कासारवाडी येथील जलकुंभ परिसरातील जलवाहिनी ठेकेदाराकडून आज (रविवारी) सकाळी फुटली. सार्वजनिक सुट्टीमुळे पाणीपुरवठा विभागातही सुट्टीचा महौल असल्याने पाणी गळती रोखण्यास विलंब झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वायाला गेले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 31 March 2014
महामार्गावर खिळे टाकण्याचा उद्योग पुन्हा सुरू !
पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावर खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्याची पद्धत ही जुनीच आहे. मागील वर्षी या प्रकाराने वाहनचालकांना जेरीस आणले होते. काही काळाच्या विश्रांतीनंतर आता खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याच्या प्रकारास पुन्हा सुरूवात झाली आहे. या प्रकारामुळे अनेक वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पुणे- मुंबई महामार्गावर आकुर्डी ते निगडी या रस्त्यावर मागील दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्याचा गोरख धंदा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
सरकारने आश्वासने पाळली नाहीत - लक्ष्मण जगताप
पिंपरी-चिंचवड वासियांच्या प्रश्नांची विधानसभेत दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत, म्हणूनच आपण आमदारकीचा राजीनामा दिला. आता जनतेच्या पाठबळावरच मी खासदार होणार असल्याचा सार्थ विश्वास आमदार लक्ष्मण यांनी थेरगाव येथे व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) चे उमेदवार व मनसे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सोनाई मंगल कार्यालय थेरगांव येथे शनिवारी रात्री मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.
शिरुर मतदारसंघात 450 कोटींची कामे केली - शिवाजीराव आढळराव पाटील
शिरुर मतदारसंघात आत्तापर्यंत 450 कोटींची कामे केली असल्याचा दावा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (शनिवारी) केला. त्यांच्या प्रचारार्थ यमुनानगर, त्रिवेणीनगर, चिखली भागात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
मतदारांशी साधला संवाद
पिंपरी : उमेदवारीअर्ज छाननी आणि पक्षचिन्हांचे वाटप होताच विविध राजकीय पक्षांचे, तसेच अपक्ष उमेदवार, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. प्रचार साहित्य तयार करून घेण्याची लगबग सुरू होती, तर रविवारी सुटीच्या दिवशी काही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, मेळावा, कोपरा, सभा, बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला. ‘..यांनाच विजयी करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणला.
मावळ लोकसभा निवडणुकीची
मावळ लोकसभा निवडणुकीची
Sunday, 30 March 2014
PCMC to remove road encroachments
PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will form special squads for removing encroachments from the parking zones on six major roads of the city on a priority basis.
PCMC depts’ revenue crosses Rs 600 cr mark
PIMPRI: The Tax Collection and Building Permission Departments of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have each crossed the Rs 300 crore mark in collection of revenue this financial year.
Five huts gutted in Indiranagar slum
PIMPRI: Five huts were gutted when a fire broke out at Indiranagar slum in Mohannagar area in Chinchwad on Friday morning.
गुढीपाडव्याला पिंपरी-चिंचवड नागरिक संघटनेचे उद्घाटन
'पिंपरी चिंचवड सिटीझन्स फोरम' (PCCF) या नागरिक संघटनेचे उद्घाटन सोमवारी (दि. 31) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहामध्ये सायंकाळी पाच वाजता होणार असून या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त राजीव जाधव उपस्थित राहाणार आहेत.
PCCF च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरातील समविचारी नागरिक एकत्र येऊन शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.
आयुक्तांच्या पायी दौ-याने अधिका-यांना घाम
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी प्रभागानंतर आजपासून रस्ते पाहणी दौरा सुरु केला आहे. दापोडी ते कासारवाडी रस्त्याची आयुक्तांनी आज भर उन्हात पायी पाहणी करीत अधिका-यांना अक्षरशः घाम फोडला. पदपथांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्तांनी सक्तीची ताकीद दिली असून फुगेवाडी येथील एक पाणपोई देखील काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
मुख्य रस्ते सुशोभित होणार
पिंपरी : शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी मुख्य रस्त्याच्या कडेला व दुभाजकांमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी शनिवारी दिल्या.
दहा कर्मचार्यांची स्वेच्छानवृत्ती
पिंपरी : महापालिका सेवेतून आज ६ कर्मचारी सेवानवृत्त झाले. १0 कर्मचार्यांनी स्वेच्छानवृत्ती घेतली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेवानवृत्त झालेल्या व स्वेच्छानवृत्ती घेतलेल्या कर्मचार्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ व भविष्यनिर्वाह निधी आणि सेवा उपदान धनादेश सुपूर्द करून या कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेवानवृत्त झालेल्या व स्वेच्छानवृत्ती घेतलेल्या कर्मचार्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ व भविष्यनिर्वाह निधी आणि सेवा उपदान धनादेश सुपूर्द करून या कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रभाग स्वच्छ ठेवा; शहराचे सौंदर्य राखा
पिंपरी : शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी. शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणारे पोस्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स तातडीने काढण्यात यावेत. तसेच दापोडी गावातील कमानीजवळील चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी आज अधिकार्यांना दिल्या.
पहिला 'परफॉर्मन्स' पाहूनच दुसरा टप्पा राबविण्यात येणार
बीआरटीएसचे सेफ्टी ऑडीट, बीआरटीएस विषयीच्या तक्रारी पाहता पहिल्या टप्प्यातील चार मार्गांवरील बीआरटीएसचा 'परफॉर्मन्स' पाहूनच दुसरा टप्पा राबविण्याचा विचार करु, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बीआरटीएस रस्त्यांचा उद्यापासून पाहणी दौरा राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दादांच्या रुद्रावतार अन् नगरसेवकांची उडालेली भंबेरी
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीत संशयाचे दाट धुके दाटले होते. निष्ठावंतांची त्यामुळे पंचाईत ... त्यामुळे दादांना हे बंड नको आहे. जगताप खासदार झालेच तर, चिंचवड विधानसभेला कॉंग्रेसचा "आमदार' कदापी होणे नाही.
|
'त्या' बारणे, जगतापांची माघार नाहीच
मावळच्या रिंगणात 19 उमेदवार
सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदार संघातील 25 इच्छुकांपैकी 6 जणांनी आज (शनिवारी) निवडणुकीचे रण सोडले. उर्वरीत 19 उमेदवार आपले नशिब आजमाविणार आहेत. निवडणूक रिंगणात नामसाधर्म्य असलेले तीन लक्ष्मण जगताप आणि दोन श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकानेही माघार घेतली नाही. त्यामुळे लढतीची रंगत वाढणार आहे.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदार संघातील 25 इच्छुकांपैकी 6 जणांनी आज (शनिवारी) निवडणुकीचे रण सोडले. उर्वरीत 19 उमेदवार आपले नशिब आजमाविणार आहेत. निवडणूक रिंगणात नामसाधर्म्य असलेले तीन लक्ष्मण जगताप आणि दोन श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकानेही माघार घेतली नाही. त्यामुळे लढतीची रंगत वाढणार आहे.
'आम'चा तत्वनिष्ठ कार्यकर्ता - मारुती भापकर
'दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रीयतेचा देशाला खूप मोठा धोका आहे. तत्वनिष्ठ राजकारणात येत नाहीत, आले तर ते यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी झाले तर नंतर तत्वनिष्ठ राहत नाहीत', असे परखड विचार आहेत आम आदमी पक्षाचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार मारुती भापकर यांचे.
'त्यांनी' फक्त स्वतःच्या जमिनी सोडवून घेतल्या
थेरगावमध्ये अद्याप परिपूर्ण असे खेळाचे मैदान नाही, भव्य सांस्कृतिक हॉल नाही. प्राधिकरणातून फक्त स्वत:च्या जमिनी सोडवून घेतल्या आणि उर्वरीत जनतेला वा-यावर सोडलं. आघाडीची उमेदवारी मिळत असतानाही फक्त आणि फक्त जनतेच्या स्वाभिमानासाठी ती नाकारली. माझं नातं जनतेच्या स्वाभिमानाशी आहे ते मी कृतीतून दाखवून दिलं आहे. तुमचं काय?, असा जळजळीत सवाल लक्ष्मण जगताप यांनी थेरगाव येथे झालेल्या अखिल थेरगाव युवा मंचच्या मेळाव्यात विरोधकांना केला.
अर्ज माघारीसाठी आज कत्तल की रात
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अर्ज माघारी घ्यावा, यासाठी अर्थपूर्ण खेळी रिंगणातील प्रमुख उमेदवारांकडून खेळली जात आहे. आजची रात्र रिंगणातून बाहेर पडणार्यांसाठी भाग्याची ठरणार आहे. प्रमुख उमेदवारांकडून मतांची विभागणी टाळण्यासाठी अधिकाधिक उमेदवार रिंगणातून कसे बाहेर पडतील, यादृष्टीने व्यूहरचना केली जात आहे.
एकाच मोहिमेत तीन सुळके सर
पिंपरी : भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या दहा सदस्यांनी मिळून नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील पहिने नवरा, पहिने नवरी व अंजनेरी नवरा हे तिन्ही सुळके नुकत्याच आयोजित एकाच मोहिमेत सर केले.
Friday, 28 March 2014
Pune's traffic solution, A plan horribly gone wrong
That is what lakhs of IT professional working at Hinjewadi IT park feel, when they commute to office everyday. With an idea was to decongest the roads leading to Hinjewadi at peak hours, the city traffic police has banned right turns at all the four ...
आयुक्त करणार रस्त्यांची पाहणी
पिंपरी : महापालिकेच्या सहा क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारीत भागाचा आठवडाभराचा पाहणी दौरा नुकताच संपला. स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात, आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना देऊन आयुक्त राजीव जाधव यांनी आता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख रस्त्यांचा पाहणी दौरा करण्याचे नियोजन केले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून, चौकांचे सुशोभिकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गतिरोधकांवर पांढरे पट्टे
किवळे : किवळे-सांगवी बीआरटी रस्त्यावरील रावेत परिसरात रविवारी झालेल्या विविध तीन अपघातांत दोघे जखमी झाले होते व सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. महापालिकेने नव्याने बनविलेल्या अधिक उंचीच्या गतिरोधकांमुळे अपघात झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने दखल घेत रावेत परिसरातील सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले आहेत. तसेच रिफ्लेक्टर बसविले आहेत.
मावळातील 25 उमेदवारी अर्ज वैध ; 1 अवैध
मावळ लोकसभा मतदार संघातील 26 पैकी 25 उमेदवारांचे अर्ज आज छाननीमध्ये वैध ठरले. तर एबी फॉर्म नसल्याने बसपाच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये विविध पक्षांच्या 13 उमेदवारांसह अपक्ष 13 असे एकूण 26 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची आज पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली.
तुमचे नगरसेवकपदही राहणार नाही
पिंपरी : ‘‘आमदार आणि मंत्रिपद उपभोगलेले डॉ. विजयकुमार गावित यांच्यासारख्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते हे लक्षात घ्या. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. पदे देतो, काढूनही घेऊ शकतो. आपला गावीत होऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. कारण अशा कारवाईसाठी मला कोणाला विचारावे लागत नाही,’’ अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व नगरसेवकांना दिली.
Water shortage at 3,000 households in PCMC
PIMPRI: Over 3,000 households in Pimpri Chinchwad have been facing an acute shortage of water for the last few months.
खासदार निधी खर्च करण्यात गजानन बाबर महाराष्ट्रात अव्वल
"आपण कोणाचे देत नाय अन् कोणाचे घेत नाय" असे सांगणारे खासदार गजानन बाबर यांनी मात्र, आपल्या मतदारसंघाला भरभरुन दिले आहे. खासदार निधीचा पुरेपूर वापर करणा-यांमध्ये बाबर महाराष्ट्रात अव्वल ठरले असून त्यांनी शंभर टक्के निधी खर्ची केला आहे.
भाजप नेते राम नाईक यांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या कामगिरीविषयी मागविलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार निधी खर्च करण्यात कसूर करत असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. जास्तीत जास्त निधीचा वापर करणा-या खासदारांमध्ये गजानन बाबर यांच्यासह शिवसेनेचे 6, भाजपचे 5 आणि काँग्रेसचे फक्त 4 खासदार आहेत.
‘आप’चे उमेदवार मारुती भापकर यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल
पिंपरी : रिक्षा, बसमधील प्रवाशांशी संवाद साधत साधत महापालिका भवनापर्यंत येऊन अगदी साध्या पद्धतीने आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला.
मोहननगर येथील निवासस्थानापासून सकाळी दहाच्या सुमारास भापकर रिक्षाने चिंचवड स्टेशनला आले. तेथून पीएमपीएल बसमध्ये बसून पिंपरीकडे निघाले. बसमध्ये त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. साडेअकराच्या सुमारास महापालिकेसमोर उतरले. तेथून २५ ते ३0 कार्यकर्त्यांसह चालत प्रवेशद्वारावर आले. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर ‘मैं आम आदमी हूँ’ लिहिलेल्या गांधी टोप्या दिसत होत्या. निवडक पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, दिलीप पवार, प्रशांत खाडे, श्रीमंत बोरसे उपस्थित होते.
मोहननगर येथील निवासस्थानापासून सकाळी दहाच्या सुमारास भापकर रिक्षाने चिंचवड स्टेशनला आले. तेथून पीएमपीएल बसमध्ये बसून पिंपरीकडे निघाले. बसमध्ये त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. साडेअकराच्या सुमारास महापालिकेसमोर उतरले. तेथून २५ ते ३0 कार्यकर्त्यांसह चालत प्रवेशद्वारावर आले. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर ‘मैं आम आदमी हूँ’ लिहिलेल्या गांधी टोप्या दिसत होत्या. निवडक पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, दिलीप पवार, प्रशांत खाडे, श्रीमंत बोरसे उपस्थित होते.
मतदान जनजागृतीसाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या
मतदान करण्याच्या जनजागृतीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध संस्था पुढे सरसावल्या असून त्यांचे 25 प्रतिनिधी घरोघरी जाऊन तसेच माहिती पत्रकांव्दारे मतदानाचे आवाहन करणार आहेत.
चिंचवड येथे दोघांकडून बनावट तिकिटे जप्त
चिंचवड येथील आरक्षण केंद्रात छापा टाकून 78 हजार रूपयांची तिकीटे बुधवारी (दि.26) रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली. रेल्वे पोलिस उपअधिक्षक ए.के रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नार्वेकरांकडे 8 कोटी तर भापकरांकडे 36 लाख मालमत्ता
मावळात श्रीरंग बारणे सर्वात श्रीमंत उमेदवार
मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची 8 कोटी 85 लाख रुपये, आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांच्याकडे 36 लाख 28 हजार रुपयांची मालमत्ता आहे. अर्ज सादर केलेल्या 26 उमेदवारांमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सर्वाधिक श्रीमंत ठरले असून त्यांच्याकडे 52 कोटींची संपत्ती आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची 8 कोटी 85 लाख रुपये, आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांच्याकडे 36 लाख 28 हजार रुपयांची मालमत्ता आहे. अर्ज सादर केलेल्या 26 उमेदवारांमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सर्वाधिक श्रीमंत ठरले असून त्यांच्याकडे 52 कोटींची संपत्ती आहे.
दादांच्या भाषणाच्या चाकण विमानतळावरच ‘घिरटय़ा’
मेट्रोपासून मैलापाणी प्रक्रियेपर्यंतची कामे तर आहेतच, पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले नाही तर भावी पिढी तुम्हा-आम्हाला माफ करणार नाही, असाच दादांचा सूर होता.
भिरभिरताहेत छोटी हेलिकॉप्टर
संजय माने, पिंपरी
मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरतेवेळी बुधवारी महापालिका आवारात झालेल्या गर्दीच्या ठिकाणी ५0 ते ६0 फूट उंचीवर खेळण्यातील हेलिकॉप्टरसारखे छोट्या आकारातील भिरभिणारे ‘कॉडकॉप्टर’ नागरिकांच्या दृष्टिपथास आले. उमेदवारीअर्ज भरण्यासाठी गर्दी झाली असताना, भिरभिरणारे छोटे कॉडकॉप्टर उपस्थितांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. गर्दीच्या ठिकाणी उंचावरून गर्दीचे छायाचित्रण करून सर्व्हेक्षणाच्या कामात हे ‘कॉडकॉप्टर’ उपयुक्त असल्याने त्यामुळे अशा हायटेक यंत्रणेसाठी खर्च करण्यास उमेदवार तयार होत असल्याची प्रचिती या निमित्ताने आली.
मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरतेवेळी बुधवारी महापालिका आवारात झालेल्या गर्दीच्या ठिकाणी ५0 ते ६0 फूट उंचीवर खेळण्यातील हेलिकॉप्टरसारखे छोट्या आकारातील भिरभिणारे ‘कॉडकॉप्टर’ नागरिकांच्या दृष्टिपथास आले. उमेदवारीअर्ज भरण्यासाठी गर्दी झाली असताना, भिरभिरणारे छोटे कॉडकॉप्टर उपस्थितांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. गर्दीच्या ठिकाणी उंचावरून गर्दीचे छायाचित्रण करून सर्व्हेक्षणाच्या कामात हे ‘कॉडकॉप्टर’ उपयुक्त असल्याने त्यामुळे अशा हायटेक यंत्रणेसाठी खर्च करण्यास उमेदवार तयार होत असल्याची प्रचिती या निमित्ताने आली.
निवडणूक विभाग, पोलिसांची ढिलाई
पिंपरी : निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या आत उमेदवारासह केवळ पाचच लोकांना प्रवेश होता. मात्र, हा निवडणूक आयोगाचा नियम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धाब्यावर बसविला. सोमवारसारखीच परिस्थिती आज होती. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ाप्रमाणावर वावरत होते. यातून पोलीस व निवडणूक विभागाची ढिलाई दिसून आली.
सोमवारी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जग
सोमवारी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जग
दादांच्या भीतीने पदाधिकारी हजर
पिंपरी : पक्षविरोधी कारवाया केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड व मावळमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकार्यांना भरल्याने दादांना आपण दिसावे, यासाठी अनेक कार्यकर्ते आटापिटा करीत होते. दादांच्या भीतीने प्रमुख नेते महापालिकेत सकाळी हजर झाले होते. ते केवळ नेत्यांस दिसावे यासाठी.
पिंपरी व चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादीचे महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते रात्री ‘भाऊं’कडे, तर दिवसा दादांच्या उमेदवाराकडे अशी दुहेरी भूमिका बजावतात. हे माहिती पडल्याने उपमुख्यमंत्र्यांनी तळेगाव दाभाडेतील सभेत चांगलेच सडकावले होते. तसेच कोणालाही माफी करणार नाही, असा सज्जड दम भरला होता. मात्र, जगतापांविषयी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. त्यामुळे अजूनही भाऊ आणि दादांना न दुखावण्याची कसरत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करीत आहेत. सोमवारी जगतापांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी काही पदाधिकारी प्रत्यक्षपणे, तर काही अप्रत्यक्षपणे काम करीत होते. चिंचवडच्या काही नगरसेवकांनी थेट निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात भाऊंना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, माध्यमांनी छेडल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेतली होती, तर मावळातील काही पदाधिकारी वाहनतळात गाडीमध्ये थांबले होते.
पिंपरी व चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादीचे महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते रात्री ‘भाऊं’कडे, तर दिवसा दादांच्या उमेदवाराकडे अशी दुहेरी भूमिका बजावतात. हे माहिती पडल्याने उपमुख्यमंत्र्यांनी तळेगाव दाभाडेतील सभेत चांगलेच सडकावले होते. तसेच कोणालाही माफी करणार नाही, असा सज्जड दम भरला होता. मात्र, जगतापांविषयी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. त्यामुळे अजूनही भाऊ आणि दादांना न दुखावण्याची कसरत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करीत आहेत. सोमवारी जगतापांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी काही पदाधिकारी प्रत्यक्षपणे, तर काही अप्रत्यक्षपणे काम करीत होते. चिंचवडच्या काही नगरसेवकांनी थेट निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात भाऊंना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, माध्यमांनी छेडल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेतली होती, तर मावळातील काही पदाधिकारी वाहनतळात गाडीमध्ये थांबले होते.
तीन लक्ष्मण जगताप, २ श्रीरंग बारणे!
पिंपरी : नावात साधम्र्य असलेल्या व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर काही प्रमाणात का होईना मतांचे विभाजन होते. मावळ लोकसभा मतदार संघात नेमकी हीच खेळी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या दोन व्यक्तींनी अपक्ष उमेदवारीअर्ज दाखल केला आहे, तर महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या एकाने अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मण जगताप नावाचे तीन आणि श्रीरंग बारणे नावाचे दोन अर्ज दाखल झाले आहेत.
Wednesday, 26 March 2014
महापालिका पडली चार तास बंद
पिंपरी : उमेदवारी अर्ज सादर करतेवळी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. सुरक्षा व्यवस्था कोलमडली. वाहतूक कोंडी झाली. महापालिका तळमजला ते चौथ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांच्या कक्षापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. पोलिसांना उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करणे भाग पडले, अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी पोलिसांनी दुसर्या दिवशी मंगळवारी कडक धोरण अवलंबले. ओळखपत्र लावलेल्या कर्मचार्यांनासुद्धा महापालिका इमारतीत प्रवेशास मज्जाव केला. ‘‘आम्ही महापालिका आयुक्तांचे नाही, तर फक्त निवडणूक आयोगाचे आदेश पाळतो,’’ अशी कठोर भूमिका घेऊन अनेक कर्मचार्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत बाहेर तिष्ठत ठेवले.
फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, तिच्यासाठी पोटापाण्याचे साधन
पिंपरी : काम-धंदा न करणार्या उडाणटप्पूंनासुद्धा निवडणूक काळात प्रचाराचा झेंडा घेऊन उभा राहिला तरी भरपेट जेवण आणि किमान ३00 रुपये मिळतातच. अशा वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. मात्र, स्वकष्टाने पैसे मिळविण्याची धडपड करणारी महिला निवडणूक काळात गर्दीच्या ठिकाणी दिसून येऊ लागली आहे. शक्तिप्रदर्शन, मेळावे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फेकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तिच्यासाठी पोटापाण्याचे साधन बनल्या आहेत.
कचर्यातील भंगार वेचून त्याच्या विक्रीतून पोटापाण्याची भ्रांत मिटविणे हा नित्यक्रम असलेल्या झोपडीतील वृद्धेला रस्त्यांवर, मेळाव्याच्या ठिकाणी, सभागृहांमध्ये एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आढळून येऊ लागल्या आहेत. सर्मथक म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्याची यंत्रणा उमेदवाराने कार्यान्वीत केल्याचे मंगळवारी शक्तिप्रदर्शनाच्या वेळी दिसून आले.
कचर्यातील भंगार वेचून त्याच्या विक्रीतून पोटापाण्याची भ्रांत मिटविणे हा नित्यक्रम असलेल्या झोपडीतील वृद्धेला रस्त्यांवर, मेळाव्याच्या ठिकाणी, सभागृहांमध्ये एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आढळून येऊ लागल्या आहेत. सर्मथक म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्याची यंत्रणा उमेदवाराने कार्यान्वीत केल्याचे मंगळवारी शक्तिप्रदर्शनाच्या वेळी दिसून आले.
नावाचे फलक अजूनही झळकताहेत
पिंपरी : जिल्ह्यात ५ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आणि पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या हद्दीत असणारे राजकीय पक्षांचे, सदस्यांच्या नावाचे फलक, विकासकामाच्या उद्घाटनाचे फलक झळकत आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन होत नसल्याची तक्रार जागरूक नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
बोर्डाच्या हद्दीत बोर्डाचे उपाध्यक्ष व काही सदस्यांच्या नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानानजीक अद्यापही झळकत आहेत. तसेच एका सदस्याने वार्डात केलेल्या विकासकामाच्या नावाचा उद्घाटनाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे. तसेच काही संघटनांच्या नामफलकावर मंत्र्यांची नावे आहेत. महापालिका हद्दीत मामुर्डी, साईनगर येथे एका राजकीय पक्षाच्या नावाचा फलक आहे. चिंचवड येथे एका नगरसेवकाच्या उपक्रमाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे.
