Thursday, 31 May 2018

स्मार्ट सिटीत शंभर ‘ई-टॉयलेट’

पिंपरी : मुंबई येथील स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत अद्यवयावत पद्धतीचे तब्बल 100 ‘ई-टॉयलेट’ बांधून देणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे. या ‘ई-टॉयलेट’ची देखभाल व दुरूस्ती तब्बल 15 वर्षे संस्था करणार आहे.

[Video] New Concept - Environmental Public Limited Company

This video is about investment in environmental Public Limited Company which will give return on investment in the form of pure air, water & land

PCMC constructing subway at CME chowk

PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation is constructing a subway at College of Military Engineering (CME) chowk in Dapodi to ease flow of vehicles on the grade separator.

[Video] पिंपरी चिंचवड | मंदारची सायकल फोटोग्राफी

Pimpri Chinchwad | Mandar Bhoir Cycle Photography

उद्योगनगरीला अतिक्रमणांचा विळखा : सेवा रस्ते, पदपथ गायब

पिंपरी-चिंचवड शहर वेगाने वाढते आहे. वाढत्या नागरीकरणाचे फायदे कमी आणि तोटे जास्त असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

हातगाडी, टपऱ्यांमुळे भोसरीचे वाटोळे

भोसरी - हातगाडीवाले, पथारीवाले, टपरीधारक यांच्यासाठी हॉकर्स झोन तयार करून त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. मात्र, सत्ताधारी भाजप तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण करून टपऱ्या उभारत आहेत. भोसरीच्या बकालपणात वाढ करून तरुणांना चुकीच्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देत आहेत. टपऱ्यांमुळे भोसरीचे वाटोळे झाल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी विधानसभा आढावा बैठकीत केली.

गप्पा, टप्पा खुशाल झोपा

पिंपरी - कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. मात्र, तेथील एक तासाच्या भटकंतीनंतर लक्षात आले की, हे आरटीओ आहे की गप्पांचा कट्टा. जिन्यांच्या कोपऱ्यात थुंकलेलं. एक जण बाकड्यावर झोपलेला. दलालांचा मुक्त वावर. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्‍न पडला. 

महापालिका स्थायी समितीकडून पाच कोटीच्या विकासकामे मंजूर

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 5 कोटी 21 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

PCMC panel member for extension of tax bills' payment deadline to July 31

Pimpri Chinchwad: To ensure timely payment of property taxes and water charges with arrears, Pimpri Chinchwad standing committee member Amit Gawde has said the due date should be extended till July 31.

Premium temporarily suspends operations at Chinchwad plant


Relief in sight for owners of unauthorised structures

PIMPRI CHINCHWAD: Owners of 33,304 unauthorised residential structures in the twin towns with an area of up to 600sqft each will not have to pay penalty as fines to the tune Rs 51.40 crore pending before August 2017 are expected to be waived.

PCMC corporator booked for abetting suicide

PUNE: A corporator of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was booked by Pimpri Police on Monday for allegedly abetting the suicide of a fabrication unit owner in Pimpri.

झाडांना खिळे मारणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई

निगडी – गेल्या अकरा आठवड्यांपासून खिळेमुक्त झाडे हे अभियानात प्राधिकरणात राबवले जात आहे. जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेले कित्येक दिवसांपासून होत आहे. खिळेमुक्‍त अभियानास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही समर्थन दिले. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पालिकेच्या जुन्या वाहनांचा लिलाव

पिंपरी – मुदत संपून गेलेल्या महापालिकेच्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वापरात असलेल्या मात्र मुदत संपलेल्या या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत एकाच लिलावदाराने निविदा सादर केल्याने त्याच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड @ 90.87 %

  • बारावीचा निकाल ः यंदाही मुलीच सरस, 94.58 टक्‍के विद्यार्थीनी उत्तीर्ण
पिंपरी – पिंपरी- चिंचवड शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्कृष्ट असे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत शहरातील नव्वद टक्‍क्‍याहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराने विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यालाही निकालाच्या बाबतीत मागे टाकले आहे. 90 चा आकडा पार करवण्यात मुलींचे मोठे योगदान आहे.

ढगांची पुन्हा हुलकावणी

पिंपरी – गेल्या एक आठवड्यापासून सतत रोज आकाशात जमा होणाऱ्या ढगांना बुधवारी देखील न बरसताच पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना हुलकावणी दिली. गेल्या आठवड्यापासून सतत शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान जरी कमी झाले असले तरी उकाडा आणि उष्णता प्रखरतेने जाणवत आहे.

रुपीनगर येथे भीषण आग

पिंपरी – रुपीनगरमध्ये भंगारच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.

मॉलच्या विरोधात वस्तूंवर बहिष्कार

मॉलच्या विरोधात लढण्यासाठी किराणा व्यावसायिकांनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. मॉल हे कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात माल घेत असल्याने त्यांना स्वस्तात माल दिला जातो. तोच माल किराणा व्यावसायिकांना अधिक किमतीमध्ये दिला जातो. स्वस्तात मिळालेल्या वस्तू मॉलकडून स्वस्तात विकल्या जात असल्याने किराणा दुकानांचा ग्राहक मॉलकडे वळत आहे. त्यामुळे किराणा व्यावसायिकांनी अशा वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे शस्त्र उपसले आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पीएमआरडीएत इमारतींची उंची 50 मीटर

पुणे -  पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीसाठी तयार केलेल्या बांधकाम नियमावलीवर दाखल हरकती व सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. नियमावलीत प्राधिकरणाच्या हद्दीत इमारतींची उंची 50 मीटरपर्यंत मर्यादित करण्याबरोबर टीडीआर वापरण्यावर मर्यादा घालण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बिल्डरला घर विकण्यास बंदी

मुंबई : काही कारणास्तव घर खरेदीचा करार रद्द करणाऱ्या आणि दिलेल्या मुदतीत ग्राहकाला त्याने गुंतवलेले पैसे परत न देणाऱ्या बिल्डरांना दणका देणारा निर्णय महारेराने घेतला आहे. जोपर्यंत बिल्डर ग्राहकाला पैसे परत देणार नाही, तोपर्यंत गृहनिर्माण प्रकल्पातील एकही सदनिका विकण्यास महारेराने बंदी घातली आहे.

Wednesday, 30 May 2018

85 हजार कुटुंबांना 24 तास पाणी

पिंपरी  - अमृत योजनेअंतर्गत शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहरातील ८५ हजार ४८ कुटुंबांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. या कामासाठी सुमारे २४० कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

[Video] अखेर पिंपरी चिंचवड करांना दिलासा

पिंपरी चिंचवड । 2008 पासूनचा शास्तीकर माफ

[Video] धार्मिक आणि राजकीय स्टेटस असलेल्या गायींची पिंपरीत काय अवस्था

Pimpri Chinchwad | 85 Kg Plastic Found In Cow During Surgery

बेशिस्तीमुळे होतेय कोंडी

रावेत, ता. २८ : तळवडे येथील ‘सॉफ्टवेअर पार्क’ चौकात बंद असणारे वाहतूक नियंत्रक दिवे, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. बेशिस्तपणे वाहनचालकही याला काही अंशी कारणीभूत असले, तरी सॉफ्टवेअर पार्कसह तळवडे गावठाण चौकातही वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत. तसेच, नियमित पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

अतिक्रमणाकडे काणाडोळा

पिंपरी : मोरवाडी चौक ते इंदिरा गांधी पूल मार्गालगत बेकायदा कपडे विक्रीची दुकाने लावली जात आहेत. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहे. पिंपरी पुलाकडे जाण्याच्या मार्गावर डावीकडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोजकीच दुकाने होती; परंतु हळूहळू त्यामध्ये वाढ होत गेली. सध्या या परिसरात सुमारे ८० पेक्षो अधिक दुकाने आहेत. यापैकी बहुसंख्य दुकानदारांकडे अधिकृत वीजमीटर नाही. तरीही त्या दुकानांमध्ये विजेची सुविधा असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरबात पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाचं ‘घोडं गंगेत न्हालं!’

जुन्या हद्दीसह नव्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान

अजित पवार यांचे आज बैठकांचे सत्र

पिंपरी  - केंद्र व राज्य सरकारविरोधात केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण, वर्षभरात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटनेतील मरगळ झटकून पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (ता. ३०) शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन संवाद साधणार आहेत.

आळंदी रोड येथील साई मंदिरात रविवारी साईभक्तांच्या मेळाव्याचे आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त होणा-या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी येत्या रविवारी (दि.३) साईभक्तांच्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात हा मेळावा होणार आहे, अशी माहिती श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ण शास्तीकर माफ; मंत्रीमंडळात निर्णय झाल्याची आमदार जगतापांची माहिती

पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ण शास्तीकर माफ करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयाने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डी.वाय.पाटील रूग्णालयात गैरव्यवहार; आमदार जगतापांची कारवाईची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ऑड रिसर्च सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे आढळून येत आहे. रूग्णालयामध्ये येत असलेल्या गरिब व गरजू रूग़्णांची पिळवणूक रूग्णालय व्यवस्थापनाकडून होत आहे. तरी या रूग्णालयावरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपा पिंपरी चिंचवड अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी लेखी निवेदनाव्दारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक हैराण

रावेत. ता. २८  : रूपीनगर,जोतिबानगर, तळवडे परिसरांतील वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने नागरिकांसह लघुउद्योजक हैराण झाले आहेत. ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी होत आहे.

सांगवीत नागरीक कचराकुंड्याभोवतीच टाकतात कचरा

जुनी सांगवी : जुनी सांगवीत रस्त्याकडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधे नागरीक कचरा टाकण्याऐवेजी कचराकुंड्यांभोवती कचरा भिरकावुन टाकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुचाकी,चारचाकी वहानांतुन कुंड्याचे दिशेने फेकलेला कचरा कुंड्यात न पडता कुंड्यांभोवती पडतो. हा कचरा भटकी जनावरे, कुत्री अस्तव्यस्त करून रस्त्यावर आणतात.

वीस लाखांचे गोमांस खराळवाडीमध्ये जप्त

पिंपरी - अहमदनगरहून नवी मुंबईला जाणारा टेंपो पिंपरी पोलिसांनी सापळा रचून जप्त केला व सुमारे 20 लाख किमतीचे गोमांस जप्त केले. ही कारवाई मुंबई-पुणे महामार्गावर खराळवाडी येथे मंगळवारी (ता. 29) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 1) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

21 कंत्राटदारांना “शॉक’

  • वीजवाहिन्या तोडल्या: महावितरणला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान
पुणे  – मागील वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्राद्वारे झालेल्या खोदकामात तब्बल 318 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणी महावितरणकडून 21 कंत्राटदारांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजवाहिन्या तोडल्यामुळे महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागला आहे.

Water supply to PCMC areas likely to be hit as farmers protest at Pavana dam

The agitation continued for five hours, during which the agitators did not allow Pavana dam officials to release water for Pimpri-Chinchwad.

PMPML cuts a sorry figure with 13,200 breakdowns in 12 months

PUNE: A total of 13,206 PMPML bus breakdowns were reported in 12 months from April 2017 to this March, showcasing the poor upkeep of the public transport vehicles and the hassles of commuters.

बँकांचा ३० आणि ३१ मे रोजी देशव्यापी संप

चौफेर न्यूज – उच्च वेतनासाठी देशभरातील बँकांनी बुधवार ३० आणि ३१ मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. आठवड्याच्या वारी बँका बंद असल्याने नागरिकांची बँकेची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. याबरोबरच बँका बंद असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. महिनाअखेर दरम्यान हा संप असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बँकांची महत्त्वाची कामे असल्यास ती आजच पूर्ण करावीत. इंडियन बँक असोसिएशन (आयबीए)ने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर काही बँक कर्मचारी निदर्शने करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

लोहमार्ग पोलिसांची वेबसाइट सुरू

पुणे लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांना वापरासाठी सोयीची आणि अद्ययावत अशी वेबसाइट सुरू केली आहे. अंध व्यक्तींनादेखील 'स्क्रीन रीडर' या सॉफ्टवेअर अॅपद्वारे ही वेबसाइट वापरता येणार आहे. त्याबरोबरच आता रेल्वेत एखादी वस्तू अथवा कागदपत्रे हरवल्याची व सापडल्याची तक्रार ऑनलाइन देण्याची सोय करण्यात आली आहे.

रेल्वेने सुरु केलेल्या ‘या’ सुविधेचा कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा

नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकीट बुकिंगदरम्यान जर तुमचे तिकीच कन्फर्म होणार की नाही याबाबत साशंक असाल तर आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तुम्हाला नवीन सुविधेचा फायदा होऊ शकतो. यावरुन तुम्ही हेही जाणून घेऊ शकता की तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे प्लानिंग करणे सोपे होऊ शकते. आयआरसीटीसीकडून सोमवारी मध्यरात्रीपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

एक भीषण आरोग्य संकट (भाग- २)

विषाणूसंबंधी
सूक्ष्मजीवशास्त्राच्या वंशावळीनुसार, निपाह हा विषाणू हेनिपाव्हायरस या प्रजातीतील पॅरामिक्‍सोव्हायरिडी या कुलातील सदस्य आहे. त्याला वैद्यकीय परिभाषेत छळत या संज्ञेने ओळखले जाते. ही साथ प्राण्यातून माणसांमध्ये आणि नंतर एका माणसाकडून दुसऱ्याला होत राहते. संशोधनामध्ये सिद्ध झाले की, फळे खाऊन उपजीविका करणाऱ्या एका विशिष्ट वाटवाघळापासून हा पसरतो. संसर्ग झालेल्या वटवाघुळांनी खाल्लेल्या खजुराच्या किंवा फळाच्या संपर्कात आल्याने ही साथ पसरते. मलेशियामध्ये निपाह आजार प्रथम वटवाघळापासून डुकरांना झाला. तो एका डुकरापासून दुसऱ्या डुकरामध्ये पसरला आणि डुकरांपासून माणसांमध्ये पसरला.

