महिलांच्या असुरक्षितेकडे लक्ष वेधण्यासाठी आज (रविवारी १८ मार्च) खराळवाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या आवारात आगळी वेगळी गुढी उभारण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून महिला सुरक्षिततेसह पिंपरी-चिंचवडमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहरप्रदेशाध्यक्ष वाघेरे यांनी महिला सुरुक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही.

No comments:
Post a Comment