औंध - पुणे-मुंबई मार्गावरील बोपोडीच्या गांधीनगर परिसरात गेली पस्तीस वर्षे असलेली वस्ती आज पूर्णपणे हटविण्यात आली. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी येथील झोपड्या हटविण्यात आल्या. पस्तीस वर्षे जपलेले ऋणानुबंध तुटल्याचे भाव येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते; तसेच भावनिक संबंध जुळलेले शेजारी दुरावणार असल्याचे दुःखही दिसत होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 30 June 2018
PCMC to adopt bike sharing schemes and pedestrian corridors
Following in the footsteps of the Pune Municipal Corporation (PMC), Pimpri-Chinchwad is going to adopt bicycle sharing schemes, along with other forms of non-motorised transport under the Smart City Mission. Pimpri-Chinchwad is also planning to set up pedestrian corridors in five roads.
१ हजार २८८ सदनिका बांधकामाच्या प्रस्तावास मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. बो-हाडेवाडीत १ हजार २८८ सदनिका बांधण्यासाठी १२३ कोटी ७८ लाखांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी घेतली जाणार आहे.
समाविष्ट गावातील रस्त्यांची कामे रखडली
नगरसेवक डोळस यांनी अधिकार्यांना घेतले फैलावर
पिंपरी-चिंचवड : समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी देऊनही ती कामे रखडली आहेत. अधिका-यांनी जाणीवपूर्वक ही कामे रखडविली आहेत. अधिका-यांनी शहरातील विकासाची कामे करणे अपेक्षित आहे, राजकारण नव्हे, असा हल्लाबोल करत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकार्यांना स्थायीच्या सभेत चांगलेच फैलावर घेतले.
पिंपरी-चिंचवड : समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी देऊनही ती कामे रखडली आहेत. अधिका-यांनी जाणीवपूर्वक ही कामे रखडविली आहेत. अधिका-यांनी शहरातील विकासाची कामे करणे अपेक्षित आहे, राजकारण नव्हे, असा हल्लाबोल करत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकार्यांना स्थायीच्या सभेत चांगलेच फैलावर घेतले.
सहा कोटीच्या कामांना मंजुरी; स्थायी समिती सभेत निर्णय
पिंपरी : चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणार्या सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मनपा कार्यक्षेत्रामधील आकुर्डी येथे मुक्कमी असते वारकर्यांना एक तातडीची व विशेष बाब म्हणून मोफत वैदयकीय सुविधा देण्यास येणार्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
मोरवाडी आयटीआयतील 33 विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
शैक्षणिक सामंजस्य कराराव्दारे ‘करिअर डे’मधून 33 विद्यार्थ्यांची निवड
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सव्दारे विविध ठिकाणी नोकरी
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सव्दारे विविध ठिकाणी नोकरी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या मोरवाडी आयटीआय येथील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या ’करिअर डे’ मधून 33 विद्यार्थ्यांना टोयोटा कंपनीत ‘टेक्निशियन’ म्हणून रोजगार मिळाला आहे. मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयटीआय आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्याशी शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे.
#SaathChal ‘साथ चल’साठी रोटरीचाही निर्धार
पिंपरी - ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’च्या ‘साथ चल’ या उपक्रमात सर्व सभासदांसह सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प निगडी रोटरी क्लबने शुक्रवारी (ता. २९) केला.
पिंपरी शहराचे पाणी मुख्यमंत्र्यांच्या हाती
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या संदर्भात बैठक होऊन प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास शहरवासीयांची पाणीपुरवठ्याची समस्या संपेल.
कुदळवाडीत ८ बांधकामे जमीनदोस्त
चिखली- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शुक्रवारी (ता. २९) अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यात कुदळवाडी येथील सुमारे ५०० चौरस फुटांची आठ बांधकामे पाडली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात केलेल्या कारवाईमुळे विशेष विरोध झाला नाही.
उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण
पिंपरी - चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानाच्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवीत आहे.
पिंपळे गुरव येथे साईड पट्ट्या खचल्या, रस्ता दुरूस्तीची मागणी
जुनी सांगवी (पुणे) : रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक रस्त्याचे खोदाई काम काही दिवसांपुर्वी करण्यात आले होते. त्याजागी पालिका प्रशासनाकडुन खडी टाकुन खोदकामांचे चर भरण्यात आले. मात्र जड वाहने रस्त्यावरून गेल्यास याभागातील रस्ते खचल्याने मोठ्या गाड्या फसण्याचे प्रकार वाढले आहेत. गाड्या अडकुन राहिल्याने वहातुककोंडी होवुन रहदारीस अडथळा होत आहे. याच भागात शाळा असल्याने शाळकरी मुलांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे चारचाकी वाहने खचत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह आदियाल यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकला अधिस्विकृती प्रमाणपत्र
पिंपरी – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा (पीसीपी) राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र संस्थेने (नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन) नुकतेच राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट’
पिंपरी – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल 389 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत परिमंडळ तीन मधील 50 अधिकारी आणि 400 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम गुरुवारी (दि. 28) रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली.
Pune: MahaMetro starts survey on 2 routes
PUNE: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) on Friday said it has initiated a baseline survey of properties, including homes, slums and shops, which will be demolished since they fall on Metro route.
Financial closure of Pune Metro nears completion
PUNE: The Department of Economic Affairs (DEA) has posed Pune Metro Rail Project to funding agencies European Investment Bank (EIB) to the tune of 600 million euros and AFD for the balance 245 million euros.
बीआरटीएस मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम अर्थात बीआरटीएस प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला. परंतु, मागील अडीच वर्षात बीआरटीएस प्रकल्पांकडे महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यामागील प्रमुख अडथळा चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा होता. हा उड्डाणपूल सुरू झाल्याने महापालिकेने हा रखडलेला काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग तातडीने सुरू करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
वटपौर्णिमेनिमित्त ‘इसीए’ने केले ठिकठिकाणी वृक्षारोपण!
पिंपरी-एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) तर्फे पिंपरी चिंचवड शहरा मधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनासोबत वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले. २७ रोजी सिटी प्राईड स्कूल, निगडी, जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईरनगर / महाराष्ट्र कल्याण केंद्र, चिंचवड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान विभाग पिंपरी, निवृत्त शिक्षक संघ, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) च्या एकत्रित उपक्रमातून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या आवारात व बाहेरील बाजूस ३९ बारतीय वंशाची रोपे लावण्यात आली.
शहराच्या पर्यावरणाची चुकीच्या धोरणांमुळे दुर्दशा
पिंपरी – शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा ही महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे होत असल्याचा आक्षेप घेत यात त्वरीत सुधारणा करण्याची मागणी पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) या सामाजिक संस्थेने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी महापौरांना संबोधित करून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील विकास व पर्यावरण यामध्ये काहीतरी मोठी गडबड सुरू आहे. आपण शहरातील सर्व नद्या प्रदूषित करत आहोत. अनावश्यक बाबींवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सोयीस्कर रित्या पांघरुन घालून प्रलंबित ठेवण्यात येत आहे.
भक्ती-शक्ती उद्यान सुशोभिकरणाची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची ओळख असलेल्या भक्ती-शक्ती उद्यानाचे सुशोभिकरण करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
भाजपातील पानसरे समर्थक अस्वस्थ
राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असणार्या माजी महापौर आझम पानसरे यांना पक्षाकडून दीड वर्ष उलटूनही अद्याप कुठलेच सन्मानीत पद दिले गेले नसल्याने पक्षातील पानसरे समर्थक अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. आगामी विधान परिषदेतील निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीत पानसरे यांचा क्रमांक लागावा म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व अपक्ष आ. महेश लांडगे यांनीही पक्षश्रेष्टींकडे जोर लावला आहे. परंतु; भाजपा पक्षश्रेष्टी तरी पानसरे यांना न्याय देतात का? याकडेच आता भाजपा कार्यकर्त्यांसह पानसरे समर्थकांचे डोळे लागले आहेत.
आयुक्तांनी अगोदरच अभ्यास केला नव्हता का?
सत्ताधार्यांच्या दबावाखाली कामकाज करता, कामाच्या पद्धतील बदल करा
258 कोटींचे विषय वर्गीकरणावरून विरोधकांचा आयुक्तांवर हल्लाबोल
258 कोटींचे विषय वर्गीकरणावरून विरोधकांचा आयुक्तांवर हल्लाबोल
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना तात्पुरता दिलासा
पिंपरी – भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महापौरपदाचे प्रबळ दावेदार असलेले शत्रुघ्न काटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मल्टीप्लेक्सच्या मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन
पिंपरी – मल्टी प्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी असताना देखील मल्टी प्लेक्समध्ये ते नेऊ दिले जात नाही. याच्या निषेधार्थ शहरातील विविध मल्टीप्लेक्समध्ये मनसेच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. यावेळी बिग सिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉल मधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Friday, 29 June 2018
PCMC commissioner exclusively for HT: Smart City projects will take charge in township
Pimpri Chinchwad municipal corporation is the latest entrant in the nation-wide Smart City programme. We were not there in the mission originally, but got included in the third round. PCMC was selected because of its strong, inherent strengths and we have started implementation of the Smart Cities Mission.
Bicycle sharing system to start in Pimpri Chinchwad
PIMPRI CHINCHWAD: After Pune, public bicycle sharing scheme will be launched in Pimpri Chinchwad under the Smart City project.
New deadline for regularising illegal constructions in PCMC
Official cite strict rules and regulations and minimum 20 per cent charges on the ready-reckoner rate as main reasons behind the poor response.
#MonsoonSession प्रलंबित प्रश्नांसाठी सर्वपक्षीय आमदारांची वज्रमूठ
पुणे - वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला. पक्षभेद विसरून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचाही निर्धार या वेळी झाला. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी "एसआरए'च्या नियमावलीतील त्रुटी दूर करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच शेतीसाठीही पुरेसे पाणी देण्यात येईल, तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी केली.
#MonsoonSession अनुपस्थित आमदार आणि त्यांची कारणे
पुणे जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल एक कोटीवर पोचली आहे. राजकीय भाषणांचे फड गाजवितानाच या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात आवाज उठवावा आणि प्रश्न सोडवावेत, इतकीच सर्वसाधारण मतदाराची अपेक्षा असते. या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधींनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरी प्रश्नांवरील चर्चेत सहभागी न होण्याची नेमकी कोणती कारणे समोर केली याचा सारांश
मुळशीत शहर परिवर्तन कार्यशाळा
दोन लाखांचा खर्च : आयुक्तांसह 50 जणांचा सहभाग
पिंपरी – स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाबाबत स्पष्ट धोरण आखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची मुळशीतील गरूड माची येथे शुक्रवार (दि. 29 ) आणि शनिवार (दि.30) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आयुक्तांसह सर्व विभाग प्रमुख आणि पॅलॅडियम ग्रुपचे सदस्य असे 50 जण सहभागी होणार आहेत.
पिंपरी – स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाबाबत स्पष्ट धोरण आखण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची मुळशीतील गरूड माची येथे शुक्रवार (दि. 29 ) आणि शनिवार (दि.30) कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आयुक्तांसह सर्व विभाग प्रमुख आणि पॅलॅडियम ग्रुपचे सदस्य असे 50 जण सहभागी होणार आहेत.
MahaMetro transplants 206 trees in PCMC limits
PIMPRI CHINCHWAD: Maha-Metro has completed transplantation of 206 out of total 419 trees, which are likely to be affected by the ongoing construction of Pimpri-Swargate Metro route in the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits.
मेट्रोच्या कामासाठी काढलेल्या 206 झाडांचे पुनर्रोपण
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीज (दापोडी) ते खराळवाडी या सुमारे सव्वाआठ किलोमीटरच्या अंतरातील मेट्रोच्या कामात अडथळा ठरणारी 206 झाडे हटवून त्याचे शहरात विविध ठिकाणी पुनर्रोपण केले आहे. महामेट्रोतर्फे शहरात एकूण 4 हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे.
PCMC seizes 40.5kg plastic, 12 kg thermocol
On day 5 of the drive against plastic ban on Wednesday, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) penalised
Garbage bins overflow after residents dump banned plastic items in PCMC
PCMC had also placed huge dustbins at 32 locations across the township after the state had issued the plastic ban notification in March. The dustbins were for residents to deposit their banned plastic items. However, the initiative seems to have failed as the garbage bins are now overflowing with plastic waste.
घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमेला वृक्षारोपण
निगडी : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग व निसर्ग मित्र विभागातर्फे देहूरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमा वडाच्या पूजेबरोबर वृक्षारोपण करून साजरी केली. सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. दरवर्षी या डोंगरावर महिला वडाची झाडे लावतात. स्वतः लावलेल्या वडाची पूजा या महिलांकडून केली जाते. या वर्षी देखील वडाच्या झाडाची लागवड घोरावडेश्वर डोंगरावर करण्यात आली. यावेळी डॉ. सुनिता व डॉ. सुजाता हुईलगोळकर, प्रा. निता मोहीते, वैशाली जोशी, मुक्ता चैतन्य, सुखदा भोंसुले, नीता पाटील, विनीता पाचारणे, सुमती कुलकर्णी, उल्का अत्रे, राजश्री व्यास यांच्यासह सुमारे 25 पेक्षा जास्त महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच, अनुजा वनपाळ, माधुरी मापारी, विनिता श्रीखंडे, मानसी म्हस्के यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शारदा रिकामे यांनी पौरोहित्य केले.
पोलिसांना घराजवळच ड्युटी द्यावी; पोलिस मित्र संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : लिसांना त्यांच्या निवासस्थानापासून जवळ ड्युटी द्यावी. तब्येत सांभाळून कामावर जाणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष आहे. आपल्या पसंतीने कामाचे ठिकाण निवडण्याची मुभा असताना व तसे आदेश असतानाही कर्मचार्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते, असे निवेदन अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्र गिरीष बापट आणि पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना निवेदन दिले आहे.
क्षेत्रीय समिती अध्यक्षांचे अधिकार वाढविणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व 8 क्षेत्रीय समिती अध्यक्षांना सध्या फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे ते केवळ नामधारी असल्याप्रमाणे वावरत आहेत. परिणामी, क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात विकासकामे खोळंबून राहतात. अध्यक्षांच्या अधिकारात वाढ केल्यास क्षेत्रीय स्तरावर कामे वेगात मार्गी लागून शहराचा विकासाची गती वाढेल, असा निर्णय सर्व क्षेत्रीय समिती अध्यक्ष व अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात येत्या 8 दिवसांमध्ये आयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करणार आहेत.
‘होर्डिंग्ज’बाबत प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार
नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागातील कृष्णा चौक,काटेपुरम चौक, जिजामाता उद्यान, सृष्टी चौक, पिंपळे गुरव रस्त्यावरची ‘होर्डिंग्ज’ आणि ‘फ्लेक्स’बाजीची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ताथवडे आणि आळंदी रस्त्यावरील अधिकृत ‘होर्डिंग्ज’ अंगावर पडल्यामुळे अलीकडेच एका महिलेचा आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा “होर्डिंग्ज’पायी नागरिकांचे किती बळी जाणार आहे, हा कळीचा प्रश्न उद्भवत आहे. तर; दुसरिकडेे वाढत्या ‘होर्डिंग्ज’ आणि ‘फ्लेक्स’मुळे शहरी भागाच्या सौंदर्याला बाधा येत आहे. त्यामुळे आकाश चिन्ह विभागातील प्रशासनाचा मूक कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
पीएमपीएलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसद्वारे प्रवास करणार्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणाहून बसेसने प्रवास करणार्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री-अपरात्री महिलांना प्रवास करताना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापार्श्वभुमीवर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पीएमपी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आमदार निलम गोर्हे यांनी 10 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पीएमपीएल महामंडळाच्या कार्यालयात मंगळवारी दि 26 महिलांसाठी सुसंवाद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, विधी अधिकारी नीता भरमकर, स्त्री आधार केंद्रचे रमेश शेलार उपस्थित होते.
प्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या आयटी कंपनीवर कारवाई
पिंपरी - नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा आयटी कंपन्यांनी नाकारली होती. कंपनीकडून रजा नाकारल्याबद्दल दिली जाणारी भरपाईची रक्कम संबंधित महिलांना मिळवून देण्याचे काम कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी "सकाळ'ला ही माहिती दिली.
निकृष्ट कामामुळे टेम्पो खचला
सांगवी – ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, बुजवले आणि आता पुन्हा खोदण्याचे काम चालू आहे. पाऊस आला म्हणून घाईघाईत काम उरकण्याच्या नादात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी, पिंपळे-गुरव परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था करून ठेवली आहे. दैनिक “प्रभात’ ने यावर वारंवार वृत्त प्रकाशित केले होते की, ऐन पावसाळ्यात होत असलेल्या खोदकामाचा नागरिकांना पुढे त्रास होईल. आता तो त्रास सुरू झाला असून रस्त्याच्या कडेला चार चाकी वाहने खचू लागली आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भिती आहे.
अपघातग्रस्त गाय-वासराला जीवदान
भोसरी – प्राणी मित्रांमुळे भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अपघातामुळे जखमी झालेल्या गाय व वासराला जीवदान मिळाले.
ठराविक प्रभागातच केली जातात कामे; नगरसेविकेचा सत्ताधार्यांना घरचा आहेर
उपसूचना कळून दिल्या जात नाहीत
पिंपरी : कामे करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विकास कामे केली जातात. उपसूचनांच्या कागदावर काही लिहिले आहे. हे शिक्षिका असूनही मला कळत नाही, सत्ताधारी भाजपला असा घरचा आहेर, भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी दिला आहे. तसेच प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय देण्याची गरज असून बोलणार्यांचे तोंड दिसते असेही त्या म्हणाल्या.
पिंपरी - चिंतामणी रात्र प्रशाला आर्थिक संकटात
पिंपरी : मी सकाळी सहा ते आठपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची हिकिकत सांगत होता.
विद्यार्थ्यांना गाई संवर्धनाबाबत मार्गदर्शन
चिखली – येथील चंद्रभागा गोशाळेतर्फे विद्यार्थ्यांना गाईच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चिखली परिसरातील विविध तीन शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
Thursday, 28 June 2018
नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75% रक्कम काढण्याची सुविधा
नवी दिल्ली – नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्याचा निर्णय सेवानिवृत्ती निधी संस्थेने (ईपीएफओ) जाहीर केला आहे. आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील 75 टक्के रक्कम काढून घेतल्यानंतर उर्वरित 25 टक्के रकमेसह आपले प्रॉव्हिडंट फंड खाते चालू ठेवण्याची सवलतही खातेदाराला देण्यात आलेली आहे.
प्राध्यापकांना कमी करता येणार नाही
'एआयसीटीई'ची इंजिनीअरिंग कॉलेजांना ताकीद
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
लोणावळा लोकलच्या वेळापत्रकात बदल
गेल्या एक महिन्यापासून विविध कामांमुळे बंद असलेल्या पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या वेळेतील लोकल सुरू होण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम एक ते २७ जुलै या कालावधीत सुरू केले जाणार असून, दुपारच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
किराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा
मुंबई (Pclive7.com):- किराणा दुकानातील पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल आदी वस्तूंच्या विक्रीसाठी किरकोळ पॅकेजिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे.
‘एचसीएमटीआर’च्या जागेत गार्डन आणि जॉगिंग पार्क ?
