PUNE: Petrol prices have come down by Rs6.26 since the Octob ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 31 October 2018
Pune: PMPML bus goes up in flames, 17th bus to catch fire in two years
Passengers of a PMPML bus had a lucky escape on Tuesday as the vehicle went up in flames seconds after they alighted from it. This is the 17th PMPML bus to catch fire in two years. Speaking to this paper after the blaze was doused, bus driver Shankar Hingmare said that it was his first trip from Vishrantwadi to the PMC headquarters.
मुख्यमंत्र्यांची सभा ऐतिहासिक ठरणार; पालकमंत्री गिरीश बापट यांचा दावा
पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान आजवर दुरवस्थेत आणि दुर्लक्षीत राहिले. त्याला आम्हीच जबाबदार असल्याची कबुली देत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सभेच्या निमित्ताने मैदानाची दुरूस्ती केली असून यापुढे मैदान वापरात येईल, अशी माहिती दिली. तर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील बारा तालुक्यातून पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावणार आहेत. सभेची संपूर्ण तयारी धिंग्रा मैदानावर केली असून ही सभा ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वच्छ भारत अभियानासाठी पालिकेकडून जनजागृती
केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत घेण्यात येणार्या स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेट निविदा काढली आहे. घरोघरी जाऊन नागरिकांना सर्वेक्षणाची माहिती देणे, सुमारे अडीच लाख नागरिकांच्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड करणे, शाळा व महाविद्यालयात पत्रके वाटणे व चर्चासत्र आयोजित करणे आदी कामे खासगी एजन्सींच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
लघुउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करण्यात आला. पाठपुरावा करुनही वीज दरवाढ, शास्तीकर, माथाडी कायदा हे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
स्मार्ट सिटीचे ‘स्मार्ट’ संचालक जाणार बार्सिलोना दौ-यावर!
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि अधिकारी 11 ते 17 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्पेन देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणा-या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत सहभागी होणार आहेत.
स्थायी समिती झालीय ‘सल्लागार’ समिती; नगरसेवकांची उपरोधिक टीका
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन स्थायी समितीची पहिले तीन महिने धोरण समिती म्हणून हेटाळणी केला जात होती. आता बाहेर सल्लागार समिती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सल्लागारांचे घर भरण्याचे काम सुरु असून स्थायी समिती राहिली नसून सल्लागार समिती झाली आहे, अशी उपरोधिक टीका नगरसेवक विकास डोळस यांनी केली.
कुदळवाडीत अग्निशमन विभाग , व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्याची मागणी
एमपीसी न्यूज – दिवाळी सणादरम्यान संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी कुदळवाडीत अग्निशमन विभाग, व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका अग्निशामक विभागाचे प्रमुख किरण गावडे यांच्याकडे केली.
महिला पदाधिकारी विनयभंग तक्रारीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला मोर्चाच्या एका पदाधिकारी महिलेने पक्षाच्याच तालुकाध्यक्षावर विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीची पालकमंत्री गिरीश बापट यांनी दखल घेतली आहे. भोर- वेल्ह्यातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या आनंद देशमाने याच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याचे, पालकमंत्री बापट यांनी सांगितले. तसेच पिंपरी महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांवरील गुन्ह्याचे स्वरुप तपासावे लागेल, असेही ते म्हणाले.
शहरबात पिंपरी : विस्कळीत पाणीपुरवठा आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी
बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पाण्याच्या मुद्दय़ावरून सत्तारूढ भाजपला कोंडीत पकडण्याचे राजकारण अन्य पक्षांनी केले आहे. बुधवापर्यंत (३१ ऑक्टोबर) पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत महापालिकेची तहकूब ठेवलेली सभा बुधवारी होत आहे.
‘धावेल भारत, जोडेल भारत’ :सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ !
पिंपरी-चिंचवड: देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड येथे देखील सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ३१ रोजी सकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती पिंपरी-चिंचवडतर्फे एकता दौड निघणार आहे. यावर्षी ‘धावेल भारत, जोडेल भारत’ असा संदेश देण्यात आला आहे. स्पाईन रोड, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी मार्गे ही एकता दौड निघणार आहे. या एकता दौडमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी शास्तीकराचे गाजर
पिंपरी चिंचवड : निगडीमध्ये दि. 3 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा शहरवासीयांना शास्तीकर माफीचे गाजर दिले आहे, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. शहरातील 600 चौरस फुट आकाराच्या निवासी बांधकामधारकांना शास्तीकर माफी आणि 601 ते 1 हजार चौरस फुट आकाराच्या बांधकामांना 50 टक्के शास्तीकर अशी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. दिवाळीनंतर संगणक प्रणालीमध्ये बदल केल्यानंतर 15 दिवसात या कामाचा प्रत्यक्ष लाभ दिवाळीनंतर मिळणार असल्याचे भाजपाचे शहरातील नेते एकनाथ पवार यांनी जाहीर केले आहे.
दिवाळीनंतर शास्ती कर सवलतीची “मिठाई’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील 600 चौरस फुटाच्या निवासी बांधकामांना शंभर टक्के, 601 ते 1 हजार चौरस फुटाच्या बांधकामांना 50 टक्के शास्ती करात सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत बदल सुरू असून दिवाळीनंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. राज्य शासनाच्या महापालिका अधिनियम कलम 267 अ मध्ये दुरुस्तीची अंमलबजावणी 4 जानेवारी 2008 पासून केली आहे. 1 हजार 1 चौरस फुटांपुढील सर्व प्रकारच्या बांधकामांना पूर्वीप्रमाणे 200 टक्के शास्ती कर आकारणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास क्रीडांगणावर परवानगी देऊ नये -सचिन काळभोर
पिंपरी- भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहरचा निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर 3 नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. मात्र,राजकीय पक्षांना कार्यक्रम घेण्यास बंदी ठराव असल्याने मेळ्याव्यास परिवानगी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
आयुक्तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती
पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सोमवार दि. 29 ला काढले. या नियुक्तीनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायकडे पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक झाले असून आणखी फोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची आयुक्तालयास आवश्यकता आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थायी समितीत आयुक्तच “फैलावर’
पिंपरी- भोसरी-इंद्रायणीनगरमधील बॅडमिंटन हॉलच्या विकासकामाचा विषय मार्गी लावण्यासाठी धोरण ठरवावे लागेल, असे उत्तर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेत दिले. स्थायीचा निर्णय झालेला असतानाही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे फक्त भोसरीतील विकासकामांनाच धोरण ठरवावे लागत आहे, असे का? असा प्रश्न स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्त मात्र निरुत्तर झाले होते.
श्रीमंत महापालिका अन गरीब पोलीस आयुक्तालय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्तालय सुरु होऊन तीन महिने होत आले, तरीही आयुक्तालयाला अद्याप पुरेसे मनुष्यबळ व वाहने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे आशिया खंडात श्रीमंत असलेल्या महापालिका हद्दीतील गरीब पोलीस आयुक्तालय, अशी खंत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली.
मेट्रो मार्गातील अतिक्रमणे तातडीने हटवा
पुणे – पुणे महामेट्रोचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. तसेच शासकीय जागेमधील मेट्रोच्या मार्गिकेवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यातील बचतगट आता होणार “हायटेक’
सॅनफ्रान्सिस्को – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत बचतगटांच्या महिलांनी सॅनफ्रान्सिस्को येथे फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. यावेळी व्हॉट्सऍप व टीआयई संस्थेलाही त्यांनी भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
आता महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका होणार!
पुणे – नवीन विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकाची तरतूद होती. ह्या महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने आज जाहीर केले. त्यानुसार येत्या 30 जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यायलीन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एन्काऊंटर फेम राम जाधव यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती
पिंपरी :पोलीसनामा ऑनलाईन-महाकाली आणि शाम दाभाडे या कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर करणारे राम जाधव यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राम जाधव यांच्यासह नीलिमा जाधव यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
Tuesday, 30 October 2018
राहण्यासाठी लोकांची पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराला अधिक पसंती - रवींद्र भुसारी
भारतीय जनता पक्षाचे माजी संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी सोमवारी थेरगाव येथील भगवती पालम्स सोसायटीला भेट दिली. याप्रसंगी नगरसेविका व स्थायी समिती अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, तसेच प्रदेशाध्यक्ष आशिष मेरखेड उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण, शहराच्या जडणघडणीत संघाचे असणारे योगदान, सोशल मीडियाचे महत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयटीयन्सला उद्देशून केलेले भाषण अश्या विविध विषयांवर माजी संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी यावेळी अभ्यासपूर्ण चर्चा केली.
पिंपरी-चिंचवड शहराची जडणघडण, शहराच्या जडणघडणीत संघाचे असणारे योगदान, सोशल मीडियाचे महत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आयटीयन्सला उद्देशून केलेले भाषण अश्या विविध विषयांवर माजी संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी यावेळी अभ्यासपूर्ण चर्चा केली.
पिंपरी महापालिकेत रेकॉर्डवरचे २६ नगरसेवक
पिंपरी : शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करून पोलिस प्रशासनावर कोरडे ओढणाऱ्या नगरसेवकांपैकी २६ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फसवणूक, खून, हाणामारी, दरोड्याची तयारी असे गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अधिक आहेत. मागील दीड वर्षांत सात नगरसेवक आणि चार नगसेविकांच्या पतींवर गुन्हे दाखल झाले आहेत.
दिवाळीत फटाके फोडताना वायू प्रदुषण टाळा
पिंपरी चिंचवड : दरवर्षी दिवाळी उत्सवादरम्यान फटाक्यामुळे काही अनुचित घटना घडत असतात. यावर्षी तशाप्रकारच्या घटना घडू नये, याकरीता तसेच होणारे ध्वनी, वायू प्रदूषण टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून नागरिकांना सूचना करत त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेहरुनगर पीएमपी आगारात बस धुण्यासाठी यंत्र
पिंपरी चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या नेहरुनगर आगारात यंत्र क्रांती’ झाल्याने कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बसेस धुण्यासाठी आता यांत्रिक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने गेली अनेक वर्षे राबविणार्या हातांना आराम मिळाला आहे.
PMPML considers free bus rides for a day every month
PIMPRI CHINCHWAD: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) wants to start free bus rides for a day every month to encourage more commuters to use the public transport.
'तिसऱ्या मुंबई'चा तळेगाव हा केंद्रबिंदू : गिरीष बापट
पुणे : भविष्यात तिसरी मुंबई होणार असेल; तर तळेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते.
सतरा हजार बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस
पिंपरी - महापालिकेतर्फे शहरातील महापालिका रुग्णालये व दवाखान्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पोलिओ प्रतिबंधक लस या वर्षभरात १७ हजार १५ बालकांना देण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंतची ही स्थिती आहे.
पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. बालकांना दिव्यांग करणारा हा संसर्गजन्य रोग आहे. देशात १९९५ पासून पोलिओ प्रतिबंधक मोहिमेला सुरवात झाली. जागतिक आरोग्य संघटनेने २०१४ मध्ये भारताला १०० टक्के पोलिओमुक्त जाहीर केले. महापालिका रुग्णालयांमध्ये बालकांना जन्मत:च पोलिओचा डोस दिला जातो. त्यानंतर दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांचे बाळ झाल्यानंतर ओरल पोलिओ डोस दिला जातो. त्याशिवाय दीड आणि साडेतीन महिन्यांच्या बाळाला इंजेक्शनद्वारे पोलिओ डोस दिला जातो. ९ महिने आणि १.५ वर्षाचे बाळ झाल्यानंतर ओरल पोलिओ डोस दिला जातो.
स्वच्छतेचा ध्यास घेतलेला अवलिया
वाल्हेकरवाडी - प्लॅस्टिकमुक्ती, प्लॅस्टिकमुळे होणारे परिणाम इ. गोष्टींवर फक्त चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटामाटात स्वच्छता अभियान सुरू केल. अनेक नेत्यांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशनही केलं; पण फोटोसेशन संपलं आणि सावर्जनिक ठिकाणी पुन्हा कचरा दिसू लागला. रावेत भागात असाच कचरा साफ करण्याचं काम एक अवलिया गेल्या तीन वर्षांपासून करतोय.
खासगी ट्रॅव्हलची मनमानी
पिंपरी - तुम्ही जर खासगी ट्रॅव्हलच्या बसने बाहेरगावी जाण्याचे नियोजन करत असाल, तर जादाचे पैसे मोजण्याची तयारी ठेवा. ऐन सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हलने बसच्या भाड्यात तिपटीने वाढ केली आहे. परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी बैठकांचे सत्र
पिंपरी – गेली दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहराला भेडसावणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांवर महापालिकेत आता लोकप्रतिनिधींच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तरी पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत, याकरिता भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी (दि. 29) निगडी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात बैठक घेतली. काही दिवसांपुर्वी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यालयात याच विषयावर बैठक घेतली होती.
महावितरणकडून “आरटीआय’चा भंग
पिंपरी – महावितरण कंपनीकडे माहिती अधिकारात मागविलेली माहिती देण्यासंदर्भात गोपनीयता न पाळता अर्जदाराची माहिती ठेकेदाराला पुरविल्याचा आरोप विद्युत वितरण समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केला आहे. माहिती न देण्यासाठी या ठेकेदाराने धमकविल्याची तक्रार कोल्हटकर यांनी पोलिसांत दिली आहे. याशिवाय या प्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजकीय फटाके फुटणार!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचा कर्जत येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी भाजपने निगडी-प्राधिकरणात कार्यकर्ता मेळावा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने रहाटणी येथे कामगारांची परिषद घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची रणनिती आखली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची एकाच दिवशी शहरात सभा होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात
पिंपरी – निगडी-प्राधिकरणात येत्या 3 नोव्हेंबर रोजी होत असलेला भाजपचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सभेच्या व्यासपीठासाठी करण्यात आलेल्या बेकायदा वृक्षतोडीवरुन नाराजी व्यक्त होत असतानाच आता मेळाव्याच्या तयारीसाठी ऐन दिवाळीच्या सुट्टीत मदनलाल धिंग्रा मैदान सात दिवस बंद ठेवले जाणार आहे. त्याला प्राधिकरणातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र विरोध केला आहे.
उद्योजकांना भेडसाविणाऱ्या समस्यांचा उहापोह
पिंपरी – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करण्यात आला. पाठपुरावा करुनही वीज दरवाढ, शास्ती कर, माथाडी कायदा हे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
पूर्व “पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना न्याय कधी?