तंबाखू सेवन आणि परिणाम (भाग १ )

31 मे हा जागतिक तंबाखूू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धूम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

राज्यातील महामार्गांवर उभारण्यात येणार १६० ठिकाणी स्वच्छतागृहे

मुंबई : राज्यातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबणा लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

Tuesday, 29 May 2018

PCMC City Transformation | Citizen Survey

Pune is Oxford of the East, Mumbai is Financial Capital of India, Bangalore known as Silicon City of India or Green City of India. Then what our Pimpri-Chinchwad called for? If you anseer is 'Industrial City / Twin Town', then there are many such industrial/twin town cities spread all over India. If we strive for global identity of our city, then there will be an opportunity to improve the quality of life of the citizens. It will also encourage higher life expectancy due to comparative competition among best cities in world.

With this in mind, the corporation has established a City Transformation Office. As a first part, a survey has been prepared by discussing with representatives, officers and expert citizens. It takes only 20 minutes to complete the survey. Please fill and share within your network

...The city is going on a paradigm shift, it needs your participation

City Transformation Citizen Survey |  शहर परिवर्तन नागरिक सर्वेक्षण
English https://tinyurl.com/yatd9weo


पिंपरी-चिंचवड शहराची ओळख करून देणारी सायकल वारी अन अनोखी फोटोग्राफी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची पूर्वीपासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. ही ओळख अलीकडच्या काळात काही प्रमाणात कमी होत आहे. कारण शहरात औद्योगिक विकासासह, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पुणे शहराला 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट', 'शिक्षणाचे माहेरघर' अशा अनेक नावांनी ओळखले जाते. तर पिंपरी-चिंचवड शहराला 'औद्योगिक नगरी' म्हणून नावाजले जाते. शहरात अनेक शैक्षणिक संकुले देखील गजबजली आहेत. दिमाखात चालणारी सांस्कृतिक सभागृहे ही शहराचा सांस्कृतिक विकासच सांगत आहेत. पण हा विकास किंवा नव्याने तयार होणारी शहराची ओळख कोणत्यातरी माध्यमातून जगापुढे मांडण्याची आवश्यकता असते. चिंचवड मधील दोन तरुणांनी शहराची ओळख जगापुढे मांडण्याची नवी शक्कल लढवली आहे. दररोज सकाळी सायकलिंग करून दर दिवशी शहरातील एका प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याचा सपाटा त्यांनी महिनाभर केला आहे.

​Pimpri : पिंपरी-चिंचवड शहराची ओळख करून देणारी सायकल वारी अन अनोखी फोटोग्राफी

असे असेल शहराचे पोलीस आयुक्‍तालय

अधिसूचना जारी ः अपर पोलीस महासंचालक दर्जाचे आयुक्‍त
पिंपरी – गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आणि मागण्याच्या फेऱ्यात अडकलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला सरकार मान्यता मिळाली असून या संदर्भातील सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी बाब म्हणजे सरकारकडून अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराला मिळणारे आयुक्‍त हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे असणार असल्याचे या अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले आहे. तसेच ग्रामीण आणि शहरातील पोलीस ठाण्यांचे सहाय्यक आयुक्‍त कार्यालयातंर्गत विभाजन करण्यात आले आहे.

Addl DG rank officer to head PCMC police HQ

Pune: The state home department on Monday released the much-anticipated government resolution officially elaborating the finalised scheme for the setting up of an independent police commissioner’s office for the twin industrial township of Pimpri Chinchwad.

कासारवाडीत वाहतुकीत बदल

पिंपरी- नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे जाणाऱ्या वाहनांनी मंगळवारपासून (ता. 29) सेवा रस्त्याऐवजी मुख्य रस्त्याने नाशिकफाटा चौकाकडे जावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. 

मेट्रोवर 20 वर्षे कर्जाचा बोजा

पुणे - मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड प्रकल्प सुरू झाल्यावर पाच वर्षांनी सुरू होईल. त्यासाठी 15 वर्षांची मुदत असेल. कर्ज फेडण्यासाठी तिकिटाच्या उत्पन्नाशिवाय 40 टक्के महसूल अन्य मार्गांनी निर्माण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. दरम्यान, एक वर्षात दोन्ही शहरांतील मेट्रो मार्गावर सुमारे 330 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 

मुळा नदीत सात मजली खांब

पिंपरी - मुळा नदीपात्रात हॅरिस पुलामधील मोकळ्या जागेतून मेट्रोचे 20 मीटर उंचीचे खांब उभारण्याचे आव्हानात्मक काम महामेट्रोने हाती घेतले आहे. पहिल्या खांबाचा पाया घेतला असून, तेथे सिमेंट कॉंक्रिटीकरणास सुरवात झाली. पाया भरणीचे काम पूर्ण करून खांबाचा तळातील एक भाग आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. या खांबांची जमिनीपासूनची उंची सर्वसाधारणपणे सात मजली इमारतीएवढी असेल. 

Faulty rides play spoilsport in various PCMC gardens

Pimpri Chinchwad: Twelve-year-old Adit Pole cannot play in the Dinosaur garden in Pimple Gurav. It is closed for the past two months.

PCMC demands Rs 2crore for Harris bridge work delay

PIMPRI CHINCHWAD: The civic body has demanded Rs 2 crore from Pune Municipal Corporation (PMC) for the cost escalation due to the delay in completing the bridge parallel to Harris bridge on Mula River in Dapodi.

8 years on, hawkers still wait for dedicated zones

Pimpri Chinchwad: In the absence of a proper policy, hawkers in Pimpri Chinchwad peddle their wares on busy roads and footpaths in Pimpri Chinchwad.

PCMC tells PMC to finish pipeline work in 15 days

Pimpri Chinchwad: The civic authorities have asked Pune Municipal Corporation to wrap up the Bhama Askhed-Pune water pipeline project in a fortnight.

सांगवीत लोखंडी जाळ्यांच्या कैदेत झाडे गुदमरली

जुनी सांगवी (पुणे) : महापालिका रस्ते वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन विभागाकडून काही वर्षांपूर्वी सांगवी परिसरात लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली आहेत. लहान रोपे लावुन ती सरळ वाढावीत, भटक्या जनावरांपासुन रोपांचे संरक्षण व्हावे, वादळ वाऱ्यापासुन रोपे मोडुन पडु नयेत या उद्देशाने झाडांभोवती सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्या बसविण्यात येतात.

गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी - आ. लक्ष्मण जगताप

वाल्हेकरवाडी (पुणे) : परिसरात गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची उभारणी केली आहे, त्याचबरोबर आम्ही आमचा शब्द पाळला असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाल्हेकरवाडी येथे केले.

टपरीधारकाच्या आत्महत्येप्रकरणी नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी (Pclive7.com):- संत तुकारामनगर मधील टपरी धारकाच्या आत्महत्या प्रकरणात भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन ढवळे या टपरी धारकाने मध्यरात्री आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नगरसेविका सुजाता पालांडे, पती सुनिल पालांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा खुलासा केला होता.

भाजपाचे संपर्क अभियान सुरू; केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्याचा निर्धार – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकार ४ वर्षे पूर्ती निमित्त २६ मे ते ११ जून या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी संपर्क अभियान राबविणार आहे. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा ४ वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारच्या अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामन्यांना देणार आहेत. सदरच्या अभियानामध्ये राज्यातील मंत्री महोदयांचा सहभाग राहणार आहे. देशभरात १५ लाभार्थी योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑडियो कॉन्फरन्स व्दारा बोलणार आहेत.  