घर बचाव संघर्ष समितीचा आरोप
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरासाठी संयुक्तिक विकास आराखड्यासाठी मंजूर असलेल्या ट्राम रिंगरेल एचसीएमटीआरच्या आरक्षित प्रकल्पाच्या जागेवर पिंपरी महापालिकेने गार्डन आणि जॉगिंग पार्क बेकायदेशीरपणे बनविले असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. तसेच माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरासाठी संयुक्तिक विकास आराखड्यासाठी मंजूर असलेल्या ट्राम रिंगरेल एचसीएमटीआरच्या आरक्षित प्रकल्पाच्या जागेवर पिंपरी महापालिकेने गार्डन आणि जॉगिंग पार्क बेकायदेशीरपणे बनविले असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. तसेच माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महापौरांच्या प्रभागातील विकासासाठी असणार सल्लागार
पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांच्या प्रभाग क्रमांक तीन च-होली, मोशी गावठाण प्रभागातील रस्ते, आरक्षणे विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार नेमणुकीच्या समितीची २४ एप्रिल २०१८ रोजी शहर अभियंत्याच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मे.नियोजन कन्सल्टंट यांनी च-होली येथील सर्व्हे क्रमांक १३१ येथील आयटुआरच्या बदल्यात ताब्यात आलेल्या महापालिकेच्या जागेवरील जलतरण तलावाची स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत.
सत्ताधाऱ्यांनो, दारूपासून गरिबांचे संसार वाचवा
पूर्वी काँग्रेस राजवटीत, दारू हा कायम चर्चेचा विषय असे. बहुसंख्य पुढाऱ्यांनाच दारू दुकानांचे परवाने बक्षीस मिळत. त्यामुळे मद्य, मद्यपी, व्यसनाधीनता यावर फारशी काथ्याकूट होत नव्हती. गावठी दारू, खोपडी अथवा ताडी-माडी प्यायल्याने कुठे कोणी दगावले की तेव्हढ्यापुरती प्रसारमाध्यमे तुटून पडत. नशाबंदी म्हणा की दारूबंदी खाते हे निव्वळ ‘खाते’ असल्याने त्यांनाही त्याचे सोयरसूतक नसे. २ ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीपुरता ‘ड्राय डे’, बाकी ३६४ दिवस तळीरामांचे राज्य. हे सर्व भेसूर सामाजिक चित्र गल्ली ते दिल्ली भाजप सत्तेत आल्याने बदलेल, अशी एक भाबडी अपेक्षा होती. सगळे मुसळ केरात गेले. राज्यभर प्लॅस्टिकबंदी झाली, पण कित्येक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या दारूवर कायमची बंदी घालायचे कोणीही नाव घेत नाही. अगदी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’सुद्धा चुप्पी साधून आहे. उलटपक्षी कधी नव्हे इतके दारू गुत्यांची संख्या वाढली आहे. हेच सरकार आल्यानंतर, मुंबईत विषारी दारूप्राशनाची सर्वांत मोठी दुर्घटना होऊन अनेकजण दगावले. आता तीन वर्षांनंतर लक्षात येते, की एकूणच ‘कारभार’ कोणत्या दिशेने जाणार याचे ते निदर्शक होते, असे नाइलाजाने म्हणावे लागते. आज शहरात दारूगुत्त्याशिवाय झोपडपट्टी अशक्य झाली आहे. गल्लोगल्ली हातभट्टीचे अड्डे वाढलेत. पिंपरी- चिंचवड शहरातील हातभट्टीचे गुत्ते पहिल्यापेक्षा दुप्पट झाले. दारूच्या दुष्परिणामांवर चर्वितचर्वण भरपूर झाले, कृती मात्र कोणीच करत नाहीत. आता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असल्याने त्यांच्याकडून काहीतरी कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्प संथगतीने
पिंपरी - वाल्हेकरवाडीतील स्पाइन रस्त्यालगत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या ७९२ घरांच्या गृहयोजनेसाठी कामाचे आदेश देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्राधिकरणातर्फे कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड लागू आहे. दंडापोटी कंत्राटदाराकडून प्राधिकरणाने मे अखेरपर्यंत ४५ लाख रुपये वसूल केले आहेत.
प्रदूषणमुक्तीकडे पिंपरी शहराची वाटचाल
पिंपरी - प्रदूषणामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका कमी व्हावा, म्हणून केंद्र सरकारने शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचे ठरवले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील रस्त्यांवर या बस चालविण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक प्रशिक्षण संस्थेला (सीआयआरटी) देण्यात आले आहेत. हा अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.
ईसिएच्या उपक्रमात विद्यार्थी झाले सहभागी
विद्यार्थ्यांनी जमा केले घरचे प्लास्टिक
पिंपरी- एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे शहरामधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांमधूनच ई-कचरा संकलन केले जाते. मोशीमधील श्री श्री राविशंकर विद्यालय आणि तळवडेतील राजा शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील एकदाच वापरू शकणारे प्लास्टिक एका ठिकाणी जमा केले. तसेच विद्यार्थ्यांनी 29 किलो ई-कचरासुद्धा आणून इसिएच्या ताब्यात पुढील व्यवस्थापनासाठी आणून दिल्याचे इसिएचे संचालक आणि पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी सांगितले.
वृक्षारोपण करुन साजरी केली वटपौर्णिमा
निगडी – वट पौर्णिमेला पर्यावरणासाठी महत्त्वाच्या वट वृक्षाचे पूजन केले जाते. सध्याचा पर्यावरणाचा ऱ्हास पाहता वट वृक्षाच्या पूजनासोबत त्याचे रोपण आणि संवर्धन देखील गरजेचे आहे. हीच बाब ध्यानात घेऊन एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने (इसीए) वडाच्या रोपांचे रोपण केले.
नियमितीकरणास मुदतवाढ
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आठ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. या वाढीव मुदतीत नागरिकांनी बांधकामे नियमित करण्यास अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
निळ्या पुररेषेच्या बाहेरील हरित पट्टा रहिवासी करण्यास शासनाची मान्यता; आमदार जगतापांच्या पाठपुराव्यास यश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जुन्या व वाढीव क्षेत्राच्या हद्दीतील निळ्या पुररेषेच्या बाहेरील नाविकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप मागील चार वर्षापासून पाठपुरावा घेत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले, निळ्या पुररेषेच्या बाहेरील नाविकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला असून जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
भाजपच्या काळात भेटवस्तुची परंपरा होणार खंडित
- यंदा दिंड्यांना भेट वस्तू नाहीच
पिंपरी – आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून “तंबू’ देण्याचे विचाराधीन होते. मात्र, बुधवारी (दि. 27) झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चाच न झाल्याने दिंड्यांना यंदा भेटवस्तू न देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून सुरु असलेली भेटवस्तू देण्याची परंपरा भाजपच्या काळात खंडित होणार आहे.
सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी तिसऱ्या स्थानी
चौफेर न्यूज – देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे.
आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली!
- कार्यपद्धतीत बदल करण्याचा सभागृहात सल्ला
पिंपरी – महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रत्येक आयुक्तांनी कामाच्या माध्यमातून आपली छाप सोडली आहे. मात्र, श्रावण हर्डीकर यांच्यावर सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे त्यांच्या कामकाजावरुन दिसून येते. मात्र, हर्डीकर यांनी हा दबाव झुगारुन काम करावे, असा सल्ला नगरसेवकांनी आयुक्त हर्डीकर यांना दिला.
महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा
संजोग वाघेरेंचा टोला ः सत्ताधाऱ्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आगपाखड
पिंपरी – सभा तहकुबीचा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा, असा उपरोधक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लगावला आहे. वाघेरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली आहे.
Wednesday, 27 June 2018
डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया आणखी सोपी
पुणे - सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया (मानीव अभिहस्तांतरण) सोपी करण्यासाठी राज्य सरकारने कागदपत्रांची क्लिष्टता दूर करण्यासोबतच चार टप्पे निश्चित केले आहेत. पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहरातील सुमारे १५ हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना त्याचा लाभ होणार आहे.
महामेट्रोचे जुलैमध्ये दुसरे गर्डर लाँचर
पिंपरी - मेट्रोचे दुसरे गर्डर लाँचर जुलैच्या पहिल्या आठवड्यात दापोडी येथे बसविण्यात येणार आहे. त्यामुळे व्हायाडक्ट उभारणीच्या कामाला वेग येईल. खराळवाडी येथे बसविलेल्या गर्डर लाँचरद्वारे व्हायाडक्टचे बारा स्पॅन पूर्ण झाले असून, तेराव्या स्पॅनचे सेगमेट बसविण्यास मंगळवारी प्रारंभ झाला.
पवनेतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात
पिंपरी - पवना नदीपात्रात शहरातील काही झोपडपट्ट्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्याद्वारे मिसळत आहे. चिंचवड, भोसरी औद्योगिक वसाहतीतील वाहून येणारे रसायनमिश्रित सांडपाणी तसेच बोपखेल, ताथवडे, थेरगाव, पिंपरी येथील नाल्याचे पाणीही मिसळते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हातभट्ट्यांमुळे बालाजीनगरची वाताहत
भोसरी - येथील बालाजीनगरमधील तरुणांना हातभट्टीची दारू घराजवळच मिळत असल्याने व्यसनाधीन तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारूमुळे विवाहित तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे बालाजीनगरमध्ये वैधव्य आलेल्या महिलांची संख्या वाढत आहे. हातभट्टी दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतरही गुत्ते सुरूच असल्याने पोलिसांची लुटुपुटूची कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. झोपडपट्टीमधील तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी सर्वच हातभट्टीचे गुत्ते बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अतिक्रमणांच्या विळख्यात बाजारपेठ
पिंपरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर साहित्य मांडून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना बाजार पेठेतून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)
Fire stations on cards in three fringe villages
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has appointed three agencies to construct fire stations at Moshi, Charholi, and Chowiswadi. There are several godowns in these areas.
दहा लाख रहिवाशांचे छप्पर बेकायदा
पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक
पिंपरी पालिकेत सभा तहकुबींचा ‘नाद खुळा’
महापौर, पक्षनेत्यांची नामुष्की; सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाही
निधी वर्गीकरण विषय मागे घेण्याच्या हालचाली
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2018-19च्या अर्थसंकल्पातील सुमारे 264 कोटी रुपयांचा अखर्चित निधी वर्गीकरणाच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. सदर वर्गीकरणाचे विषय मागे घेण्याच्या पालिका प्रशासनाच्या हालचाली आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.27) होणारी तहकूब सभा केवळ निमित्तमात्र ठरण्याची शक्यता आहे.
[Video] पाणी तुंबल्याने 2 अभियंत्यांचं निलंबन
Pimpri Chinchwad | Commissioner Suspended Two Engineers After Water Logging In First Heavy Rainfall
गुरुवारी सायंकाळी शहरातील पाणीपुरवठा बंद
निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीची कामे, विद्युत विभागातील रावेत पंपींग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (दि.28) करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात गुरुवारी एकवेळेस सकाळी पाणी पुरवठा करण्यात येणार असून संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. शुक्रवारी (दि.29) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा
चौफेर न्यूज – एकेकाळी क्लीन सिटी म्हणून बहुमान मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. केवळ सर्वेक्षणात गुण प्राप्त व्हावेत, याकरिता कागदोपत्री स्वच्छ भारत अभियान राबविणारे अधिका-यांच्या उदासीन धोरणाने स्वच्छ शहरात अस्वच्छता दिसू लागली आहे. यामूळेच महापालिका हद्दीतील नवी सांगवी परिसरात कचराकुंडी ओसडूंन वाहू लागल्या आहेत. याबाबत स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारीकडे दुर्लक्ष करुन कचरा उचलला जात नसल्याचे नागरिकांने आरोग्य धोक्यात आले आहे.
निगडीला डोळे तपासणी शिबिराचे आयोजन
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 1300 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
पिंपळे सौदागरमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने हिंदू साम्राज्य दिवस साजरा
हिंदू साम्राज्य दिवस उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा करण्यात आला.
शिक्षण, रोजगारासाठी ‘सारथी’ची स्थापना
पुणे - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ अर्थात ‘सारथी’ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.
#MissionAdmission अकरावीसाठी ७६ हजार अर्ज
पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखांसाठी असलेल्या एकूण ९६ हजार ३२० जागांसाठी सुमारे ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. विज्ञान शाखेच्या ३९ हजार ९० जागा असून त्यासाठी ३२ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सीएनजी पंपावर पीएमपी बसच्या रांगा
सीएनजी पंपावर पीएमपी बसच्या रांगा
पिंपरी – नेहरूनगर पीएमपी आगारात सीनजी पंपावर गॅस भरायला बसच्या रांगा लागत आहेत. गॅस भरण्यासाठी बसमधील प्रवाशांना खाली उतरुन भर पावसात उभे रहावे लागत आहे. नेहरुनगर पीएमपी आगारात एकमेव सीएनजी गॅस पंप असल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच आगारातील बस सीएनजी भरण्यासाठी नेहरूनगर आगारात येतात. त्यामुळे आगारातील पंपावर मोठी गर्दी होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी व भोसरी या आगारात सीएनजी पंप नसल्याने येथील बस सुद्धा पिंपरीच्या नेहरूनगर आगारात येत असतात. आपण लवकरच आपल्या ठिकाणी पोहचू या विश्वासाने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बराच वेळ आगारात बसमध्ये गॅस भरेपर्यंत वाट पाहत उभे रहावे लागते आहे.
आता व्हॉट्सअॅपवरील फोटो, व्हिडीओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत !
मुंबई : व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये दिसतात. तसे थेट गॅलरीत कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दिसू नये म्हणून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणले आहे. अँड्रॉईड यूझर्सना नव्या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन दिले जाईल.
आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे काढता येणार पासपोर्ट
चौफेर न्यूज – पासपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट घरपोच येईल. यासाठी पासपोर्ट सेवा अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली.
Tuesday, 26 June 2018
विनापरवाना रस्ते खोदल्यास दंड
पिंपरी - विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेले खोदकाम त्वरित बुजवावेत, नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी महापालिकेने धोरण आखले आहे. त्यामुळे रस्त्याची विनापरवाना खोदकाम केल्यास खोदाई शुल्काच्या दुप्पट दंड आकारणी केली जाणार आहे. शिवाय सकाळी १० ते सायंकाळी पावणेसहा या वेळेतच खोदकाम करता येणार असून त्यानंतर ते त्वरित बुजवावे लागणार आहे.
वृक्ष लागवडीसाठी ‘जीपीएस’द्वारे पाहणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पावसाळ्यात 60 हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. त्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यासाठी जीपीएस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक महासंघ, हाउसिंग सोसायट्या, सार्वजनिक मंडळांचा सहभाग घेण्यात येणार आहे, असा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सोमवारी (दि.25) झालेल्या सभेत घेण्यात आला.
वनौषधींच्या रोपांना मागणी
पिंपरी - महापालिकेच्या भोसरी आणि चिंचवड एमआयडीसीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानांमध्ये वनौषधींच्या रोपांना नागरिकांकडून चांगली मागणी आहे. महापालिकेच्या अन्य उद्यानांमध्येही याचा वापर होत आहे.
FSSAI Gets Serious Against Food Adulteration, Proposes Life Term, Rs 10 Lakh Fine For Culprits
The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has proposed stringent punishment of fine of Rs 10 lakh and imprisonment up to life term for those adulterating foodstuff. Besides, the regulator has also suggested creating a 'Food Safety and Nutrition Fund' to support promotional and outreach activities among food businesses and consumers.
पालिकेची स्वच्छतेत पिछाडी नेमकी कशामुळे?
स्वच्छतेत २०१६ मध्ये देशात नवव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर एकदम पिछाडीवर गेले. याचा सरळ अर्थ असाही होतो, की दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता असताना प्रगती होती आणि भाजपकडे सत्ता येताच अधोगती झाली. केंद्रात आणि राज्यातही भाजप सत्तेत असताना शहराची घसरगुंडी झाली. पैशाची बिलकूल कमी नाही. सर्वांची इच्छाशक्तीही दांडगी आहे. भरभक्कम राजकीय पाठबळसुद्धा आहे. अशाही परिस्थितीत शहराची अवनती कशी झाली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावे लागणार. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत’चा नारा इथे त्यांच्याच शागिर्दांनी धुळीस मिळविला. कारण यांना स्वच्छतेपेक्षा टक्केवारीतच अधिक रस आहे. तमाम जनतासुद्धा त्यामुळे नाराज आहे. कचऱ्याच्या निविदांमध्ये प्रतिटन २०० रुपये भागीदारी मागणारे भाजपचेच नगरसेवक आहेत. महापालिका आयुक्तांनी सर्व बाजू तपासून ८०० कोटींच्या निविदा काढल्या; पण कायमस्वरूपी भागीदारी मिळाली नाही म्हणून खुसपट काढून निविदाच रद्द करणारा भाजप आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्पसुद्धा टक्केवारीत गुंफलेला आहे. भाजपचा पालिका तिजोरीच्या स्वच्छतेवर डोळा असल्याने शहराची स्वच्छता वाऱ्यावर उडत गेली. किमान आतातरी उपरती होऊ द्या. मरगळ झटकून कामाला लागा. यापुढे माझ्या वॉर्डमध्ये कचऱ्याचा ढीग काय कागदसुद्धा रस्त्यावर दिसणार नाही, असा निश्चय करा. लोकांना बातम्या आणि फोटोपुरती स्वच्छता मोहीम नको आहे. प्रशासन मनापासून प्रयत्न करते, असे दिसले तर लोक स्वतःहून सहभागी होतील. पूर्वीचे स्वच्छ शहर परत दिसू द्या. ते सहज शक्य आहे.
राज्यातील प्राध्यापकांसाठी ‘टॅफनॅप’ सरसावली
शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेबाबत संताप; अन्यायाविरोधात न्यायालयीन लढाईच्या तयारीत
महाविद्यालय बंद करणे, एकाचवेळी अनेक प्राध्यापकांना काढून टाकणे, वेतन थकवणे अशा प्रकारांमुळे राज्यभरातील प्राध्यापक मेटाकुटीला आले आहेत. सातत्याने आवाज उठवूनही शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नसल्याने प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहे. राज्यभरातील विनाअनुदानित संस्थांतील गैरकारभारामुळे प्राध्यापकांमध्ये सरकारबाबत संतापाचे वातावरण आहे.
महाविद्यालय बंद करणे, एकाचवेळी अनेक प्राध्यापकांना काढून टाकणे, वेतन थकवणे अशा प्रकारांमुळे राज्यभरातील प्राध्यापक मेटाकुटीला आले आहेत. सातत्याने आवाज उठवूनही शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नसल्याने प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहे. राज्यभरातील विनाअनुदानित संस्थांतील गैरकारभारामुळे प्राध्यापकांमध्ये सरकारबाबत संतापाचे वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची राष्ट्रीय स्तरावरील फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत ‘हॅट्रिक’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘मारुती सुझुकी एसएइ सुप्रा इंडिया २०१८’ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसींग स्पर्धेमध्ये सलग तिस-या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली.
पिंपरी चिंचवडमधील कचराकुंड्या ‘ओव्हरफ्लो’, स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा
पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी क्लीन सिटी म्हणून बहुमान मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. केवळ सर्वेक्षणात गुण प्राप्त व्हावेत, याकरिता कागदोपत्री स्वच्छ भारत अभियान राबविणारे अधिका-यांच्या उदासीन धोरणाने स्वच्छ शहरात अस्वच्छता दिसू लागली आहे. यामूळेच महापालिका हद्दीतील नवी सांगवी परिसरात कचराकुंडी ओसडूंन वाहू लागल्या आहेत. याबाबत स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारीकडे दुर्लक्ष करुन कचरा उचलला जात नसल्याचे नागरिकांने आरोग्य धोक्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)