पिंपरी – पूर्व पीसीएमटी आणि पीएमटीचे विलीनीकरण होऊन पीएमपीएमएल प्रशासन अस्तित्वात आल्यानंतर पीसीएमटी कर्मचाऱ्यांच्या पूर्वी दिलेल्या सवलती, वेतनश्रेण्या रद्द करण्यात आल्या. पूर्व पीसीएमटीतील कर्मचाऱ्यांवर झालेला हा अन्याय दूर करावा आणि सेवानिवृत्त व सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना काढून घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांचा कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.29) काढले आहे.
अतिरिक्त आयुक्तपदी संतोष पाटील
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा संतोष पाटील यांनी आज सोमवारी (दि.29) पदभार स्वीकारला आहे. महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, पाटील यांची महिनाभरापूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी पालिकेत बदली झाली होती. महिन्याभरानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
पीएमपीमुळे वाहतुकीचे चार तास “ब्रेक डाऊन’
पिंपरी – रविवारच्या सुट्टीमुळे दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या आनंदावर पीएमपीने अक्षरशः विरजण घातले. पिंपरी मुख्य बाजारपेठेतील सर्वाधिक वर्दळीच्या शगुन चौकात पीएमपीची एक बस बंद पडली. तिच्यामुळे मागून येणाऱ्या दहा बस अडकल्या. पुढे-मागे होता येत नसल्याने या बसेसह खासगी वाहनेही या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
मोशीतील पादचारी पूल बनला मद्यपींचा अड्डा
मोशी- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील पादचारी पूल टवाळखोर, मद्यपींसाठी दारू पिण्याची हक्काची जागा झाली आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत, त्यामुळे भर चौकालगत “ओल्या पार्ट्या’ रंगत आहेत.
आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत “रेटींग” नुसार कर सवलत
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत आता रेटींग नुसार सामान्य करात सवलत दिली आहे. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील सोसायटींमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. या रेटींग मिळवणाऱ्या शहरी भागातील सोसायटींना सामान्य करात किमान 25 टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोसायटीने त्याच दर्जाचे काम केल्यास त्यांना केवळ 10 टक्केच सवलत मिळणार आहे.
सायन्स पार्कमध्ये फटाके व दुष्परिणामवर व्याख्यान
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परीषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील सभागृहात शनिवारी (दि.3) सायंकाळी साडेपाच वाजता विज्ञान व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठी विज्ञान परिषद पुणेचे कार्याध्यक्ष विनय र. र. हे फटाके व आरोग्यावरील दुष्परिणाम विषयावर व्याख्यान देणार आहेत, अशी माहिती सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी मदनमोहन साळवे यांनी दिली.
Monday, 29 October 2018
आठवडे बाजारचे चिंचवडला उदघाटन
एमपीसी न्यूज – ग्राहक व शेतकरी यांना जोडणार्या शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन स्थानिक नगरसेवक शीतल शिंदे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार किफायतशीर किमतीमध्ये ताजा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या आठवडे बाजारातून उपलब्ध करण्यात येणार असणार असल्याचे आयोजक व नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले.
MPCB to check air quality for 2 weeks on Diwali
PUNE: The Maharashtra Pollution Control Board (MPCB) has iss ..
शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादीच जबाबदार
शहरातील पाणीटंचाईस राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केले नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी फज्जा उडविला. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली. यावर उपाययोजना म्हणून भाजपने आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी आरक्षणासाठी यशस्वी पाठपुरावा करून मंजुरी मिळविली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असा टोला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना लगावला.
उद्योगनगरीत बसथांब्यांची दुरवस्था; प्रवाशांचे हाल
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये रोज लाखो चाकरमानी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक बससेवेचा वापर करतात; मात्र सद्यस्थितीत अनेक बसेसची दुरवस्था तर झाली आहेच, पण बसथांब्यांनाही अवकळा आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून हे बसथांबे त्यांच्यासाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरत आहेत.
शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पिंपरीत सामनाच्या अंकाची होळी
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सामनाच्या अंकाची होळी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एकनाथ पवारच शहरवासीयांचे खरे ‘नाथ’ : लक्ष्मण जगताप
प्रेम आणि सहाय्य करणा-याचा अनाथांना शोध असतो. अशी व्यक्ती त्यांच्यासाठी ‘नाथ’ असते. शहरातील अशा अनेक गरजू व्यक्तींना एकनाथ पवार यांनी सातत्याने सर्वतोपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी एकनाथ पवार त्यांचे ‘नाथ’च आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच भाजपाने त्यांना संधी दिली. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना हेरून त्यांना महापालिकेत पक्षनेता म्हणून मानाचे आणि तितकेच जबाबदारीचेही पद दिले. हे पद केवळ महापालिकेपुरता मर्यादित नाही. त्यामुळे एकनाथ पवार शहराचेही नेते आणि ‘नाथ’ आहेत, असे मत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा
एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानात दुपारी तीन वाजता हे महासंमेलन होणार आहे.
अधिकारी, कर्मचा-यांनो ठेकेदारांकडून ‘गिफ्ट’ स्वीकारु नका; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू (‘गिफ्ट’), देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थाकडून कुटुंबियाला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. गिफ्ट स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाईची कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
‘पालिका कर्मचाऱ्यांनी खासदारांची पत्रके वाटली असल्यास त्यांचे निलंबन करणार’
एमपीसी न्यूज – राजकीय दबाव जुगारुन भोसरीतील अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई केली. कारवाईच्या नोटीस सोबत खासदारांचे पत्रक पालिकेच्या कर्मचा-यांकडून वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र ही पत्रके बाहेरच्या व्यक्तींनी वाटली असण्याची शक्यता आहे. अधिकारी, कर्मचा-याने ही पत्रके वाटली असतील तर ती चुकीचीच बाब आहे. त्याची चौकशी करुन संबंधित कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल.
रिंग रोड बधितांच्या लढ्यास ५०० दिवस पूर्ण
पिंपरी चिंचवड : घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने बाधितांनी गेल्या वर्षी १४ जून २०१७ रोजी प्रस्तावित एचसीएमटीआर ३० मीटर रिंग रोड विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. या लढ्यास ५०० दिवस पूर्ण झाल्यामुळे आज रोजी पिंपळे गुरव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकर वाडी, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील ३५०० पेक्षा जास्त घरे ही प्रस्तावित २८ कि मी रिंग रेल्वे रोड प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. हजारो नागरिक रहिवाशी त्यामुळे रस्त्यावर येणार आहेत.
CCTVs to come up on bus-only lanes to prevent entry of private vehicles
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will install closed-circuit television (CCTV) cameras on Pune-Mumbai highway to prevent entry of private vehicles on the bus rapid transit system (BRTS) lanes.
“त्या’ जमिनी मालकी हक्काच्या करा
पिंपरी – प्राधिकरणाने संपादित केलेल्या अनेक जागा सर्वसामान्यांनी एजंट लोकांकडून बाजारभावाप्रमाणे खरेदी केलेल्या आहेत. अशा तीन गुंठेपर्यंतच्या जागा संबंधित नागरिकांच्या मालकी हक्काचे करून द्यावेत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.
हिंजवडी पाठोपाठ वाकड येथील वाहतुकीत बदल
पिंपरी – हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडवल्यानंतर या बदलाचा ताण वाकड परिसरात येत असल्याने वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर वाकड येथील वाहतुकीत देखील बदल केला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी 26 ऑक्टोबरपर्यंत नागरिकांच्या लेखी सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या.
