Saturday, 11 August 2012

काळेवाडी जैन मंदिरातील मुकुट चोरीस

काळेवाडी जैन मंदिरातील मुकुट चोरीस: रहाटणी। दि. ७ (वार्ताहर)

मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेस कोणी नसल्याची संधी उठवत चोरट्यांनी काळेवाडी येथील श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरातील दोन मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचे मुकुट व कपाळावरील सोन्याची पट्टी लंपास केली. काळेवाडी येथील जोगेश्‍वरी हॉस्पिटलसमोर असलेल्या श्री मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिर, सोमवारी सायंकाळी ५.३0 ला नेहमीप्रमाणे उघडण्यात आले. त्या वेळी पूजा करण्यासाठी १0 महिला आल्या होत्या. वरच्या मंदिराचे दार बंद करून तेथे नेहमी असणारा पुजारी काही कामासाठी जवळच त्यांच्या रूमवर गेला. त्या वेळी त्याठिकाणी खालच्या मंदिरात या महिला होत्या. मात्र, त्यांची नजर चुकवून चोरट्याने श्री नाकोडा पार्श्‍वनाथ व श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ यांच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट, श्री मुनीसुव्रत स्वामी व श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ यांच्या कपाळावरील सोन्याची पट्टी काढून चोरटा पसार झाला. रात्री ८ च्या सुमारास पुजारी परत आल्यानंतर वरच्या मंदिराचे दार उघडे दिसल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता मुकुटाची, सोन्याच्या पट्टीची चोरी झाल्याचे लक्षात आले. घडलेला प्रकार त्यांनी मंदिराच्या विश्‍वस्तांना कळविला. मात्र, काही विश्‍वस्त बाहेर गावी असल्याने मंगळवारी रात्रीपर्यंत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

हे मंदिर १0 वर्षांपासून या परिसरात आहे. अद्याप असा प्रकार घडला नव्हता. या ठिकाणी रोज भाविकांची गर्दी असते; परंतु सुरक्षेची कोणतीच उपाय योजना नसून येथे सीसीटीव्ही यंत्रणा नाही.

No comments:

Post a Comment