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. ‘पीएमपीएल’मधील चालक-वाहक असलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच वेगवेगळ्या आगारांत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या तर चार महिन्यांत दोन-दोन वेळा बदल्या केल्याचे सांगितले आहे; तर काहींनी शेवटचे काही वर्ष राहिल्याने बदली करणे अयोग्य असल्याचे सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment