मद्यपी कारचालकाने दुचाकीस्वारांना उडविले;
दोनजण गंभीर जखमी
पिंपरी, 3 सप्टेंबर
एका मद्यपी कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना धडक मारल्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना निगडीच्या भेळचौकात आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जखमींना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात या दुचाकीचे जवळपास दोन तुकडे झाले आहेत.
No comments:
Post a Comment