पुणे - सिग्नलचा वेळ 90 सेकंदांचा.... काउंटडाउन टायमरकडे बघून वाहनचालक वाहन बंद करतो. 10 सेकंद राहिलेले असताना ते पुन्हा सुरू करतो अन् हिरवा दिवा लागल्यावर पुढे निघतो.... असे या पूर्वी सर्रास दिसणारे दृश्य आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच चौकात दिसत आहे. कारण अनेक चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील काउंटडाउन टायमरचेच आता काउंटडाउन सुरू आहे. परिणामी, प्रदूषण नियंत्रण आणि इंधनबचतीचा उद्देशही हरवत आहे. दरम्यान, किमान वर्दळीच्या चौकात तरी सिग्नलला टायमर प्राधान्याने बसवावेत, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे.
No comments:
Post a Comment