‘शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा’
आरोग्य विभागाला महापौरांनी घेतले फैलावर
पिंपरी-चिंचवड : शहरात सर्वत्र कचरा आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाहीत. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत, यावरुन महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिका-यांना फैलावर घेतले. तसेच जी मदत पाहिजे ती आम्ही द्यायला तयार असून येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली आहे. शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा असेही त्यांनी सुनाविले. महापौर राहुल जाधव यांनी दालनात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेतली. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, आण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, आशा राऊत उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment