Wednesday, 5 September 2012

दादांच्या आदेशाचा बिल्डरकडून गैरफायदा?

दादांच्या आदेशाचा बिल्डरकडून गैरफायदा?पिंपरी - पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमधील गाळ काढण्याची योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. परंतु, नदीपात्रात भराव टाकून इमारती उभारणाऱ्यांना यामुळे मोकळे रान मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 
वाकडपासून बोपोडीपर्यंत आणि रावेतपासून वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, पिंपरी गाव यासारख्या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून राजरोस भराव टाकला जात आहे. काही ठिकाणी या भरावावर अतिक्रमणेही झाली आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाने अद्याप याप्रश्‍नी कोणतीही ठोस भूमिका घेऊन कारवाई केलेली नाही. 

No comments:

Post a Comment