बोर्डाच्या हद्दीत बोर्डाचे उपाध्यक्ष व काही सदस्यांच्या नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानानजीक अद्यापही झळकत आहेत. तसेच एका सदस्याने वार्डात केलेल्या विकासकामाच्या नावाचा उद्घाटनाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे. तसेच काही संघटनांच्या नामफलकावर मंत्र्यांची नावे आहेत. महापालिका हद्दीत मामुर्डी, साईनगर येथे एका राजकीय पक्षाच्या नावाचा फलक आहे. चिंचवड येथे एका नगरसेवकाच्या उपक्रमाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे.
Mild quake jolts Pimpri-Chinchwad
Pune: Parts of Pimpri-Chinchwad experienced tremors as a slight earthquake measuring 3.
श्रीरंग बारणे यांची संपत्ती 52 कोटी 43 लाख
आमदार जगतापांच्या तुलनेत बारणे ठरले श्रीमंत
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांच्याकडे तब्बल 52 कोटी 43 लाख रुपयांची संपत्ती आहे. तीन अलिशान मोटारींसह, एक विदेशी बनावटीचे रिव्हॉल्वरही त्यांच्या नावावर आहे. शेकाप व मनसे पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तुलनेत बारणे श्रीमंत ठरले आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांच्याकडे तब्बल 52 कोटी 43 लाख रुपयांची संपत्ती आहे. तीन अलिशान मोटारींसह, एक विदेशी बनावटीचे रिव्हॉल्वरही त्यांच्या नावावर आहे. शेकाप व मनसे पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तुलनेत बारणे श्रीमंत ठरले आहेत.
मावळचे उमेदवारी अर्ज पोहचले अकरावर
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र वितरणाच्या सहाव्या दिवशी चार नामनिर्देशन पत्राचे (फॉर्म) वितरण व 3 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. आजअखेरीस एकूण 11 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.
'उथळ' भूकंपाने दिघी ते शिवाजीनगर भाग हादरला
शिवाजीनगर ते दिघी परिसर आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजून 24 मिनिटांनी सौम्य उथळ स्वरुपाच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाची खोली पाच किलोमीटर आणि तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंद करण्यात आली आहे.
दिघी, भोसरीचा काही भाग, विश्रांतवाडी, शिवाजीनगर आदी भागातील रहिवाश्यांना भूकंपाचा धक्का चांगलाच जाणवला. भोसरी रेडझोन परिसरात लष्कराच्या वतीने दारुगोळ्याचा सराव करण्यात येतो. या सरावामुळे भोसरी, दिघी परिसरात वारंवार हादरे जाणवत असतात. मात्र, नेहमी जाणविणा-या हाद-यांपेक्षा आजचा हादरा वेगळ्या स्वरुपाचा जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पुणे हवामान खाते आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर हा भूकंपाचाच धक्का होता, असे स्पष्ट झाले.
पतंजली समितीतर्फे योगमहोत्सव साजरा
पिंपरी : पतंजली योग समितीतर्फे शहीद दिन योग महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या मैदानावर ३५00 साधकांच्या उपस्थितीत योग महोत्सव साजरा झाला.
Tuesday, 25 March 2014
PCMC seeks nod to act against ex-staff
The civic administration said, in the budget session of the legislative council in 2013, the question of the machine lying unused since its purchase was raised.
Sena's Adhalrao Patil worth Rs 25.35cr
Shiv Sena candidate from Shirur Lok Sabha constituency Shivajirao Adhalrao Patil on Monday declared assets worth Rs 25.35 crore in an affidavit filed before the returning officer.
Pune’s TDR king lists assets worth mere Rs 4.5 crore, has no vehicle
Laxman Jagtap (51), who is known as the TDR (transfer of development rights) King of Pune, on Monday set tongues wagging by putting his collective assets at a measly Rs 4.5 crore in his affidavit filed at the Maval election office at PCMC headquarters in Pimpri. Not stopping at this, he also identified himself as “an ordinary person”.
Toll free helpline for TB patients
Pune: The State health department launched a toll free helpline 1800-102-2248 on Monday in 10 districts to provide assistance to TB patients and their relatives, regarding hospitals for treatment and medicines, to mark World TB Day 2014.
विश्व कल्याण कामगार संघटनेचा भापकर यांना जाहीर पाठिंबा
बजाज ऑटो लिमिटेड चाकण व आकुर्डी येथील विश्व कल्याण कामगार संघटनेच्या सर्व सभासदांनी मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार मारूती भापकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मारूती भापकर यांच्यासारख्या प्रामाणिक, लढवय्या, निर्भिड, कामगार हितासाठी रात्रंदिवस लढणा-या व्यक्तीस कामगारांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी त्यांना ही एक संधी देण्याचे आवाहन इतर सर्व कामगार संघटनांनी केले आहे. भापकर यांच्याबरोबर सर्व सभासद कामगार कल्याणासाठी भापकर यांना सर्वतोपरी मदत करतील असे आश्वासन दिले आहे.
गंगानगर, पांढारकर चाळ येथील बचतगटांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा
गंगानगर, पांढारकर चाळ येथे नुकतीच मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी येथील बचतगटांनी श्रीरंग बारणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
जगतापांची संपत्ती साडेचार कोटी
पिंपरी : शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडे ४ कोटी ६६ लाखांची मालमत्ता असून, साडेबावीस लाखांचे कर्ज आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतेही दुचाकी, चारचाकी वाहन नाही. स्वसंरक्षणासाठी एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल आहे.
शक्तीप्रदर्शन करीत जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला.
सपाचे टेक्सास गायकवाड यांचाही अर्ज दाखल
आलिशान मोटारी, मोठ्या बस आणि दुचाक्यांच्या फौजफाट्यासह शक्तीप्रदर्शन करीत शेकाप-मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप आणि बहुजन समाज पार्टीच्या टेक्सास गायकवाड यांनी आज (सोमवारी) मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. खासदार गजानन बाबर यांच्यासह शेकाप-मनसेचे नेते जगतापांबरोबर उपस्थित होते.
आलिशान मोटारी, मोठ्या बस आणि दुचाक्यांच्या फौजफाट्यासह शक्तीप्रदर्शन करीत शेकाप-मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप आणि बहुजन समाज पार्टीच्या टेक्सास गायकवाड यांनी आज (सोमवारी) मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. खासदार गजानन बाबर यांच्यासह शेकाप-मनसेचे नेते जगतापांबरोबर उपस्थित होते.
६२ अर्जांची विक्री
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज वितरित झाले. पाच उमेदवारांनी अर्ज भरून दिले. पाच दिवसांत ६२ अर्जांचे वितरण तर एकूण ८ अर्ज भरले.
सोमवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये शेकापचे लक्ष्मण जगताप त्यांचे बंधू शंकर जगताप, बसपचे टेक्सास गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे आणि अपक्षमध्ये अभिजित आपटे यांनी अर्ज सादर केले. आजअखेर एकूण ६२ अर्जांचे वितरण झाले आहे. (प्रतिनिधी)
सोमवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये शेकापचे लक्ष्मण जगताप त्यांचे बंधू शंकर जगताप, बसपचे टेक्सास गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे आणि अपक्षमध्ये अभिजित आपटे यांनी अर्ज सादर केले. आजअखेर एकूण ६२ अर्जांचे वितरण झाले आहे. (प्रतिनिधी)
Monday, 24 March 2014
Sangvi residents irked by mosquito menace
Residents of Sangvi, which is located on the confluence of Mula and Pavana rivers, are grappling with a mosquito menace and blame the civic body for not clearing the massive growth of water hyacinth in the river despite repeated complaints.
Relax construction rules: Bhapkar
Bhapkar blamed all political parties for not opposing laws like collection of penalty charges from unauthorised constructions when they were being passed by the government.
Child TB cases drop in Pune, PCMC areas
Cases of paediatric tuberculosis (TB) have gone down in Pune city and Pimpri Chinchwad but the number has risen in rural parts of the district.
Gold chains worth Rs 1.38 lakh snatched
Three gold chains worth Rs 1.38 lakh were snatched in Pimple Gurav and Chinchwad on Saturday.
