अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर ...:
नागरी सुविधाही पुरवणार नसल्याची पिंपरी आयुक्तांची माहिती
िपपरी / प्रतिनिधी
पुण्यात झालेले स्फोट आणि सणासुदीच्या दिवसांमुळे अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई लांबणीवर पडत असल्याचे दिसून आल्याने अशी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अनधिकृत इमारतींना नागरी सुविधा पुरवण्यात येणार नसल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबणार नसल्याने नागरिकांनी बांधकामे थांबवावीत, गुंतवणूक करू नका अथवा घर घेऊन खर्चही करू नका, असे आवाहन आयुक्तांनी केले.
Read more...
No comments:
Post a Comment