कर सवलतीत शहरी-ग्रामीण भेदभाव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आदर्श पर्यावरण संतुलन सोसायटी बक्षीस योजनेत आता “रेटींग’ नुसार सामान्य करात सवलत दिली आहे. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील सोसायटींमध्ये भेदभाव करण्यात आला आहे. या “रेटींग’ मिळवणाऱ्या शहरी भागातील सोसायटींना सामान्य करात किमान 25 टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, ग्रामीण भागातील सोसायटीने त्याच दर्जाचे काम केल्यास त्यांना केवळ 10 टक्केच सवलत मिळणार आहे.
मेट्रोच्या संथगतीचा महापालिकेला फटका
पिंपरी- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी विद्युत पोल काढून टाकण्यासाठी आठ महिने विलंब झाला आहे. त्यापोटी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनने महापालिकेकडे 3 कोटी 37 लाख 50 हजार 872 रूपये जमा केले आहेत. मात्र, अद्यापही मेट्रोचे काम सुरूच असल्याने या रकमेतच सर्व विद्युत पोल काढावे लागणार आहेत. त्यामुळे ठेकेदाराला भाववाढ देण्याची नामुष्की महामेट्रोवर ओढावली आहे.
संकष्टीनिमित्त मोरया गोसावी मंदीरात गणेशभक्तांची गर्दी
पिंपरी –संकष्ट चतुर्थीनिमित्त चिंचवडगावातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी भाविकांच्या पहाटेपासूनच मंदीरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
बहिणाबाई प्राणी संग्रहालयात मानधनावर भरती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात मानधन तत्त्वावर तीन पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी पशूवैद्यक अधिकारी पदावरी नियुक्तीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या मासिक मानधनावर होणाऱ्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.
दिवाळीच्या तोंडावर वल्लभनगर आगार ओसाड
पिंपरी – अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी आली असली तरी पिंपरी-चिंचवड येथील राज्य परिवहन (एस. टी.) महामंडळाचे वल्लभनगर येथील आगार ओस पडले आहे. सततची इंधन दर वाढ व कर्मचाऱ्यांचा वाढता खर्च यामुळे आगाराच्या महसूलाची आवक पेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यातच पुरेसे प्रवासी नसल्याने दहा गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी ?
पिंपरी – एका बाजुला पोलीस आयुक्त, “”पोलिसांना मित्र समजा, इथून पुढे तुम्ही पोलिसांकडे नाही तर पोलीस तुमच्याकडे येतील”, असे खसा खरडून सांगत आहेत. मात्र त्यांचेच पोलीस अधिकारी फिर्यादींचा अवमान करणे, त्यांना ताटकळत बसवणे असे प्रकार करत आहेत. त्यावर कडी करत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादीलाच मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या मुजोरीला आवर कधी असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.
प्रशासनाच्या विरोधात फेरीवाल्यांचा पालिकेवर मोर्चा
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अधिपासुन व स्थापनेपासून फेरीवाला अस्तित्वात आहे, फेरीवाला कायदा झाला आहे, ही समाधानाची बाब असली तरी शहरात व्यवसाय करणारे हातगाडी, टपरी, स्टॉल धारकांना जोपर्यंत कायद्यानुसार लाभ मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत विविध मागन्यांसाठी फेरीवाल्यानी आज शुक्रवारी (दि. 26) महापालिका भवनावर मोर्चा काढला.
Pune: Senate members want SPPU to get active on social media
From social media outreach to starting its mobile application, members of the Senate have put forward several suggestions before the Savitribai Phule Pune University (SPPU) in a bid to make it more tech-savvy and reachable to students.
Saturday, 27 October 2018
PCMC carries out 4-day anti-encroachment drive
NAVI MUMBAI: The Panvel City Municipal Corporation (PCMC) be ..
PCMC to develop six spots along two rivers
PIMPRI CHINCHWAD: The civic body will develop six spots along the Pavana and the Indrayani as part of its river development project.
Mayor Rahul Jadhav on Thursday said the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will develop boating facilities, cycle tracks, pathways and children’s play zone in these spots as the area along the river is a no-development zone.
Mayor Rahul Jadhav on Thursday said the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will develop boating facilities, cycle tracks, pathways and children’s play zone in these spots as the area along the river is a no-development zone.
मेट्रो डीपीआरचे पालिकेत सादरीकरण
पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या वाढीव मेट्रो मार्गिकेच्या विस्तृत प्रकल्प आराखडा अहवालाचे (डीपीआर) सादरीकरण महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर गुरुवारी (दि. 25) केले. या 4.9 किलोमीटर अंतराच्या वाढीव मार्गासाठी 1,100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्यातच पूर्ण करण्यास महामेट्रो प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सदर डीपीआर मंजुरीसाठी पालिका राज्य शासन व केंद्राकडे पाठविणार आहे.
गुरुकुल मधील वंचित मुलांचा सत्कार व नेत्र तपासणी
पिंपरी (Pclive7.com):- आदित्य माने व विक्रम माने यांच्या पुढाकाराने लायन्स क्लब ऑफ आकुर्डीच्या सहकार्याने चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील वंचित ४०० मुलांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. अमेरिकेतून खास आयात केलेल्या अत्याधुनिक नेत्र तपासणी मशिनद्वारे येथील ३ ते १० वयोगटातील लहान मुलींच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गुरुकुल मधील वर्गात प्रथम येणाऱ्या मुलांचा प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरातील दत्तक योजनेतील 45 खेळाडूंसाठी 1 कोटींचा खर्च
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 45 खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खेळाडूना दत्तक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यांना 2 वर्षे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रूपये खर्चाला क्रीडा समितीने शुक्रवारी (दि.26) मंजुरी दिली.
‘लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुलविण्याचा भाजपचा निर्धार’
एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर मतदार संघातून आजपर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुललेच पाहिजे. या इर्षेने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. भाजपचे खासदार निवडून आणून मित्र पक्ष शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्यात यावी, असा निर्धार भाजपच्या आढावा बैठकीत करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या स्वच्छ पवनामाई अभियानात ज्युनिअर मकरंद अनासपुरे करणार श्रमदान
एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न’ या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वात पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक कलाकार, सिने अभिनेते, अभिनेत्री, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात उपस्थित राहून श्रमदान केले.
अनधिकृत नळजोडांवर होणार कारवाई
पुणे : सोमवारपासूनच पाणीकपातीची घोषणा केल्यानंतर आता महापालिका प्रशासन अनधिकृत नळजोडांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे. दिवाळीनंतर कारवाईची ही धडक मोहीम सुरू होणार आहे. महापालिका हद्दीत 35 हजारांपेक्षा जास्त अनधिकृत नळजोड आहेत. मात्र यातून सर्रास पाणीवापर केला जातो. यातील अनेक नळजोडांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होतो.
चिखली – स्पाईनरोड परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने चिखली परिसरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डींगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 37 बेकायदा फ्लेक्स आणि सुमारे 100 होर्डींग काढून टाकण्यात आले. महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जुना आरटीओ चौक, चेरी चौक, स्पाईनरोड भाजी मंडई परिसर वक्रतुंड हॉटेल, साने चौक भाजी मंडई, शिवम मार्केट, साने चौक, मथुरा स्विट होम, कस्तुरी मार्केट या ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते.