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्ताने सावरकरांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सावरकर मंडळातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.

पवना धरणग्रस्तांनी पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखले; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पिंपरी-चिंचवड़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणी पुरवठा आज धरणग्रस्तांनी रोखून धरत आंदोलन केले.

रखडलेली कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आनंदधाम स्मशानभूमीः पत्र्याच्या शेडची झाली चाळणी
पिंपरी – महापालिकेने लाखो रुपयांचा चुराडा करूनही आंनदधाम स्मशानभूमीतील कामे रखडलेली आहे. प्रस्तावीत लॉन्स, दहन शेडमधील खड्डे, दहन शेडमधील पत्र्यांची झालेली दुरवस्था यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. लाखो रूपयांचा करभरणा करूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रखडलेली कामे प्रशासनाने त्वरीत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

Monday, 28 May 2018

शहर परिवर्तन नागरिक सर्वेक्षण | शहर परिवर्तनाच्या लाटेवर आरूढ होत आहे त्याला गरज आहे तुमच्या सहभागाची...

#PCMCFirst पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ ​द ईस्ट, मुंबईला आर्थिक राजधानी, बंगळुरूला सिलिकॉन सिटी ऑफ इंडिया किंवा ग्रीन सिटी ऑफ इंडिया असे संबोधले जाते... मग आपल्या पिंपरी-चिंचवडला काय म्हणून संबोधले जाते? 'उद्योगनगरी/ट्वीन टाऊन' असे तुमचे उत्तर असेल तर असे सतराशे साठ उद्योगनगरी/ ट्वीन टाऊन भारतभर पसरले आहे. पिंपरी-चिंचवडची शहराची जागतिक ओळख प्रस्थापित झाली तर येथील जीवनमान उंचावेल तसेच मोठ्या शहरांशी तुलनात्मक स्पर्धा झाल्याने नागरिकांची जीवनशैली सुधारण्याची संधी मिळणार आहे

याचाच विचार करून पालिकेने शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना केली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून लोकप्रतिनिधी, अधिकारी, तज्ञ नागरिक यांच्याशी चर्चा करून एक सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण करण्यास फक्त 20 मिनिटे लागतील. सर्वेक्षण स्वतः भरून आपल्या परिचितांना शेअर करावे

...शहर परिवर्तनाच्या लाटेवर आरूढ होत आहे त्याला गरज आहे तुमच्या सहभागाची
----------------------
City Transformation Citizen Survey | शहर परिवर्तन नागरिक सर्वेक्षण
# English https://tinyurl.com/yatd9weo
# Marathi https://goo.gl/juYAXk

पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनद्वारा वाकड येथे ग्राउंड ​वॉटर हार्वेस्टिंग विषयावर परिसंवाद

पिंपरी चिंचवड को-ऑप हाउसिंग सोसायटीज फेडरेशन आणि पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम (PCCF) यांचे संयुक्त विद्यमाने आज भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण (CommunityGround Water Recharge) आणि पर्जन्य जल संचयन (Rain Water Harvesting) या विषयवार परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाद्वारे ज्येष्ठ भूजल संशोधक डॉ हिमांशू कुलकर्णी आणि वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्री. शशांक देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत या विषयावरील विविध पैलूंचे विवेचन केले.

PCMC tells citizens to pay property tax without bills

PIMPRI CHINCHWAD: The civic body is yet to print and disburse property tax bills, but has asked citizens to meet the June 30 deadline and avail themselves of concessions.

[Video] मुक्या भिंती बोलू लागल्या, चित्रांद्वारे सामाजिक संदेश

Pimple Saudagar,Pimpri Jinjar Society Kids And Residential Give Social Message Through Paint The Wall

पावसातही मेट्रोचे काम सुसाट

पुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. पिंपरी स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मेट्रो मार्ग आणि आणि स्थानकांसाठी 191 खांबांचे फाउंडेशन पूर्ण झाले असून, 51 खांब वर्षात उभे राहिले आहेत. त्यामुळे पिंपरीतील 20 टक्के आणि पुण्यातील 15 टक्के कामाचा टप्पा महामेट्रोने गाठला आहे. असाच धडाका राहिला, तर पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत एका मार्गावरील काही अंतराची चाचणीही शक्‍य आहे. कारण, त्या वेळी विधानसभेच्या निवडणुका आहेत. 

गणेश तलावातील दुर्मिळ “महाशीर’ नामशेषाच्या मार्गावर

पिंपरी – तीव्र उन्हाळ्यामुळे आकुर्डी येथील गणेश तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. यामुळे तलावातील गाळामुळे ऑक्‍सिजनची पातळी घटल्याने, या तलावातील जलचरांचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. यामुळे गाळात रूतून अनेक मासे दगावले आहेत. ही बाब लक्षात काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Amnesty Scheme 2018: MSEDCL relief for industrial consumers with pending power bills

From July 1 to August 31, 2018, the customer would have to pay 25 per cent of basic outstanding balance and interest, and the remaining 75 per cent interest and 100 per cent delay charges would be waived, said MSEDCL.

‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट गायब

पिंपरी-चिंचवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करून ते स्वच्छ करून शुद्ध हवा वातावरणात सोडणारे ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ युनिट (यंत्र) गायब झाले आहे. सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करीत पिंपरी चौकात हे युनिट बसविले होते; मात्र, पहिलाच प्रयोग फसल्याचे या घटनेवरून उघड होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 69 वाहने भंगारात

पिंपरी - परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार आयुर्मान संपलेली ६९ वाहने महापालिकेने भंगारात काढली आहेत. त्यांच्या लिलावासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली होती. प्राप्त निविदांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार वाहनांचे वायुर्मान १५ वर्षे निश्‍चित केले आहे. त्यानंतर वाहनांच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे महापालिकेने आयुर्मान संपलेली व अपघात अथवा अन्य कारणांनी वापरात नसलेली ६९ वाहने भंगारात काढली आहेत.

पिंपरीला पाणी देणार नाही

पवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर व पवना धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ यांनी दिली. ‘‘पिंपरी-चिंचवडसाठी एकही थेंब पाण्याचा जाऊन देणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

काळेवाडीतील स्मशानभूमीलाच मरणयातना

पिंपरी – महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोट्‌यावधी रुपये खर्चून काळेवाडीमध्ये उभारलेली स्मशानभूमी आज मरणयातना सहन करत आहे. विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे याठिकाणी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. मोकाट कुत्र्यांनी याठिकाणी ठिय्या मांडला असून सुरक्षा रक्षक गायब असल्याचे याठिकाणी पहायला मिळाले.

खड्डेच खड्डे चोहीकडे; गेली मनपा कुणीकडे?

पिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण झाले आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही डांबरीकरण होत नाही. महापालिकेचे अधिकारीही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरात खड्डेच खड्डे असताना महापालिका कुठे गेली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण

चिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास कोणीही पुढे येत नाही. तेवढ्यात कुटुंबासह गावी जात असलेला एक पोलिस अधिकारी हा प्रकार पाहतो. त्यांच्यात वर्दीतला माणूस जागा होतो. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला आपल्या गाडीत घालून ते रुग्णालयात दाखल करतात. देवदूतासारखे धावून आलेल्या त्या अधिकाऱ्यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीला जीवदान मिळते.

जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर

सांगवी :  सांगवी येथील साईचौक, इंद्रप्रस्थ, महाराणा प्रताप चौक इथपर्यंत करण्यात येणाऱ्या जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी. मैदानाच्या किनाऱ्यालगत सुरू असलेल्या या जागेत महापालिकेकडुन जॉगींग ट्रॅक बनविण्यात येत आहे. पावसाळ्यात मैदानावरील माती ट्रॅकवर येवु नये यासाठी ठिकठिकाणी चौकोणी आकाराच्या भिंती बांधण्यात येत आहेत. उद्यान विभागाकडून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या कामादरम्यान काढण्यात आलेल्या झाडांचे या जॉगींग ट्रॅकच्या कडेने पुनररोपण करण्यात आलेले आहे. येथे फायकस, चाफा, नांद्रुक, साग आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. पन्नासच्यावर पुनररोपण केलेली जवळपास सर्व झाडे जगली आहेत. यामुळे जॉगींग ट्रॅक व पी.डब्ल्यु.डी.मैदानाचा ओसाडपणा जावुन किनारा हिरवागार होणार आहे. 

मुळा नदीने घेतला मोकळा श्वास, डासांचा उपद्रव झाला कमी

जुनी सांगवी - मुळा, पवना नद्यांच्या संगमावर वसलेल्या सांगवीकरांना जलपर्णी व डासांच्या त्रासाचा सामना दरवर्षी करावा लागतो. गेली अनेक वर्षापासुन जलपर्णी हे सांगवीकरांच कायमचं दुखणं झालं आहे. या हंगामात तर साचलेली जलपर्णी व त्यामुळे वाढलेल्या डासांचा उपद्रव सांगवीकरांना नको नकोसा झाला होता. महापालिकेकडुन या विषयांकडे झालेले दुर्लक्ष तोकडी यंत्रणा, ठेकेदाराने कामास लावलेली दिरंगाई, बोपोडी पुलाच्या कामासाठी टाकलेला भराव व त्यामुळे प्रवाह थांबलेले पाणी आणी त्यावर जोमाने फोफावलेली जलपर्णी यामुळे उकाड्याबरोबरच सांगवीकरांना डासांमुळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. नदी किनारा भागातील रहिवाशांना डासांच्या उपद्रवाबरोबरच जलपर्णीमुळे दुर्गंधीयुक्त वासाचा सामना करावा लागत होता. पिंपरी चिंचवड शहरातील काही स्वयंसेवी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने पवना नदीतील दशक्रिया विधी घाट ते सांगवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतची जलपर्णी दोनदा काढण्यात आली.

कॅन्टोन्मेंटचा निकष बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्यांना लावा

पिंपरी – केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लॅंक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

विलिनीकरणाला वाढता विरोध

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) विलिनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रात करण्यास शहरातून वाढता विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही सावध भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे.

निगडीत गुंडांचा धूडगूस, ११ वाहनांची तोडफोड

अल्पवयीन मुलांचा सहभाग; तीन दिवसात चौथी घटना

'सावरकरांचा इतिहास लिहिणं हाच पुढील कार्यक्रम'

२०१४ च्या लोकसभा निवडणुकी देशातील सर्व हिंदू एकत्र आल्यानं भाजपची केंद्रात सत्ता आली असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जो खरा इतिहास लिहिला आहे, तोच इतिहास आता लिहिणे हाच आमचा पुढील कार्यक्रम असणार आहे, असे स्पष्ट संकेत भाजप खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पुण्यात दिले.

पिंपरीत दुचाकीच्या नंबर प्लेटवर महापौरांचे नाव; पोलीस कारवाई करणार का?

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये अनेक पक्षातील बड्या नेत्यांचे किंवा स्थानिक नगरसेवकांचे नाव हे नंबर प्लेटवर टाकण्यात आले असून अशा महाभागांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोदींच्या 'प्रचारक ते पंतप्रधान' प्रवासाच्या छायाचित्र व बातम्यांचे प्रदर्शन

वाल्हेकरवाडी  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या छायाचित्र व बातम्याचे प्रदर्शन पिंपरी-चिंचवड येथील नितीन चिलवंत यांनी बालगंधर्व कलादालन  पुणे येथे दि. २७, २८, २९ रोजी भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील महानगरपालिकेचे स्वच्छता कामगार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी या प्रदर्शनात भारत सरकारच्या नवीन योजनांचा शुभारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन कि बात मध्ये साधलेला संवादाची कात्रणे, मोदी यांचे भारतातील विविध राज्यातील विधानसभा रण संग्रामातील प्रचारक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशातील पंतप्रधान राष्ट्रप्रमुख यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट-गाठी व देशांतर्गत विविध करार, विविध कार्यक्रमाचे केलेले उद्घाटन, पंतप्रधान पदाचे उमेदवार लोकसभा निवडणूक २०१४, नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नेतृत्त्व, पंतप्रधान यांचे विदेशातील दौरे इ. छायाचित्र व वृत्तपत्रातील बातम्याच्या कात्रणाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी नवी दिल्ली येथून स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीपर्यंत आपला संपूर्ण भारत देश स्वच्छ भारत करण्याचे स्वप्न पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदींनी पाहिले आहे आणि ते साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकीतून स्वच्छ भारत समृध्द भारत चित्रप्रदर्शन भरविणार आले आहे. त्यांना
सहकार्य शिवकुमार बायस यांनी केले आहे. 

कॅन्टोन्मेंटचा निकष बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्यांना लावा

पिंपरी – केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लॅंक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने “खेळ मांडला’

“क्रीडा’ समितीची बैठक : जलतरण तलाव ठेकेदारांना “अभय’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात एकूण 12 जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. मात्र, संबंधित तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाच महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदारांच्या कामाची मुदत संपली आहे. मात्र, तरीही प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

भीम ऍपला दहा हजार रुपये ग्राहकाला परत देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

पाठविलेल्या खात्यातून पैसे गेले : मात्र, दुसऱ्या खात्यात जमाच नाही                             नुकसानभरपाईपोटी पाच हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावेत
पुणे – भीम ऍपद्वारे कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग करुनही 10 हजार रुपये जमा न झालेल्या ग्राहकाला ग्राहकाच्या बाजूने ग्राहक मंचाने निकाल दिला आहे. ऍपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवत ग्राहकाला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला आहे. याबरोबरच नुकसानभरपाईपोटी पाच हजार रूपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये देण्यात यावेत, असेही मंचाने आदेशात नमुद केले आहे.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी जाहीर

चौफेर न्यूज –  राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी आज शनिवारी (दि.२६) जाहीर करण्यात आली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी युवक राष्ट्रवादीच्या तब्बल ३७ युवकांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Saturday, 26 May 2018

Maharashtra board result 2018: Maharastra HSC Result 2018 releasing today at mahresult.nic.in

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is likely to declare the Maharashtra Board HSC Class 12 result today at 1 pm, reports said. The Maharashtra Board will release the Maharashtra HSC Class 12 Arts Result 2018, Maharashtra HSC Class 12 Science Result 2018 and Maharashtra HSC Class 12 Commerce Result 2018 on its official website mahresult.nic.in.

