पिंपरी – नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत शासनाच्या एकूण 30 महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांच्या अंमलबजावणीचा विलंब, पात्र-अपात्र यादीचा गोंधळ, नागरिकांची धवपळ या साऱ्यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेट आठही क्षेत्रीय कार्यालयात कामांची विभागणी करुन दिली आहे. त्यामुळे अंमलबजावणीत होणारा विलंब व अपात्रांच्या संख्येत होणारी घट टळणार आहे.

No comments:
Post a Comment