रोजगारनिर्मीतीसाठी 2 व 3 नोव्हेंबरला बुके सजावट कार्यशाळा
पिंपरी चिंचवड : संत तुकारामनगर येथील ओम फ्लॉवर इन्स्टिट्यूटच्यावतीने येत्या 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी फुले सजावट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा संत तुकारामनगर पिंपरी येथील ऍटलास कॉलनी हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे संस्थापक केशव त्रिभुवन यांनी दिली.
काँग्रेसची सीबीआय-एसीबीच्या कार्यालयासमोर निदर्शने
पिंपरी चिंचवड : केंद्र सरकार ‘सीबीआय’च्या कामकाजात हस्तक्षेप करून दबाव वापरत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने आज शुक्रवारी आकुर्डीतील सीबीआय-एसीबीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
स्मार्ट सिटी’तील करमणूक फुकाची! यांची यत्ता कंची?
गेल्या दोन-तीन महिन्यांचा आढावा घेतला, तर पिंपरी-चिंचवडमधील या राजकारण्यांना तुमची ‘यत्ता कंची’ असे विचारण्याची वेळ आली आहे. कारण महापालिकेत डुकर, कुत्रे, घुबड घेवून नगरसेवक येवू लागले आहेत. हे कमी आहे म्हणून की काय आमदार आणि खासदारही बेताल झाले आहेत. ‘शहराचा विकास गेला चुलीत, आपल्या प्रसिध्दीचे ढोल वाजत राहिले पाहिजेत’ असा ‘स्वच्छ हेतू’ सर्वांचा आहे. त्याचमुळे ‘बदनाम ही सही, नाम तो पहचानासा हो गया ना…!’ अशी त्यांची भूमिका आहे. दुर्दैवाने या शहरात अशा वाचाळवीर, बोलभांडांना जाब विचारणारी माणसं किंवा संघटना नाहीत. याचमुळे सगळी वाट लागली आहे.
गुटखाबंदीची ‘ऐशी की तैशी’
पिंपरी - राज्यात गुटखाबंदी लागू झाली असली तरीही शहरात छुप्या पद्धतीने गुटखा, सुगंधित मिक्स सुपारी, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांची विक्री होत आहे. या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचविण्यासाठी गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
रावेतमध्ये साकारतेय अत्याधुनिक स्मशानभूमी
वाल्हेकरवाडी - रावेतकरांना बहुप्रतीक्षित असलेल्या स्मशानभूमीच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक ३२ अ मधील जाधव घाटाजवळच्या आरक्षित जागेवर अत्याधुनिक गॅसवरील शवदाहिनीसह स्मशानभूमी विकसित होणार आहे. मात्र या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे.
महिनाभराच्या कालावधीसाठी हिंजवडीतील वाहतुकीत बदल
चौफेर न्यूज :– पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत सध्या सुरू असलेले बदल पुढे एक महिन्यापर्यंत कायम ठेवले आहेत.
पिंपरीत झाड तोडणाऱ्यांवर आता मालमत्ता चोरीचा गुन्हा
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वृक्षतोड सुरू आहे. फांदा छाटणीच्या नावाखाली संपूर्ण वृक्षच कापून नेण्याचा धंदा शहरात तेजीत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पालिका नियम कठोर नसल्याने त्यास आळा बसत नाही. त्यामुळे नियमात बदल करून वृक्ष तोडीप्रकरणी मालमत्ता चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सूचना वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. सदर नियम अंमलात आल्यानंतर वृक्षतोड करणाऱ्यांना तुरूंगाची हवा खावा लागणार आहे.
जगण्याच्या हक्कासाठी मनपासमोर फेरीवाला आंदोलन
पिंपरी – फेरीवाला कायदा अस्त्विात येऊनही फेरीवाल्यांना त्यानुसार लाभ मिळत नाही. लाभ तर दूर परंतु कित्येक ठिकाणी फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे जगण्याच्या हक्कासाठी लढा देण्याची वेळ आली आहे, असे सांगत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले.
तणावपूर्ण शांततेत 140 अतिक्रमणांवर हातोडा
पिंपरी – अख्ख्या शहराचे लक्ष लागलेल्या भोसरीतील बहुचर्चित अतिक्रमणांवर अखेर महापालिकेने आज हातोडा टाकला. चोख पोलीस बंदोबस्तात सुमारे 140 छोटी-मोठी दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षानंतर राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाने मोकळा श्वास घेतला आहे. आजपर्यंतची भोसरीतील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
हिंजवडी बनतेय “गुन्हेगारीचे हब’
पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हिंजवडी आयटी पार्क आता “समस्यांचे हब’ म्हणून नावारुपाला येत आहे. तेथील वाहतूक कोंडी तर जगप्रसिद्ध आहेच पण याठिकाणी गुन्हेगारीनेही आता डोके वर काढले आहे. रसिला खून प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करुनही महिलांची असुरक्षितता कायम असल्याचे शुक्रवारी (दि. 26) उघड झालेल्या तरुणीच्या अपहरण प्रकरणावरुन समोर आले आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडीत झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी
पुणे – वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात यावे. जर एखाद्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या प्रशासनाला दिले आहेत.
महापालिका आयुक्त शिवसेनेच्या “रडार’वर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणजे सत्ताधारी भाजपचे दलाल आहेत. आतापर्यंतच्या आयुक्तांमध्ये सर्वात निष्क्रीय आयुक्त म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, अशी टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Friday, 26 October 2018
PCMC’s 24X7 water supply projects run into trouble
The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s 24X7 water supp ..
Police to set up complaint boxes in Pune housing societies
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad police will undertake ..
Pimpri, Chinchwad's new flat owners struck with water paucity
Thousands of flat owners in the twin towns of Pimpri and Chinchwad have been gripped with acute water shortages for a while now. These are the same habitants who had probably emptied all their savings in purchasing houses at Dighi, Moshi , Charoli, Dudulgaon, Chikali among other areas
विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे रविवारी महारक्तदान शिबीर
पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने रविवारी (दि.२८) शहरात व मावळ विभागात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २ नोव्हेंबर १९९० रोजी कारसेवकांवर झालेल्या गोळीबारात हौताम्य प्राप्त झालेले कोठारी बंधू आणि हजारों रामभक्तांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या या शिबीरात रक्तदान करण्या-या सर्वांना बजरंग दलाच्या वतीने टी शर्ट भेट देण्यात येणार आहेत.
शहर परिवर्तन विकास आराखड्यासाठी पालिकेच्या शहर सुधारणा समितीचा परदेश दौरा
पिंपरी-चिंचवड शहराला नवीन स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी पिंपरी-चिंवड महापालिकेने खासगी तत्वावर शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रॉन्सर्फामेशन ऑफीस-सीटीओ) कार्यान्वित केले आहे. कार्यालयाकडून शहर परिवर्तन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. असे असतानाही शहर सुधारणा समितीने परदेश दौरा निश्चित केला आहे. त्यात कोणत्या देशाची पाहणी करणार हे निश्चित नसून, त्याचा खर्चाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.
