Saturday, 11 August 2012

नगरसेवकांचे सामूहिक राजीनाम्याचे नाट्य !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32243&To=10
नगरसेवकांचे सामूहिक राजीनाम्याचे नाट्य !
पिंपरी, 8 ऑगस्ट
महापालिकेकडून मार्च 2012 नंतरच्या बेकायदा बांधकामांवरील कारवाईला सुरुवात होताच महापालिका वर्तुळात बुधवारी (दि. 8) अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आयुक्तांना महापौर कक्षात बोलावून कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी सामूहिक राजीनाम्याचा धमकी दिली. मात्र न्यायालयाचे आदेश, शासनाच्या निर्देशानुसार लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची आठवण करुन देताच नगरसेवकांनी 'नांगी' टाकली. आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहून एक पाऊल मागे जात आरक्षित जागा, बड्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करा मात्र सर्वसामान्यांची घरे पाडल्यास राजीनामे देऊ असा इशारा दिला.

No comments:

Post a Comment