Representational image. Reuters

CBSE Class 12th Results 2018 : निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून विशेष व्यवस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.


CBSE Class 12th Results 2018: Special arrangements by Microsoft and Google for viewing results |  CBSE Class 12th Results 2018 : निकाल पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून विशेष व्यवस्था  

पवनात वाढणार एक टीएमसी पाणी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगाव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पंधरा दिवसांत २१ हजार ट्रक गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात एक टीएमसीने पाणीसाठा वाढणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या निधीतून सलग तीन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम केले.

भक्ती-शक्ती पुलाचे काम वेगात

निगडी - येथील भक्ती-शक्ती चौकात बांधण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, उड्डाण पुलाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे वेळेत मोठी बचत होणार असून, वाहतूक कोंडी फुटण्यास त्याची मदत होईल. 

Bridge by June to ease Dapodi traffic

PIMPRI CHINCHWAD: The civic body is planning to open a bridge parallel to Harris bridge in Dapodi on the Pune-Mumbai highway in June.

HT follow-up: PCMC seals leaky pipeline at MIDC Bhosari in 'swift' action after 15 months

The pipeline is in front of Thermax and runs towards Tata engineering and locomotive company, Telco. Residents complained that the leakage from the water pipeline in Bhosari had turned the place into a small mushy pond.

The underground pipeline had been leaking and was making the place into a small mushy pond and now it has been repaired

PCMC, PMC to meet on pipeline issue

PIMPRI CHINCHWAD: The civic officials will meet their counterparts from Pune Municipal Corporation on the “slow pace” of the Bhama Askhed dam pipeline project.

कँटोन्मेंट निकषावर बोपखेल व पिंपळेसौदागर येथील बंद रस्ते खुले करावेत: आ. जगताप यांची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चारही बाजूने लष्कराची हद्द आहे. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतून जाणारे रस्ते व इतर सुविधांबाबतचे अनेक प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षण खात्याकडे सतत पाठ्पुरावा केला आहे.

Vandalism blitzkrieg in Pune: Over 10 vehicles damaged in third incident in two months

At least 10 vehicles were vandalised after a group of men attacked vehicles in Kharalwadi area of Pimpri on May 16. A similar incident was reported on the night of April 14, Ambedkar Jayanti, from Ambedkarnagar, an area approximately 2km from Kharalwadi. In January, two incidents of vehicle vandalism were reported in a night in Wakad, besides sporadic reports of torched or damaged vehicles.

The most recent incident happened on Tuesday midnight when the three accused arrived in the area, on a motorbike, and started vandalising cars, two-wheelers and autorickshaws in the colony.

Govt appoints 14 inspectors for PCMC police HQ

Pune: The state government on Friday set the ball rolling for the new Pimpri Chinchwad police commissionerate .

पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात होणा-या स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयासाठी १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून या निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी आज (शुक्रवारी) काढले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये घ्या हक्काचे घर

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे. आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उद्योगनगरीत आपले घर, बंगले, ऑफिस अथवा प्लॉट असावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी ज्योत्स्ना शिंदे

पिंपरी - महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक ज्योत्स्ना शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.

शाळेच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाईची सूचना

पुणे - मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना शालेय परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या बंदीबाबत माहिती द्यावी. तसेच शालेय परिसरात पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी केली.

Pan-Tapri

शालेय साहित्य ऑनलाइन

पुणे - छोटा भीमचे कव्हर असलेली नोटबुक... कार- बसच्या आकाराची कंपास पेटी... बॉर्बी डॉल असलेली वॉटर बॉटल अन्‌ कलरफुल आणि विविध संदेश असलेली स्कूल बॅग.... असं सारं काही आता घरबसल्या खरेदी करता येणार आहे. विविध संकेतस्थळांवर शालेय साहित्य खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यावर खास २० ते ५० टक्‍क्‍यांची सवलत देण्यात आली आहे. वॉटर बॉटल, कंपास पेटी, कलर्स आणि टिफिन बॉक्‍स असलेला खास बॉक्‍सही खरेदी करता येईल.

मेट्रोमुळे ६८८ मिळकतींना धक्का

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांदरम्यान ६८८ मिळकती बाधित होणार असून, या मिळकतींच्या पुनर्वसनासाठी येत्या एक जूनपासून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात ४४६ निवासी मिळकती, तर २४२ व्यावसायिक मिळकतींचे पुनर्वसन महामेट्रोला करावे लागणार आहे. 

मेट्रो रेल्वे लाईनच्या सुरक्षा रक्षकांना मिळत नाही पीएफ नंबर; महिन्याला तेराशे रुपयांची कपात

पुणे मेट्रोचे पहिल्या टप्प्यात लाईनचे काम चालू आहे. या लाईन वर सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षा एजन्सी कडून पीएफ (भविष्य निधी) नंबर दिला जात नाही.

Friday, 25 May 2018

डिजीटल लायसन्स आले हो!

वाहन चालविताना आवश्यक लायसन्स आणि आरसी बुक बाळगताना नागरिकांची होणारी तारांबळ आता संपुष्टात आली आहे. मोबाईलमध्ये ‘डीजीलॉकर’ अ‍ॅपच्या मदतीने लायसन्स आणि वाहनांची कागदपत्रे जतन केली जाणार आहेत. डिजीटल यंत्रणेमुळे लायसन्स हरवणे, वाहनांचे आरसी बुक न मिळणे, अशा तक्रारींना वाव राहणार नाही. केंद्र शासनाच्यावतीने ‘डीजीलॉकर अ‍ॅप’चे नुकतेचउद्घाटन करण्यात आले आहे. या अ‍ॅपबद्दल माहिती देण्यासाठी आरटीओ कार्यालयात  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

वाकडमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयावर ​परिसंवाद कार्यशाळा

तुम्हाला हे माहित आहे का? पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर जेवढे पाणी लागते त्याच्या 35 ते 40 टक्के पाण्याचा पुरवठा हा भूगर्भातून होतो... शहरातील लहान-मोठ्या कंपन्या, सोसायट्या ह्यांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते तसेच टँकरने होणारा पाणीपुरवठा हा सुद्धा बोअरवेलचाच असतो असे असले तरी पाण्याचा अतिप्रमाणात उपसा झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत कमालीची घट होतेय. भविष्यातील संकट ओळखून आपल्याला वेळीच उपाय केले पाहिजे. उपाय म्हणजे जसे आपण भूगर्भातून पाणी काढतो तसे भूगर्भात जास्तीतजास्त पाणी जिरवणे. याच विषयावर - 'भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्यजल संचयन (Rainwater Harvesting)' वाकडमध्ये दिनांक 27 मे, रविवार रोजी परिसंवाद कार्यशाळा आयोजित केली आहे.