आरटीओची ट्रॅव्हल्स चालकांसोबत बैठक
पुणे – शासन नियमानुसार राज्य परिवहन (एसटी) तिकीटदरापेक्षा दीडपट जादा भाडे आकारण्याचा अधिकार ट्रॅव्हल्सचालकांना आहे. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणी प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील ट्रॅव्हल्स संघटनांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. यात जादा दर न घेण्याच्या सूचना देण्यात येणार असून दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दिवाळीच्या तोंडावर ‘पीएमपीएल’च्या बस नादुरुस्त
दिवाळीचे साहित्य खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना ‘पीएमपीएल’च्या नादुरुस्त बसचा फटका बसणार आहे. दिवाळीत प्रवााशांची संख्या वाढत असताना, महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावणे आवश्यक आहेत. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली अथवा पासिंगच्या कारणामुळे विविध आगारात जवळपास एकुण 50 ते 60 बसेस आगारातच पडून आहेत.
भाजप नगरसेवकांना झालयं तरी काय?, दीड वर्षात पाच नगरसेवकांवर गंभीर गुन्हे !
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी ‘भयमुक्त’ शहराचा नारा देत सत्ता काबीज केलेल्या भाजप नगरसेवकांपासूनच आता ‘अभय’ मागण्याची वेळ मतदारांवर आली आहे. कारण, गेल्या दीड वर्षात भाजपच्या तब्बल पाच नगरसेवकांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तर, तीन नगरसेविकेच्या पतीवर गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकसभेची तयारी; रावसाहेब दानवे उद्या घेणार संघटनात्मक आढावा
एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार संघटनात्मक आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्या (शुक्रवारी) आढावा घेणार आहेत. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये शुक्रवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे.
पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुधाराचा ‘डीपीआर’ तयार
एमपीसी न्यूज – साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीवर नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट (एचसीपी)सल्लागाराने तयार केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी पेटले
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पिण्याचे पाणी देण्यासाठीच्या आरक्षणास राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने फक्त मुदतवाढ दिली. या धरणातील पाण्याच्या आरक्षणास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे पाण्याचे आरक्षण रद्द झाले होते. आता शहरासाठी आम्ही पाण्याचे आरक्षण मंजूर केल्याचा ढोल भाजपचे पदाधिकारी बडवत आहेत; तर हे भाजपचे सर्वात मोठे अपयश असल्याची टीका पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
नव्या वर्षांत केस कापण्यासाठी मोजा १०० रुपये
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केशकर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापुढे साध्या दाढीसाठी पन्नास रुपये तर, केस कापण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या वर्षांपासून म्हणजे एक जानेवारीपासून या दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वाकड जलकुंभाची प्रकीया पूर्ण करावी – नगरसेवक कस्पटे
वाकड : या परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी येथील नियोजित जलकुंभाची निविदा काढून कामाला सुरुवात करावी अशी मागणी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाकडमधील दत्त मंदिर रस्ता व कस्पटेवस्ती येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प निर्माण झाले आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. परंतु या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी याच परीसरात स्वतंत्र जलकुंभ उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
निगडीतील सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील वाहनतळ प्रकरण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील आरक्षित वाहनतळावर बेकादेशीरपणे कब्जा करणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच वाहनतळाचा ताबा कोणाकडे आहे, याचा शोध घेण्यात यावा. वाहनतळाची पाहणी करावी, याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
PCMC issues notice to garden dept chief over illegal cutting of trees
PCMC issues notice to garden dept chief over illegal cutting of trees
Smart City development projects set to be completed by March 2022
PIMPRI CHINCHWAD: The civic body will start construction and ..
Pimpri Chinchwad to get 406 MLD additional water
PIMPRI CHINCHWAD: Citizens can expect better water supply wi ..
Pipeline work from Bhama Askhed dam may restart
PUNE: The stalled work on the Bhama Askhed water pipeline is ..
Public bicycle plan to cover more areas
PIMPRI CHINCHWAD: The second phase of the public bicycle sha ..
झोपडपट्टीधारकांऐवजी मतांकडेच लक्ष
पुणे - सुस्तीतील विरोधक, मस्तीत असलेले सत्ताधारी आणि बाबूशाहीच्या वर्चस्वामुळे शहरातील झोपडपट्टीधारकांना कोणीच वाली राहिला नसल्याचे दिसत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ४० टक्के जनता झोपडपट्टीमध्ये राहते. मात्र, मतपेटीपलीकडे कोणताही राजकीय पक्ष झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.
बसथांब्यांचाच अडसर
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असणाऱ्या चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगाला पीएमपीचे बसथांबे अडथळा ठरत आहेत. शिवाजी चौकात पीएमपीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चक्राकार वाहतुकीला अडथळा ठरणारे तीन बसथांबे अन्यत्र हलविण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असला तरी त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिस पुन्हा एकदा पीएमपीला स्मरणपत्र पाठवणार आहेत.
रेशनकार्डधारकांची दिवाळी एक किलो साखर व डाळी
पुणे - खास दिवाळीनिमित्त गहू, तांदूळ आणि तूरडाळीबरोबरच रेशनवर जादा साखर, उडीद आणि चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
भोसरीत आज अतिक्रमणांवर “दणका’
पिंपरी – भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या अतिक्रमणावर महापालिका शुक्रवारी (दि. 26) मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करणार आहे. दरम्यान पोलिसांनी गुरुवारी येथील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना नोटीसा बजाविल्या आहे. या अनधिकृत पथारी टपरीवर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खरंच कारवाई होणार का याकडे अख्ख्या शहराचे लक्ष लागले आहे.
11 हजार 310 नागरिकांना “स्वाईन फ्लू’ची लस
पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’ने जानेवारी महिन्यापासून कहर केला होता. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी “स्वाईन फ्लू’ची लस देण्यात येते. शहरात हा आजार बळावल्यानंतर जानेवारी महिन्यापासून अद्यापपर्यत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे “स्वाईन फ्लू’ची लस अकरा हजार तीनशे दहा नागरिकांना देण्यात आली आहे. सध्या लसीचा पुरवठा सुरळीत झाल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
Thursday, 25 October 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यातील तंज्ज्ञांशी संवाद
पंतप्रधान नरेंद मोदी यांचा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ज्ञांशी संवाद.
चाळीस हजार लॉंड्री व्यावसायिकांना सोलरसाठी अनुदान : ऊर्जा मंत्री
राज्यभरात चाळीस हजार कुटुंबे लॉंड्री व्यवसाय करत आहेत. त्यांना सध्या दिलेल्या वीजदराच्या सवलतीचा फायदा होणार आहे. पुढील तीन वर्षात विजेमध्ये क्रांती होणार असून, अपारंपरिक ऊर्जा देणे, कचर्यापासून वीजनिर्मिती असे वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. त्याचसोबत सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे लॉंड्री व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानाच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवून घ्यावेत त्यासाठी शासन २५ टक्के अनुदान देण्याची घोषणा करून त्याचा फायदा राज्यातील चाळीस हजार लॉंड्री व्यावसायिकांना होणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पोलीस करणार मल्टीपर्पज ड्युटी – आर के पद्मनाभन
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर विविध शाखा आणि विभाग सुरु करण्यात आले आहेत. पण मनुष्यबळाची कमतरता आयुक्तालयला पावलोपावली जाणवत आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आयुक्तालयाचा कारभार सुरू आहे. वाढत्या कामाचा व्याप आवरण्यासाठी एक पोलीस एका वेळी अनेक कामे करणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय योगपटूंचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार
एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय योगपटूंचा व योग साधकांचा महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे डिस्ट्रीक्ट योगा ऍण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात या सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, भारतीय योग संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागी आता खुले प्रदर्शन केंद्र
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्याच्याऐवजी आता खुले प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदर्शन केंद्राच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सभा झाली.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा वाहतूक नियंत्रण कक्ष आज (बुधवार) पासून सुरू करण्यात आला आहे. वाकड मधील जुने वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे.
महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट; आता फर्निचरसाठी सल्लागार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असताना रस्ते, उड्डाणपूल बांधण्यापासून आता फर्निचर बसविण्यापर्यंत सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे पेव फुटले आहे. महापालिकेत सल्लागारांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या सव्वा ते तीन टक्के रुपयांची उधळपट्टी केली.
नदीसुधार आराखड्याचे सादरीकरण
सरकारच्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केला असून, त्याचे सादरीकरण पर्यावरण विभागाने पदाधिकाऱ्यांसमोर बुधवारी केले. आराखडा लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
पवनेची महाआरती
नदी संवर्धनासाठी कार्यरत जलदिंडी प्रतिष्ठानच्या दशकपूर्तीनिमित्त चिंचवड येथील महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी घाटावर पवना नदीची मंगळवारी (२३ ऑक्टोबर) रात्री महाआरती करण्यात आली.
मेट्रो प्रकल्पासाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत
पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या कामात कोणतीही चूक राहू नये यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशात पहिल्यांदाच ५ डी-बीम या तंत्रज्ञानाचा वापर पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी होत असून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खर्चापासून ते वेळेच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
Cell to boost coordination amid various transport bodies
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will form a transportation cell for better coordination between various transport bodies, including PMPML and BRTS.
भामा, आंद्रातून पिंपरीला पाणी
पिंपरी - पाणीटंचाईच्या समस्येने हैराण झालेल्या पिंपरीवासीयांना दिलासा देणारा निर्णय झाला असून, भामा आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी घेण्याच्या फेरप्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. महापालिकेने हा प्रकल्प वेगाने मार्गी लावल्यास दोन-तीन वर्षांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल.
आंद्रा, भामाचा प्रस्ताव मंजूर
पिंपरी - आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पिंपरी-चिंचवड शहरासाठी २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याच्या महापालिकेच्या फेरप्रस्तावाला पाच मंत्र्यांच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे. येत्या दोन-तीन वर्षांत शहराला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात एक टीएमसीने वाढ झाल्यास त्याचा फायदा सध्या पाणीटंचाईने हैराण झालेल्या व सध्या वेगाने विकसित होत असलेल्या शहराच्या पूर्व भागातील लोकांना होईल.
‘मावळे’ अन् आकर्षक किल्ले विक्रीसाठी
पिंपरी - दिवाळीनिमित्त राजस्थानी कारागिरांनी बनविलेल्या तयार किल्ल्यांना वर्षागणिक मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे मुलांचे घरासमोर किल्ले बनविण्याचे प्रमाण कमी होत असून, बाजारात एक ते तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले उपलब्ध होत आहेत.
“अभय’तून 21 कोटींचा मिळकत कर जमा
पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे अभय योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर अखेर 21 कोटी 37 लाख रुपयांचा कर जमा झाला असून 5 हजार 213 मिळकत धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी – जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था आयोजित वक्तृत्त्व स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिसरातील 24 शाळांनी तिसरी व चौथी तर 27 शाळांनी पाचवी व सातवी गटात सहभाग घेतला. बजाज प्रकल्प प्रमुख व विश्वस्त संजय भार्गव, प्रकल्प सल्लागार डॉ. चित्रा सोहनी, सहा. व्यवस्थापक के.बी.वाळके, सचिव पार्थसारथी मुखर्जी, तरसे परीक्षक म्हणून ललिता आगाशे, दत्तात्रय तापकीर, अनघा दिवाकर, मनीषा बोरा यांनी काम पाहिले.
पाण्याची पातळी खालावल्याने पाणी पुरवठा विस्कळीत
पिंपरी – रावेत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा बुधवार (दि. 24) आणि गुरुवारी (दि. 25) पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
शिक्षक वर्गीकरणाचा महापालिका तिजोरीवर “भार’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य शासनाच्या 2017 च्या निकषानुसार शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण आणि एकतर्फी बदली सेवा वर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या शाळेतील मोठा पगार घेणारा शिक्षक पालिकेच्या शाळेत आल्यास त्याच्या मासिक वेतनाचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. मुख्याध्यापकांच्या 6 आणि शिक्षकांच्या 124 पदांवर शिक्षकांचे वर्गीकरण होणार आहे. या शिक्षकांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाचा भार महापालिका तिजोरीवर पडणार आहे.
अखेर प्राधिकरणाचे एक पाऊल मागे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) शैक्षणिक भूखंड भाडेपट्ट्याने देण्यासाठी इच्छूक संस्थांकडून दोनदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्राधिकरणाने निविदेतील अटी-शर्ती शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगनगरीत फसवण्याचे फंडे “स्मार्ट’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. फसवणुकीचे फंडे एवढे “स्मार्ट’ आहेत की यामध्ये उच्चशिक्षित, उच्च पदस्थ अधिकारी देखील गळाला लागत आहेत. ऑनलाईन व धनादेशाद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या स्थापनेपासून म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर तीन महिन्यांत सुमारे 50 घटना घडल्या आहेत.
आकुर्डीतील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक केंद्र धूळखात
पिंपरी – शहरातील आकुर्डी येथील विवेकनगर परिसरात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची दूरवस्था झाली आहे. मद्यपींनी याठिकाणी कब्जा केला असून परिसरात बाटल्यांचा खच जमा झाला आहे. महापालिकेने लाखो रूपयांचा खर्च करून इमारतीचे काम केले आहे. मात्र, याठिकाणी सुरु असलेल्या गैरकारभाराबाबत स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.
चिखली – स्पाईनरोड परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
चौफेर न्यूज – चिखली परिसरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डींगवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने बुधवारी कारवाई केली. या कारवाईत ३७ बेकायदा फ्लेक्स आणि सुमारे १०० होर्डींग काढून टाकण्यात आले.
पोलिस आयुक्तालयातील 48 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या
चौफेर न्यूज ः पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 48 सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या नियुक्त्या मंगळवारी (दि. 23) पोलिस आयुक्त आर.के.
पद्मनाभन यांनी केल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. याच महिन्यात तीन तारखेला पिंपरी, हिंजवडी, निगडी, चिखली आणि इतर पोलीस
ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
Wednesday, 24 October 2018
चार भागांनुसार घरोघरचा कचरा संकलन व वाहतुकीची निविदा प्रक्रिया कायम – आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी-चिंचवड शहराचा घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याचा कामासंदर्भात स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे शहराचे 4 भाग करून सुरू असलेली निविदा प्रकिया कायम ठेवण्यात आली आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी(दि.22) पत्रकार परिषदेत सांगितले.
मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा”, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची प्रशासनावर टीका
रावेत येथील बंधा-यावरून जेवढे पाणी उचलले जाते. त्यातील 40 टक्के पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्याऐवजी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, म्हणजे “मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा” अशातला हा प्रकार आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ; ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग क्षेत्रातील स्वच्छतेची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.22) अचानक पाहणी केली. स्वच्छातागृह अस्वच्छ होते. तसेच राडारोडा पसरलेला होता. अस्वच्छतेला कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, मुकादमाचा एक दिवसाचा पगार कापण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच प्रभाग अधिका-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
प्रभारी अतिरिक्त आयुक्तांनी भांडार विभागाचे केलेय दुकान – राजू मिसाळ
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी भांडार विभागाचे अक्षरश: दुकान केले आहे. भांडार विभाग दिवाळखोर मानसाच्या हातामध्ये दिला आहे. त्यांच्याबद्दल असंख्य तक्रारी असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना वारंवार पाठिशी घालत आहेत.
आमदार आपल्या दारी गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन
एमपीसी न्यूज – विविध शासकीय योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी एकाच दिवशी मार्गी लागण्यासाठी दि. 25 ऑक्टोबरला चिंचवड मोहननगर येथे ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीचे शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘बेकायदा वृक्षतोड करणा-यांवर आता फौजदारी कारवाई’
एमपीसी न्यूज – वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. झाडाची छाटणी करण्याची परवानगी असताना बुंध्यापासूनच झाड तोडले जात आहे. सर्रासपणे झाडांची कत्तल केली जात आहे. यापुढे विनापरवाना झाड कापल्यास सार्वजनिक मालत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. झाडाची कत्तल करुन घेऊन जाणारी वाहने जप्त करण्यात येणार आहेत.
वाहनतळावर बेकायदा कब्जा करणा-यांवर कारवाई; आयुक्तांचा आदेश
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील आरक्षित वाहनतळावर बेकादेशीरपणे कब्जा करणा-यांवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच वाहनतळाचा ताबा कोणाकडे आहे? याचा शोध घेण्यात यावा. वाहनतळाची पाहणी करावी. याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
वायसीएम रुग्णालयात दीड कोटीचे फर्निचर बसविणार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नवीन फर्निचर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च होणार आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभेत आयत्या वेळी या विषयाला मंजुरी देण्यात आली. संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे.
शहरबात : वाढत्या गुन्हेगारीची चिंता
लोकप्रतिनिधी आणि पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत वाढत्या गुन्हेगारीविषयी लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. तर, अपुऱ्या सोयी सुविधांविषयी पोलिसांकडून तक्रारीचा सूर काढण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत नव्या पोलीस आयुक्तालयाची खडतर वाटचाल सुरू आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याचे मोठे आव्हानही पहिल्या पोलीस आयुक्तांसमोर आहे. तूर्त, कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही आणि कोणतेही प्रकरण दडपले जाणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
ई-बसची खरेदी रखडणार
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या दीडशे ईलेक्ट्रिकल बस (ई-बस) खरेदीसाठीच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ पीएमपी प्रशासनावर आली आहे. त्यामुळे ई-बस खरेदी प्रक्रिया रखडणार असल्याचे स्पष्ट झाले असून नव्या वर्षांत तरी पीएमपीच्या ताफ्यात ई-बस दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या
पुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार नागपूर, अमरावती, चंद्रपूरला जाणाऱ्या बस सुटण्याच्या वेळा बदलण्याचेही ठरले.
प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती
पिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता भरून काढण्यासाठी प्राधिकरण परिसरात आता २२ मजली टॉवर उभे राहणार आहेत. प्राधिकरण क्षेत्रात पूर्वी ३६ मीटर उंचीपर्यंत (अकरा मजल्यांपर्यंत) बांधकाम करण्यास परवानगी होती. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत ६९ मीटर (बावीस मजल्यांपर्यंत) बांधकाम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध होणार आहेत. प्राधिकरण परिसरात पिंपरी-चिंचवड पालिका, एमआयडीसी, पुणे पालिका व सिडको यांच्यासाठी मंजूर असलेल्या चटईक्षेत्र निर्देशांकाचा विचार करून बांधकाम चटईक्षेत्र निर्देशांक प्रस्तावित करण्यात आले आहे.
पाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना
निम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठ्यास परवानगी हे दोन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना कंबर कसावी लागेल. या प्रकल्पांचे काम सुरू झाल्यानंतरही त्याद्वारे शहरात पाणी पोचण्यास किमान तीन वर्षे लागतील. तोपर्यंत नागरिकांना या पाणीसंकटाचा सामना करावाच लागणार आहे.
झोपडपट्टीमुक्तीसाठी थांबा १४२ वर्षे
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन होऊन बारा वर्षे पूर्ण झाली. परंतु आतापर्यंत केवळ ४७ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले. शहरातील घोषित झोपडपट्ट्यांची संख्या ५५७ आहे. सरकारचे धोरण असेच राहिले, तर पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी सुमारे १४२ वर्षे लागतील.
विकासकामांसाठी शासकीय जागा आगाऊ मिळणार
पुणे - शासकीय काम आणि सहा महिने थांब, हा सर्वसामान्य नागरिकांना येणारा अनुभव सरकारमधील खात्यांना देखील येत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, आता त्याला फाटा देत राज्य सरकारने सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी सरकारी जागेची मागणी झाली, तर त्यांना आगाऊ जमिनीचा ताबा द्यावा, असे आदेश काढले आहेत. ताबा दिल्यानंतर उर्वरीत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे विकासकामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
तब्बल 38 टक्के पाण्याची गळती अन् चोरी
चौफेर न्यूज : शहरात दररोज होत असलेल्या पाणी पुरवठ्यापैकी तब्बल 38 टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचा खुलासा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केला आहे. 31 ऑक्टोंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून या विभागाच्या सर्वच अधिकार्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याचे सांगत आयुक्तांनी एकप्रकारे अघोषित ‘पाणीबाणी’ जाहीर केली आहे.
मॉडर्नमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळा
निगडी – यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. प्राचार्य सतीश गवळी यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.शिरीष पडवळ यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील बनवण्यास शिकवले. चौकोनी, गोलाकार, चांदणी अशा विविध आकाराचे आकाश कंदील बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. दिवाळीसाठी बाजारात प्लास्टिकचे अनेक आकाश कंदील विक्रीसाठी येतात. मात्र प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पूरक आकाश कंदीलच सर्वांनी वापरावेत, यासाठी जनजागृती करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ महाविद्यालयात नव मतदार नोंदणी सुरू
भोसरी – भोसरी विधानसभा मतदार संघ आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नव मतदार नाव नोंदणी सुरू केली आहे. तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उप प्राचार्य प्रा. दादासाहेब पवार यांनी उद्घाटन केले. वय वर्षे 18 पूर्ण आहे त्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक पावडे, प्रा. सविता वीर, प्रा. मिनाक्षी मांढरे, प्रा. सुनिता पंचारिया, प्रा. कमलेश जगताप यांनी नियोजन केले.
अतिरिक्तांना आयुक्तांचे पाठबळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पाठिशी घालत आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील हर्डीकर यांची ही भूमिका संशयास्पद आहे, अशा आरोप नगरसेवक राजू मिसाळ यांनी केला आहे.
हजारो लिटर पाणी वाया
सांगवी – स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. मात्र, या कामात होत असलेल्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे कमी पाऊस पडला आहे, तसेच भविष्यात पाणी टंचाईची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असताना दुसरीकडे मात्र पालिकेकडून करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळ खोदकाम करत असताना जेसीबीमुळे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.
Subscribe to:
Posts (Atom)