पुणे - महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बससेवेच्या आठ मार्गांवर २२४ फेऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यासाठी ३० नव्या मिडी बस वापरल्या आहेत. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख मार्गांचा त्यात समावेश आहे. किमान २५ ते ४० मिनिटांच्या अंतराने गर्दीच्या प्रमुख मार्गांवर या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ८ मार्चपासून या बससेवेला सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस प्रवासी महिलांची संख्या वाढती असल्याचे निरीक्षण पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले.

No comments:
Post a Comment