विख्यात तज्ञ हिमांशु कुलकर्णी व शशिकांत देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे... तेव्हा कृपया हि संधी दवडू नये
-------------------------------------------
जाहीर निमंत्रण परिसंवाद
विषय : भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्य जल संचयन
रविवार दिनांक 27 मे 2018 सकाळी 10 ते 12:30
स्थळ : सभागृह, रोहन तरंग को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, वाकड चौक, वाकड, पिंपरी-चिंचवड
अधिक माहिती - https://www.facebook.com/events/361918100968914/

समांतर पुलाचे डांबरीकरण सुरू

हॅरिस पुलाला बांधलेल्या समांतर पुलाचे डांबरीकरण गुरुवारी सुरू झाले असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्यात येणार आहे. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या समांतर पुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.

रखडलेल्या रस्त्याचे काम होणार पूर्ण: प्राधिकरणाकडुन नागरिकांना नोटिस

वाल्हेकरवाडी (पुणे) - चिंचवड-रावेत या 34.5 मीटर रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटिसा बजावीत, घरे खाली करण्यास सागितले आहे. घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादन अभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणा पासून ते ओढ्या पर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून, त्याकरिता आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी आज वाल्हेकर वाडी येथील 60 व्यावसायिक बांधकामांना प्राधिकरणाने खाली करण्याच्या अंतिम नोटीस बजावल्या आहेत. 

लोहमार्गासाठी 2 कोटी ब्रास माती

पिंपरी - पुणे ते नाशिकदरम्यान प्रस्तावित लोहमार्ग पश्‍चिम घाट परिसरात येत आहे. या घाटात अनेक चढ-उतार असल्यामुळे त्यासाठी सुमारे दोन कोटी ब्रास माती लागणार आहे. या मातीच्या खरेदीपोटी रेल्वे प्रशासनाला तब्बल अठराशे ते दोन हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. त्याबाबतचा पाहणी अहवाल रेल्वे प्रशासनाने नुकताच रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. 

पवनामाईसाठी सरसावली तरुणाई

नवी सांगवी - ज्या नदीच्या पात्रात आम्ही बालपणी खेळलो, बागडलो, स्वच्छ पाण्यात पोहायला शिकलो, तिच्या काठाकाठाने फिरता-फिरता आंबट-गोड बोरे चाखली, त्या नदीची प्रदूषित अवस्था आता बघवत नाही. त्यामुळेच आमची पवनामाई स्वच्छ करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, ही भावना आहे पिंपळे गुरव येथील तरुणाईची. केवळ भावनाच नव्हे, तर प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरवात केलेली आहे. 

कुणाल कुमार स्मार्ट सिटीचे प्रमुख

पुणे महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांची स्मार्ट सिटीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याला स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेल्या कुमार यांना आता देशातील सर्वच शहरांमधील स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.

रुपीनगर येथील भाजी मंडईचा प्रश्न सुटणार?

निगडी – रुपीनगर परिसरात अनेक वर्षापासून भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबीत आहे. येथे अधिकृत भाजी मंडई नसल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विकतात. एवढ्या मोठ्या परिसराची गरज पूर्ण करणारी मोठी भाजी मंडई रस्त्यावर उतरल्याने रोज सकाळ-सायंकाळ या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते.

एच.ए.कंपनीची ५६ एकर जागा पोलीस आयुक्तालयासाठी घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील एच.ए. कंपनीची ५६ एकर जागा राज्य सरकारने घेतल्यास एच.ए. कंपनी आर्थिक संकटातुन बाहेर येईल. पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी पोलिस आयुक्तालय होईल. यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या व तेथील कामगारांच्या प्रश्नाबाबत आज खासदार श्रीरंग बारणे यांनी कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक नीरजा सराफ यांच्या समवेत बैठक घेवून चर्चा केली. या वेळी त्यांच्या समवेत सुनिल पाटसकर, अरूण बोऱ्हाडे व इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची पालिका प्रशासनाला सुचना

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वत्र खडड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पाऊसामुळे आणि जड वाहतूकीमुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होतात. पावसाळ्यात अस्तित्वातील खड्ड्यांमुळे त्यांचा आकार वाढून खोली वाढते. त्यामुळे वाहन धारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेवून येत्या पावसाळ्या अगोदर संपूर्ण शहर खड्डे मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनास लेखी निवेदनाव्दारे सुचना दिलेली आहे.

वाकड-पुनावळेत विकासकामांचा धडाका; एकाच दिवशी सहा कामांचे भूमिपूजन

पिंपरी (Pclive7.com):- वाकडमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. गुरुवारी (दि.२४) रोजी एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या १८ महिन्यात ही कामे पूर्ण होणार असून या कामांची निविदा रक्कम २६ कोटींच्या घरात आहे. 

वाकड – ताथवडे येथील रस्त्याच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २५, मधील वाकड – ताथवडे येथील २४ व १८ मीटर रुंद रस्त्याचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाले.

गंगानगर ते मराठी शाळा रस्ताचे काँक्रिटिकरण सुरू

सांगवी (पुणे)  :  जुनी सांगवी येथील गंगानगर ते मराठी प्राथमिक शाळा रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामास विद्यमान नगरसेवक व नागरीकांच्या हस्ते नारळ फोडुन सुरूवात करण्यात आली. गेली अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असलेल्या या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटिकरण होत असल्याने येथील शाळकरी मुले, जवळच असलेली खाजगी हॉस्पीटल्स व नागरीकांना रहदारीसाठी सोयीचा ठरणार आहे.

सांगवी स्मशानभुमी नुतणीकर एक वर्षाच्या कामाला दोन वर्ष

सांगवी : जुनी सांगवी येथील मुक्तिधाम स्मशानभुमी नुतनिकरणाचे काम गेली दोनवर्षापासुन सुरू आहे. कासव गतीने सुरू असलेले काम एक वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अपेक्षित होते. महापालिकेकडील संपादीत जागा व शिल्लक जागेवर काही जागामालकांनी मालकी हक्काचा दावा केला होता. जागेचा मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात या कामाची सुरूवात करण्यात झाली. एका वर्षाच्या मुदतीचा कालावधी असलेले काम गेली दोन वर्षापासुन सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल

पिंपरी - मुंबईत रूफ टॉप हॉटेलला लागलेल्या आगीत होरपळून 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने अनधिकृत हॉटेलवर हातोडा उगारला. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अशी 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यातून (आरटीआय) समोर आली आहे.

पीएमपी प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका?

इंधन दरवाढीमुळे मागील दोन महिन्यात डिझेलचा दर आठ रुपयांवर गेल्याने अडचणीत आलेल्या पीएमपीच्या तिकीट दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. जाहिराती आणि इतर माध्यमातून तग धरण्याचा प्रयत्न सुरु असला, तरी डिझेलचे भाव नियंत्रणात न आल्यास प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.

[Video] पेट्रोल दार वाढीविरोधी राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन !

पेट्रोल दार वाढीविरोधी राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन ! दिनांक २५/०५/२०१८

[Video] पिंपरी पालिकेचे राजन पाटील यांचा पदभार काढून घ्या- नितीन यादव

पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता राजन पाटील हे अकार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांच्यावर ठपका आहे त्यामुळे त्यांच्या पदभार काढून घ्यावा असे माहिती अधिकारातील कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक जावेद शेख यांनी अधिकाऱ्यालाच फासले काळे

पाण्याचे नियोजन होत नसल्याने राग अनावर

दिव्यांग कल्याणकारी केंद्रासाठी सल्लागार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र उभारण्यात येणार असून आता त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. मेसर्स के. बी. पी. सिव्हिल इंजिनिअरींग सर्व्हिसेस यांना हे काम देण्यात आले असून या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी (दि. 23) मान्यता दिली.

