Saturday, 28 July 2012

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सामूहिक आहे. कारवाई सुरू असताना, नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे १२८ निर्वाचित आणि ५ स्वीकृत अशा १३३ नगरसेवकांना न्यायालयाचे निर्देश, शासनादेश आणि मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीचा इतवृत्तान्त पाठविण्यात येणार आहे. मार्च २0१२ नंतरची अनधिकृत बांधकामे पाडणार आहे. ही कारवाई चार टप्प्यांत करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment