Wednesday, 5 September 2012

नगररचना विभागावर सदस्यांचे शरसंधान

नगररचना विभागावर सदस्यांचे शरसंधानपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी केवळ बिल्डरांसाठी कामे करतात. या विभागात टीडीआर देणाऱ्यांची आणि विकणाऱ्यांची साखळी तयार झाली आहे, असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी शनिवारी (ता. 1) झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे अकार्यक्षम असल्याने त्यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवावे, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी खुलासा करताना लोकप्रतिनिधींच्या भावनांचा विचार करून या विभागाकडे येणारी सर्वसामान्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी निश्‍चित कालावधी लवकरच ठरविण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले.

No comments:

Post a Comment