Thursday, 24 May 2018

Pimple Nilakh to get another STP

PIMPRI CHINCHWAD: Pimple Nilakh will get another sewage treatment plant (STP), courtesy the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

PCMC seeks citizens feedback to draw up city transformation strategy

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to draw up a city transformation strategy with the help of feedback from residents.

Unauthorised constructions up by 1.73 Lakh in PCMC in 2 years

PIMPRI CHINCHWAD: In its reply to a question raised by Shiv Sena group leader Rahul Kalate in the general body meeting on Monday, regarding the number of illegal constructions in Pimpri Chinchwad, the civic administration said that in the past two years, illegal constructions had increased by over 1.73 lakh in the twin cities.

Police HQ address final, alternative school construction still on

PIMPRI CHINCHWAD: The construction of the alternative school building in Akurdi is yet to be over even as the Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to rent out its school premises in Chinchwad for the temporary office of the police commissionerate.

Garbage-burning issue: State pollution board issues notices to Hinjewadi, Maan gram panchayats

The Maharashtra pollution control board (MPCB) has served show cause notices to Maan and Hinjewadi gram panchayats seeking a response on the complaints related to garbage burning in an open plot.

The recent garbage fire in the neighbourhood of Maan and Hinjewadi areas panchayats that lasted three days irked residents.

शहरातील २३ कोटींच्या विकासकामांना स्थायीची मान्यता

शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २३ कोटी ३ लाख ६६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

चिखलीतील डीपी रस्त्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी मंजूर

चिखली येथील राधास्वामी आश्रम येथील 24 मीटर डीपी रस्त्याचा दुसरा टप्पा विकसित करण्यासाठी आर्किटेक्ट व सल्लागार नेमण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासंदर्भात ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

प्राधिकरणाचे विलिनीकरण महापालिकेतच करावे – मारुती भापकांची मागणी

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये विलीन न करता पिंपरी चिंचवड महापालिकेत विलीन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

प्राधिकरणातील अनधिकृत घरांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे

प्राधिकरण हद्दीतील सर्व अनधिकृत घरांना, एचसीएमटीआर बाधित रहिवासी बांधकामांना तसेच, मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. उपमुख्यकार्यकारी अधिकारी भू-विभाग प्रशांत पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले.याप्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, सागर बाविस्कर, रेखा भोळे, सोनाली पाटील, माऊली जगताप उपस्थित होते.

निगडी : स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०१८ जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यांनी या कार्यकारिणीत नऊ प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. या कार्यकारिणीत आणखी काही पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड मनसेची कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यांनी या कार्यकारिणीत नऊ प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. या कार्यकारिणीत आणखी काही पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.

रहाटणीतील रस्त्याच्या कामाचे आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २७ मधील रहाटणी गावठाण कडे जाणा-या स.न. ४३ मधील १८ मीटर रुंद रस्ता विकसित करणेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाला.

[Video] महापौर नितीन काळजे संतापले !

भामा -आसखेड पाईपलाईनच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने महापौर नितीन काळजे संतापले!

भूखंडासाठी शाळांना अजब अट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शैक्षणिक प्रयोजनासाठी विकसित केलेले आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देण्याबाबत ऑनलाइन निविदा प्रसिद्ध केल्या. या निविदेत संस्थाचालकांना २५ ते शंभर वर्षे शाळा चालवण्याचा अनुभव असावा, अशी अट घातलेली आहे. ती अट शिथिल करावी; अन्यथा लहान शैक्षणिक संस्थांच्या शाळा कालांतराने बंद पडतील, असे हे भूखंड घेण्यास इच्छुक असलेल्या काही संस्थाचालकांचे म्हणणे आहे. 

पीएमपी घेणार 1000 बस

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात १००० बस घेण्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने बुधवारी घेतला. शहरातील वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन ५०० इलेक्‍ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश आहे. तसेच महिलांसाठी ३३ तेजस्विनी बस खरेदी करण्यासही या वेळी मंजुरी देण्यात आली. 

दापोडीत पदपथाचे व चेंबरचे काम प्रगतीपथावर

जुनी सांगवी - दापोडी येथील एस.टी.कार्यशाळा वळण रस्ता ते सांगवी दापोडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत करण्यात आलेल्या पदपथ व चेंबरचे काम पुर्ण झाले आहे. पुर्वीचा खड्डेमय रस्ता, वर खाली असलेली चेंबरची झाकणे यामुळे वहातुकीस होणारा अडथळा, अपघात टळणार आहेत. याचबरोबर पुलापर्यंत केलेल्या पदपथामुळे नागरीकांना पायी चालणे सोयीस्कर ठरणार आहे. 

पाणीबचतीसाठी सोसायट्यांचे वेळापत्रक

पिंपरी - टोलेजंग इमारतीत हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले. मात्र, महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. टॅंकर, बोअरवेल किंवा खासगी शेतकऱ्यांच्या विहिरींचा आधार घ्यावा लागतोय. त्यासाठी सोसायटीचा खर्च वाढतोय. त्याचा भार सदनिकाधारकांवर पडतोय. त्यातून पाणीबचतीची संकल्पना पुढे आली. ती सर्वांनी उचलून धरली. 

भोसरीत पुलाखाली जाहिरातबाजी

भोसरी - येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील खांबांवर अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याने खांबांचे विद्रूपीकरण झाले आहे. तरी, हे जाहिरात फलक हटवावे. तसेच, ते लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

डॉ. हेगडेवार स्केटींग मैदान 5 महिन्यांपासून बंद

पिंपरी – मासुळकर कॉलनी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्केटींग मैदान दुरुस्तीच्या नावाखाली मागच्या 5 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या मैदानाची दुरस्ती करण्यात आली असली तरी अनेक कामे आजही बाकी असून नव्याने तयार करण्यात आलेल्या या मैदानावर अनेक सुविधांची वानवा दिसून आली. तसेच या मैदानावर व परिसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली.

शास्ती कराविरोधात स्वाक्षरी मोहीम

पिंपरी – अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्ती कर रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी रूपीनगर येथे शिवसेनेच्या पुढाकाराने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने पाण्याची गळती थांबली

पिंपरी ः भोसरी-टेल्को रोड वर थरमॅक्स कंपनीच्या गेट समोर महापालिका  एम.आय.डी. सी च्या दोन मोठ्या पाईप लाईन मधून होणारी पाणी गळती दोन दिवसांच्या अथक प्रयत्नाने रोखण्यात यश आले आहे.

Wednesday, 23 May 2018

सीओईपी उभारणार रिसर्च व टेक्‍नॉलॉजी पार्क

शासनाने दिली चिखली येथील 11 हेक्‍टर जागा
पुणे– शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास (सीओईपी) चिखली (ता. हवेली) येथील 11 हेक्‍टर 30 आर इतकी जागा देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या जागेवर सीओईपीतर्फे रिसर्च व टेक्‍नॉलॉजी पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.