पिंपरी (पुणे) - डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉँच केलेल्या 'भीम अॅप' (भारत इंटरफेस फॉर मनी) सध्या दुर्लक्षित होत चालले आहे. त्यामुळे या अॅपबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप तयार केले असून गुगल प्ले-स्टोअरवरती ते उपलब्ध आहे. डिजिटल व्यवहारासाठी सरकारी अॅप म्हणून ते लोकांच्या पसंतीला उतरले. मात्र, अनेकांना अॅपबाबत माहितीच नाही. सरकारी यंत्रणा, बँकांकडूनही अॅपबाबत जनजागृती केली जात नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांचे विविध पेमेंट, व्हॉयलेट अॅप जाहिरातींच्या जोरावर अनेकांच्या मोबाईलमध्ये जागा मिळवत आहेत.

No comments:
Post a Comment