Saturday, 28 July 2012

पवना धरणात ३३ टक्के साठा

पवना धरणात ३३ टक्के साठा: लोणावळा । दि. २६ (वार्ताहर)

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणासह परिसरातील धरणामध्ये आजअखेर सरासरी ३0 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. शहरात काल केवळ १0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिसरात या वर्षी १४२३ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजअखेर २२३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. पवना धरणात आजअखेरपर्यंत १११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment