नुकताच गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही उत्साहात पार पडला. परंतु या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी नदी घाटांवर व नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्याची घाण साचली आहे. यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. याठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे नवरात्रोत्सवानंतरही पुन्हा एकदा नदीपात्र अस्वच्छ झाले असून नदीप्रदूषणात भर पडली आहे.

No comments:
Post a Comment