‘कोयना लेक टॅपिंग महत्त्वाचे’ - World Water Day organized by PCMC
पिंपरी : महाराष्ट्राच्या इतिहासात कोयना लेक टॅप प्रकल्पाचा मोलाचा वाटा असल्याचे मत जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता दि. ना. मोडक यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी ऑटेक्लस्टर, चिंचवड येथे जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी फोर्बस मार्शलचे व्यवस्थापक रमणी अय्यर, विलो माथर + प्लॅटचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वाटवे, आर्किटेक्ट आसोसिएशनचे अध्यक्ष गौतम शहा, क्रेडाईचे सदस्य संजय देशपांडे, शहर अभियंता एम.टी.कांबळे, कार्यकारी अभियंता शरद जाधव, प्रवीण लडकत, सहायक आयुक्त डॉ.उदय टेकाळे, दिलीप गावडे, सोमनाथ मारणे, सुरेश सोलापुरकर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी ऑटेक्लस्टर, चिंचवड येथे जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी फोर्बस मार्शलचे व्यवस्थापक रमणी अय्यर, विलो माथर + प्लॅटचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वाटवे, आर्किटेक्ट आसोसिएशनचे अध्यक्ष गौतम शहा, क्रेडाईचे सदस्य संजय देशपांडे, शहर अभियंता एम.टी.कांबळे, कार्यकारी अभियंता शरद जाधव, प्रवीण लडकत, सहायक आयुक्त डॉ.उदय टेकाळे, दिलीप गावडे, सोमनाथ मारणे, सुरेश सोलापुरकर उपस्थित होते.
New voters to decide fate of Maval Lok Sabha seat
Pimpri: The Maval Lok Sabha constituency is poised for a four cornered contest, which could be a photo-finish.
Chinchwad youth is lone NRI voter in list of 63 lakh
In an electoral roll of 63 lakh so far, there has been only one Non Resident Indian (NRI) voter registration. Amardeep Banerjee (25) of Chinchwad, who is based overseas, has been the only NRI to register himself as a voter in the forthcoming Lok Sabha polls. Election officials attributed this to lack of awareness among NRI voters. Voter registration concluded on March 15.
रावेतला तीन अपघात
किवळे : किवळे-सांगवी बीआरटी रस्त्यावरील रावेत परिसरात रविवारी झालेल्या विविध तीन अपघातांत दोघे जखमी झाले असून, पाच मोटारी व एका मालवाहू वाहनाचे नुकसान झाले. पालिकेने नव्याने बनविलेल्या अधिक उंचीच्या गतिरोधकांमुळे चालकांना अंदाज न आल्याने अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दहा वर्षे आमदार राहूनही बेकायदा बांधकामाचा प्रश्न सोडविण्यात जगतापांना अपयश- श्रीरंग बारणे
अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाबाबत लक्ष्मण जगताप यांना किती कळवळा आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. विधानपरिषद आणि विधानसभेत दहा वर्षे आमदार राहण्याची संधी मिळूनही त्यांना अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविता आला नाही. अशी टीकाशिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार आप्पा ऊर्फ श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
बाबर-जगताप भेटीने मावळात नवी समीकरणे - शुभेच्छा व आशीर्वादाचे ‘राज’कारण!
चिंचवड येथे शेकाप व मनसेच्या पाठिंब्यावर रिंगणात असलेले लक्ष्मण जगताप यांनी बाबरांची भेट घेऊन बराच वेळ ‘गुफ्तगू’ केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मावळ लोकसभेच्या रिंगणात बसपाकडून टेक्सास गायकवाड प्रतिनिधी, पिंपरी
मावळ लोकसभेच्या रिंगणात बहुजन समाज पार्टीने आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते टेक्सास गायकवाड यांना उतरवले आहे.
सुटीच्या दिवशी उमेदवारांनी साधला मतदारांशी संवाद
पिंपरी : पक्षांकडून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या, तसेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणांर्यानी आज सुटीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधला. प्रचारफेरी, कोपरासभा, मेळावा, गुप्त बैठका घेऊन मतदारांना भूमिका सांगितली. उमेदवारीअर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २६ मार्चला असल्याने उमेदवारीअर्ज घेणे, तसेच ते भरून देण्याचीही उमेदवारांसह कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे निवडणूक विभागही गजबजला आहे.
उमेदवाराचे काम तपासून मतदान करावे - मारुती भापकर
प्रस्थापित पक्षाच्या उमेदवाराने घाटाखाली काय केले आहे, तसेच घाटाखालील उमेदवाराने घाटावर काय काम केले आहे हे मतदारांनी तपासून मतदान करावे असे आवाहन आम आदमी पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार मारुती भापकर यांनी आज (शनिवार, 22मार्च) पत्रकार परिषदेत केले.
सारंग कामतेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेनेतील ‘मास्टर माईन्ड’ कार्यकर्ता, विद्यार्थी सेनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर यांची कोणतेही ठोस कारण न देता पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
Saturday, 22 March 2014
RTE online admissions begin on Monday
As many as 9,440 students are set to get admissions under the 25% reservation scheme of the Right to Free and Compulsory Education (RTE) Act through the online process starting March 24.
तातडीच्या रुग्णांसाठी दारी येणार सुसज्ज रुग्णवाहिका
डायल करा क्रमांक 108
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध असणा-या सुसज्ज रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. गरजूंनी या बाबतची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. त्यासाठी गरजूंना डायल करायचा आहे क्रमांक 108.
अवैध बांधकाम प्रश्नी राजीनाम्याची गरज नव्हती - राहुल नार्वेकर
पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी राजीनामा देण्यापेक्षा विद्यमान आमदारांनी बोलण्याऐवजी कृती केली असती तर ’कॅम्पा कोला’सारखाच हा प्रश्न सुटू शकला असता. आमदाराने आपल्या अधिकारांचा पुरेपुर वापर केला असता तर राजीनाम्याची वेळच आली नसती, अशी टीका राष्ट्रवादी उमेदवार राहुल नार्वेकर यांनी केली.
मावळसाठी तीन दिवसात 43 उमेदवारी अर्जांचे वितरण
प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश
मावळ लोकसभा मतदार संघासाठी तीन दिवसात आत्तपर्यंत 43 उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये निवडणूक लढविणार नाही असे म्हणणारे खासदार गजानन बाबर, शेकापचे लक्ष्मण जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर आणि आपचे मारुती भापकर यांचा समावेश आहे.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी तीन दिवसात आत्तपर्यंत 43 उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये निवडणूक लढविणार नाही असे म्हणणारे खासदार गजानन बाबर, शेकापचे लक्ष्मण जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर आणि आपचे मारुती भापकर यांचा समावेश आहे.
मारुती भापकरांचे विकिपिडिया पेज
सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. मावळमधून अनेक दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांच्यापैकी आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर विकिपिडीयावर चमकले आहेत. मारुती भापकर यांचे विकिपिडिया पेज तयार करण्यात आले असून सध्याच्या टेकसॅव्ही मतदारांवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
मिरवणूक खर्च टाळून गारपीटग्रस्तांना मदत
पिंपरी : नगरसेवक शीतल ऊर्फ विजय शिंदे मित्र परिवारातर्फे शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
मिरवणुकीचा खर्च वाचवून गारपिटीमुळे बाधित शेतकर्यांना शिंदे मित्र परिवार, तसेच चिंचवड येथील यशस्वी मित्र मंडळ, श्रीधरनगर युवा प्रतिष्ठान व भिगवण येथील समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील घरपड झालेले गंगाराम भरणे तसेच डाळिंब व फळबागांचे नुकसान झालेले लीलाबाई खारतोडे, अंकुश गावडे, संतोष पोरे, हरिभाऊ चवरे, वैशाली वाघमोडे, तात्या वाघमोडे व यशवंत मोहिते यांना मदत करण्यात आली.
मिरवणुकीचा खर्च वाचवून गारपिटीमुळे बाधित शेतकर्यांना शिंदे मित्र परिवार, तसेच चिंचवड येथील यशस्वी मित्र मंडळ, श्रीधरनगर युवा प्रतिष्ठान व भिगवण येथील समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील घरपड झालेले गंगाराम भरणे तसेच डाळिंब व फळबागांचे नुकसान झालेले लीलाबाई खारतोडे, अंकुश गावडे, संतोष पोरे, हरिभाऊ चवरे, वैशाली वाघमोडे, तात्या वाघमोडे व यशवंत मोहिते यांना मदत करण्यात आली.
अनधिकृत बांधकामप्रश्नी जुंपली
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जिव्हाळ्याच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरण प्रश्नावरून मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. काल शिवसेनेच्या मेळाव्यात नदीपात्रातील स्वत:ची शाळा वाचविण्यासाठी शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांचा बळी द्यायला निघालेल्या लक्ष्मण जगताप यांना धडा शिकवावा, असे आवाहन उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शेकाप-मनसेचे उमेदवार जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘एकीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी मोर्चा काढून दुसरीकडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी प्रोत्साहन देऊन दुटप्पी भूमिका बारणे घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुर झाली आहे. उमेदवारांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि शेकापचे उमेदवार यांच्यात जुंपली आहे.
महिलांना प्रचाराचा रोजगारभत्ता
चिंचवड : शहरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. गाजावाजा करून प्रचार सुरू झाला नसला तरीही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटरसारख्या सोशल साइटवर प्रचार सुरू केला आहे. चिंचवड परिसरात प्रचाराची पत्रके वाटपासाठी महिला घरोघरी फिरत आहेत. महिनाभर का होईना, मात्र रोजंदारीवर काम मिळाल्याने अनेक महिला प्रचार कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
Friday, 21 March 2014
व्हॉट्स अॅपवर प्रकटले पोलीस निरीक्षकाचे राष्ट्रवादी प्रेम
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रोफाईल फोटोवर प्रफुल्ल पटेल
पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांचे साटेलोटे हे आता उघड गुपित आहे. दोघंही एकमेकांना मदत करीत सत्ता गाजवत असतात. बरेच पोलीस अधिकारी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी अथवा राजकीय नेत्याशी संबंधित असतात. पण हे वैयक्तिक संबंध उघड झाले की मग मात्र गडबड होते. असाच धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी आपल्या व्हॉट्स अॅपवर प्रोफाईल फोटो म्हणुन चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो ठेवला आहे. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे हे राष्ट्रवादी प्रेम सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या बदलीची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली आहे.
पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांचे साटेलोटे हे आता उघड गुपित आहे. दोघंही एकमेकांना मदत करीत सत्ता गाजवत असतात. बरेच पोलीस अधिकारी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी अथवा राजकीय नेत्याशी संबंधित असतात. पण हे वैयक्तिक संबंध उघड झाले की मग मात्र गडबड होते. असाच धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी आपल्या व्हॉट्स अॅपवर प्रोफाईल फोटो म्हणुन चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो ठेवला आहे. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे हे राष्ट्रवादी प्रेम सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या बदलीची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली आहे.
महापालिका आवारात दुपारी खासगी वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी व्यवस्थेअभावी नागरिकांची तारांबळ
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकारण्यात येणार असल्याने वाहनांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून खासगी वाहनांना महापालिका आवारात दुपारी 11 ते 3 या वेळेत प्रवेश बंद केला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अधिका-यांकडून पर्यायी व्यवस्था असल्याचे सांगितले जात असतानाही सुरक्षारक्षक व पोलीस नागरिकांना ही माहिती देत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकारण्यात येणार असल्याने वाहनांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून खासगी वाहनांना महापालिका आवारात दुपारी 11 ते 3 या वेळेत प्रवेश बंद केला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अधिका-यांकडून पर्यायी व्यवस्था असल्याचे सांगितले जात असतानाही सुरक्षारक्षक व पोलीस नागरिकांना ही माहिती देत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
वामन हरी पेठे सन्सची उद्या चिंचवडमध्ये सुरुवात
पिंपरी : सुवर्ण व रत्नजडीत अलंकाराच्या विश्वातले अग्रगण्य नाव असलेल्या आणि १0५ वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या वामन हरी पेठे आणि सन्स या सराफी पेढीची १२ वी शाखा पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होणार आहे.
सर्व चित्रपटगृहांमध्ये ऑनलाईन बुकिंग
पुणे : सर्व मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांत ऑनलाईन तिकीट विक्री यंत्रणा सुरू करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश शासनाने काढले असून रसिकांना घरबसल्या चित्रपट तिकीट आरक्षित करणे शक्य होणार आहे.
स्वतःची शाळा वाचविण्यासाठी 66 हजार बांधकामांचा बळी देणा-या आमदाराला धडा शिकवा बारणे
नदीपात्रात बांधलेली स्वतःची शाळा वाचविण्यासाठी शहरातील 66 हजार अनधिकृत बांधकामांचा बळी द्यायला निघालेल्या आमदाराला मतदारांनी चांगला धडा शिकवावा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा ऊर्फ श्रीरंग बारणे यांनी आज केले.
लक्ष्मण जगताप यांचा आमदारकीचा राजीनामा
पिंपरी : अनधिकृत बांधकामप्रश्नावरून चिंचवडचे राष्ट्रवादीशी संलग्न अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा दणका असल्याचे राजकीय वतरुळात बोलले जात आहे.
शिवसेनेच्या पदाधिका-यांसह 45 जणांचे राजीनामा
एक माजी नगरसेवक, दोन उपशहरप्रमुख व आठ विभागप्रमुखांसह एकूण पंचेचाळीस शिवसेना कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अनेक जणांना महत्त्वाची पदे बहाल करण्यात आली. तसेच श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आल्याचा निषेध म्हणून पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
Thursday, 20 March 2014
Submit demolition details of illegal structures in three weeks, court tells PCMC
The Bombay High Court has asked the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to submit details regarding the demolition of 66,000 illegal structures in its jurisdiction in three weeks.
8 desilting machines lying unused for over three years
PIMPRI: Eight desilting machines and drain cleaning equipment purchased by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), at a cost of over 69 lakh, are gathering dust.
Chandigarh IRS officer to oversee Maval poll spending
PIMPRI: Indian Revenue Service officer from Chandigarh A K Arora will be the election expenditure observer for Maval Lok Sabha seat.
एलबीटी उत्पन्नाने ओलांडला 800 ...
औद्योगिक क्षेत्रात आलेली प्रचंड मंदी आणि लहान व मध्यम स्वरूपाच्या व्यापा-यांचा अल्प प्रतिसाद यामुळे स्थानिक संस्था कराद्वारे (एलबीटी) महापालिकेला मिळणा-या उत्पन्नात घट झाली आहे. मात्र उत्पन्नात गतवर्षीपेक्षा घट दिसत असली तरी एलबीटी लागू झाल्यानंतर पहिल्याच आर्थिक वर्षात महापालिकेने 800 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
अनधिकृत मोबाईल टॉवर हटविला
पिंपरी : साईराज कॉलनी, स्पाइन रोड, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण येथील अनधिकृत मोबाइल टॉवर नवनगर विकास प्राधिकरणाकडून हटविण्यात आला. गेल्या सात वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
महापालिकेतर्फे वायसीएममध्ये पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील के. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय याठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन केले आहे. याठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते एक दरम्यान लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Srirang Barne hopes to gain from division of votes
PIMPRI: The Shiv Sena-BJP led Mahayuti candidate from Maval, Shrirang Barne, has predicted that division of votes between Nationalist Congress Party (NCP) candidate Rahul Narverkar and the Peasants’ and Workers’ Party (PWP) nominee, Laxman Jagtap, will benefit him in the polls.
मावळमध्ये पहिल्या दिवशी 14 उमेदवारी अर्जाची विक्री
मावळ लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज विक्रीस आज (बुधवार) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चौदा उमेदवारी अर्जाचे वितरण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली.
33 मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज (बुधवार) अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. उमेदवारी अर्जाची विक्री महानगरपालिकेतील मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरु झाली आहे.
थेरगावमध्ये आप्पा बारणे यांच्या ...
महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांनी थेरगाव येथील गणेशनगर आणि शिव कॉलनी येथील रहिवाश्यांच्या बैठक घेतल्या. तेथे तुम्हीच उमेदवार आहात, असे समजून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशनगर आणि शिवकॉलनी येथे झालेल्या बैठकीला माजी स्थायी समिती सभापती हिरामण बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख राहुल कलाटे, शिवकॉलनी मंडळाचे अध्यक्ष लहु नवले, आऱपीआयचे बाबा सरोदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आकुर्डी येथे गुरुवारी मतदान जनजागृती कविसंमेलन
शब्दधन काव्यमंच आणि साहित्य संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मतदानाच्या कवितांचे पहिले 'मतदान जनजागृती कविसंमेलन गुरूवारी (दि. 27) आकुर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे.
ग्रीव्हज औद्योगिक सहकारी वसाहत सभागृह याठिकाणी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी पर्यावरण संवर्धन समितीचे सचिव हेमंत माताडे, सरदार वल्ल्भभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, शब्दधन काव्यमंचचे कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, सचिव अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे तसेच साहित्य संवर्धन समितीच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, उपाध्यक्ष आय.के. शेख, सचिव सुहास घुमरे, सहसचिव अॅड. अंतरा देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत.
लघुउद्योगांकडे लक्ष देणारा खासदार हवा
सध्या राज्यात लघुउद्योजकांची ससेहोलपट सुरू आहे. टॅक्समुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. अनेक उद्योजक परराज्यांत उद्योग हलवीत आहेत. त्यामुळे या राज्यात टॅक्स व वीज यांवर शासनाने पॅकेज आणले पाहिजे. जेणेकरून लघुउद्योजकांना नवसंजीवनी मिळेल. निवडून जाणार्या खासदारांनी लघुउद्योगाच्या बाबतीत संसदेत ठोस निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्समधून सूट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या छोट्या उद्योजकांना उद्योग करणे असहय़ झाले. त्यासाठी खासदारांनी झगडण्याची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. सध्या देशात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे लघु उद्योजकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने उद्योजकांपुढे व्यवसायाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भरमसाट टॅक्सआकारणी केली जाते. त्यात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. लघुउद्योजकांना ग्लोबल मार्केटमध्ये स्पर्धा करायची म्हटली, तर ते आव्हान ठरत असल्याने शासनाने उद्योजकांच्या फायद्याचे पॅकेज जाहीर करावे. कर, वीजबिलात सवलत मिळेल, असे काही तरी करावे. जेणेकरून लघुउद्योजकांचे स्थलांतर टळेल.
Wednesday, 19 March 2014
वसंत साळवी व संदेश चव्हाण आठवड्याचे मानकरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिका-यांना उत्कृष्ट कार्याबद्दल ऑफीसर्स ऑफ द वीक सन्मानाने गौरविण्यात येते. या आठवड्याचे मानकरी ठरलेल्या कार्यकारी अभियंता वसंत साळवी व संदेश चव्हाण यांचा आज, (मंगळवारी) महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सत्कार केला.
Bombay high court seeks action against 66,000 illegal structures in Pimpri Chinchwad
MUMBAI: The Bombay high court on Thursday gave its go ahead for thePimpri Chinchwad Municipal corporation to act against an estimated 66,000 illegal structures in the township. A division bench of Justice Abhay Oka and Justice Amjad Sayed also ...
|
Autos to ply by meter in Pimple Saudagar
In a huge relief to the residents of Pimple Saudagar, the autorickshaw drivers in the area will now charge passengers as per meter reading.
Narvekar tries to shrug off dummy candidate tag as Ajit Pawar launches Maval campaign
Deputy Chief Minister Ajit Pawar launches NCP candidate Rahul Narvekar’s campaign in Talegaon on Tuesday. Rajesh Stephen
With NCP corporators openly supporting Peasants and Workers Party candidate Laxman Jagtap and the party refusing to set the record straight, the nomination of Shiv Sena leader Rahul Narvekar as NCP candidate from Maval had stoked speculation of him being a “dummy candidate”. However, Deputy Chief Minister Ajit Pawar’s statement in Mumbai on Monday and in Talegaon on Tuesday has kicked off a debate in the NCP as to whether the “covert” support from the party to Jagtap has been withdrawn.
पुण्यातही मिळणार 'इमर्जन्सी' अॅम्ब्युलन्स
औंध, पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, मगरपट्टा, वानवडी, कोथरुड, वारजे, धायरी, गुरुवार पेठ, धनकवडी, बिबवेवाडी, शिवाजीनगर, मंगळवार पेठ आणि खराडी या ठिकाणी अॅम्ब्युलन्स धावणार असून तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आठ ...
|
'अवैध बांधकामांवर कारवाईस संरक्षण द्या'
पिंपरी : शहरातील ६६ हजार अनधिकृत बांधकामांविरुद्धची मोहीम सुरू ठेवावी, तसेच महापालिका आयुक्तांसह अतिक्रमणविरोधी कारवाई करणार्या पथकाला पोलीस संरक्षण द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सांगवीतील जयश्री डांगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीत हा आदेश देण्यात आला.
पिंपरी येथे 'वंडर व्हेव्ज' ब्युटी पार्लरच्या पिंपरी शाखेचे उद्घाटन
'वंडर व्हेव्ज' ब्युटी पार्लरच्या पिंपरी शाखेचे उद्घाटन नुकतेच प्रिया अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
'वंडर व्हेव्ज' मध्ये आपल्या कुटुंबातील वातावरणातच असल्याची प्रचिती व विश्वासार्हता वाटते असे मत प्रिया बनसोडे यांनी व्यक्त केले.
नेत्यांकडून पक्षाची अदलाबदल सुरू
माजी महापौर आझम पानसरे काँग्रेसमध्ये गेले आहेत. नेत्यांच्या विचित्र खेळीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत. खालापूर, पनवेलला स्वत:ची व्होट बँक व आमदार असतानाही शेकाप आयात उमेदवारास पाठिंबा देत आहे. त्यामुळे त्यांच्याही कार्यकर्त्यांत गोंधळ आहे. सत्तेसाठी आरपीआयने जातीयवाद्यांशी दोस्ती केल्याचा आरोपही होत आहे. निष्ठावंतांना डावलून पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, असा आरोप विद्यमान खासदाराने स्वपक्षीयांवर केला आहे, तर जगतापांना पाठिंबा दिला, तर ते काय पक्षात कायम राहणार का, असा प्रश्न शेकापच्या निष्ठावानांना सतावत आहे. कामशेत : आगामी लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांसह पक्षनेते अन् कार्यकर्त्यांनीही पक्षाची अदलाबदली सुरू केल्यामुळे पक्षतत्त्व अन् पक्षनिष्ठेला हरताळ फासला जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुने- जाणते, निष्ठावान कार्यकर्ते नाराज होत आहेत.
खेळी राष्ट्रवादीवर उलटेल
पिंपरी : ''शिवसेनेच्या चौथ्या फळीतील पदाधिकारी असलले राहुल नार्वेकर यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. शेकापच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लक्ष्मण जगताप यांना रिंगणात उतरवले. शेकापच्या मतांच्या विभाजनासाठी केलेली ही खेळी राष्ट्रवादीवरच उलटेल,'' असा दावा शिवसेनेचे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
'रक्ताचं पाणी करून आप्पांना दिल्लीत पाठवणार
आकुर्डी ग्रामस्थ आप्पा बारणेंच्या पाठीशी
परिवर्तन घडवण्यासाठी पक्ष किंवा नेत्याची नाही. तर चांगल्या विचारांची गरज आहे. म्हणूनच, तळागाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी लढणा-या महायुतीच्या आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांना मावळातून रक्ताचं पाणी करुन लोकसभेसाठी दिल्लीत पाठवणार, असा निर्धार आकुर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यावर आपण खासदार होणार, याबाबत आता दुमत नसल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
Tuesday, 18 March 2014
द्रुतगती मार्गाला लवकरच गती
... होऊन पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. सुमारे 43 किलोमीटरच्या प्रकल्पासाठी 1380 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाला हडपसर, पुणे- नगर रस्ता, सिंहगड रस्ता, बाणेर रस्ता, औंध रस्ता, पिंपरी-चिंचवड रस्ता आणि भोसरी रस्ता जोडले जातील.
वायसीएम आगामी काळातील महत्त्वपूर्ण रुग्णालय - डॉ. संचेती
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा रौप्य महोत्सव
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने पंचवीस वर्षे रुग्णांच्या सेवेत महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळे आगामी काळातील वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण रुग्णालय म्हणून याचा नावलौकीक होईल. भविष्यकाळामध्ये हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय होईल या दृष्टीने रुग्णालय निर्मितीच्यावेळी नियोजन केल्याने आज हे रूप दिसत आहे. असे मत पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यंशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास आज 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
मावळात नेते आघाडीचा नव्हे; बिघाडीचा धर्म पाळणार
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार, हे आता खासदार गजानन बाबर आणि कॉंग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले आझम पानसरे ठरविणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कारण लक्ष्मण जगताप यांचा पराभव हे पानसरेंचे ...पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर राष्ट्रवादीसोबत असले, तरी ...
|
लोकसभा निवडणूक न लढविण्याचा खासदार गजानन बाबर यांचा निर्णय
उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा फडकवत शिवसेनेचा राजीनामा देणारे खासदार गजानन बाबर यांनी ही लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या पक्षात जायचे अथवा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना सांगितले.
अजित पवार कसा घेणार समाचार?
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघाचा प्रचार प्रारंभ तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. १८) दुपारी तीन वाजता होणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार याविषयी सर्वत्र मोठी उत्सुकता आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी धुडकावून लावलेली उमेदवारी, यानंतर उमेदवारी स्विकारण्यास अनेकांनी दिलेला नकार, यातूनच उमेदवार शोधाशोधीसाठी झालेली दमछाक आणि दम देऊनही ‘सकाळी एकाकडे आणि रात्री दुसरीकडे’ जाणारे पदाधिकारी यामुळे ते उद्विग्न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ते कोणाचा समाचार घेणार याविषयीचे तर्कविर्तक लढविले जात होते.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी धुडकावून लावलेली उमेदवारी, यानंतर उमेदवारी स्विकारण्यास अनेकांनी दिलेला नकार, यातूनच उमेदवार शोधाशोधीसाठी झालेली दमछाक आणि दम देऊनही ‘सकाळी एकाकडे आणि रात्री दुसरीकडे’ जाणारे पदाधिकारी यामुळे ते उद्विग्न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ते कोणाचा समाचार घेणार याविषयीचे तर्कविर्तक लढविले जात होते.
राजस्थानी बांधवांच्या पारंपरिक पारंपरिक गेरा नृत्याने पारणे फिटले
कासारवाडी मधील आईमाता मंदिर येथे सिरवी क्षत्रीय समाज बांधवांनी आज (सोमवारी) एकत्र येऊन धुळवडीचा सण साजरा केला. पारंपरिक गेरा आणि घुमर नृत्याच्या पदलालित्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
Monday, 17 March 2014
Music bands help Pimpri Chinchwad Municipal Corporation recover Rs 11cr tax dues
Pimpri Chinchwad corporators may find it humiliating to use brass bands to recover property tax, but the municipal administration finds the exercise highly rewarding.
पिंपरीतील अतिक्रमण कारवाईसाठी प्रशिक्षण
स्टिकर्स, बॅनर्स आणि अनधिकृत फलक यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येऊ नये म्हणून अतिक्रमणविरोधी विभागाला सातत्याने कारवाई करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या सायकल रॅलीमधून पर्यावरण वाचविण्याचा संदेश
सायकल रॅलीमधून दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश
इंधनाच्या दराचा उडणारा भडका आणि त्यामुळे निर्माण झालेला इंधन बचतीचा प्रश्न हा आज गंभीर होत आहे. या सर्व संकटांचा विचार करता नागरिकांनी सायकलींचा वापर वाढविल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. सायकल वापरा, प्रदूषण टाळा, वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा असे पोस्टर लावून पिंपरीतील पर्यावरणप्रेमींनी आज शहरातील प्रमुख मार्गावरून सायकल रॅली काढली. पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
५ टक्केच कंपन्यांचे नियमानुसार 'CSR'
... केलेल्या पाहणीत या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. संस्थेने रांजणगाव, तळेगाव, चाकण, पिंपरी चिंचवड, हिंजवडी, पिरंगुट, हडपसर आणि शिरवळ येथील १०३ कंपन्यांचा अभ्यास केला. यामधील ३० टक्के कंपन्या 'सीएसआर'मध्ये काम करत असल्याचे आढळून आले.
|
'उद्योगनगरी'चे उमेदवार रिंगणात असतील, तर 'आप'ला विजयच भापकर
''त्यांच्या'पेक्षा मावळ, रायगडकरांसाठी वर्षानुवर्षे लढलोय'
मावळ लोकसभेसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार उद्योगनगरीतूनच रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. सर्व उद्योगनगरीचे उमेदवार रिंगणात असतील, तर आपला विजय निश्चित आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी केला आहे. उद्योगनगरीतील 'त्या' उमेदवारांपेक्षा आपण इथल्या प्रश्नांबरोबर मावळ, लोणावळा, कर्जत आणि उरण येथील शेतक-यांसाठी वर्षानुवर्षे लढा दिला आहे, असेही त्यांनी म्हटले.
वीजपुरवठ्यासाठी इमारतीमध्ये जागा हवीच
वेगाने वाढणाऱ्या पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या इमारतींमध्ये वीजपुरवठा यंत्रणेला जागा उपलब्ध होत नसल्याने नव्या ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात महावितरणला अडचणी येत आहेत.
‘सत्यमेव जयते’ने घेतली ‘स्वच्छ’च्या कामाची दखल - आमिर खानचा सलाम
‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात आमिर खान याच्यासमवेत सरूबाई वाघमारे आणि लक्ष्मी नारायण यांनी स्वच्छ संस्थेच्या कामाची माहिती दिली.
प्रचारफेर्या, बैठका,अन कोपरासभा
पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सुटीचे औचित्य साधून उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. दुचाकी फेरी, गुप्त बैठका, कोपरा सभा मेळावा घेऊन विविध पक्षांनी तसेच अपक्षांनी आपली भूमिका समजावून सांगितली. पहिल्या टप्प्यात मतदारभेटीवर भर दिला.
सुटीच्या दिवशीही पाणीपट्टी भरणा
पिंपरी : पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय व करसंकलन कार्यालयांत सुटीच्या दिवशीही भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रविवारपासून (दि. १७) याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे कार्यकारी अभियंता शरद जाधव यांनी सांगितले.
पवनेतील जलपर्णी हटविण्याची मागणी
किवळे : रावेत, किवळे परिसरात पवना नदीच्या पात्रात जलपर्णी वाढू लागली असून, सध्या प्रमाण कमी असतानाच महापालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Sunday, 16 March 2014
अनधिकृत फलकांविरुद्ध आयुक्तांचे कारवाईचे आदेश
स्टीकर्स, बॅनर्स आणि अनधिकृत फलक यामुळे शहराच्या सौदर्यात बाधा येऊ नये म्हणून सातत्याने अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई करावी, अशी सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या. याबाबत लवकरच संबंधित अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आज (शनिवार) सकाळी आठवाजल्यापासून 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागाची त्यांनी पाहाणी केली. त्यानंतर झालेल्या अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. यमुनानगर येथून पाहणी दौ-याला प्रारंभ झाला. त्यानंतर साईनाथनगर, श्रमिकनगर परिसर, रुपीनगर, गणेशनगर, तळवडे, संभाजीनगर येथून उद्यमनगर या परिसराची आयुक्तांनी पाहाणी केली.
शहरात 11 हजार बेकायदेशीर 'फ्लेक्स'वर कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने शहरातील रस्त्या-रस्त्यावर लागलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. चालु महिन्यात महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील सुमारे 11 हजार 166 फलकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज (शनिवारी) दिली.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने 1 ते 14 मार्च या कालावधीत बेकायदेशीर फ्लेक्सबाजी हटविण्याची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये शहरातील सर्व भागात कारवाई करण्यात आली असून सुमारे 11 हजार 166 फलकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
पिंपरीत ४0७, चिंचवडला ४२३ केंद्रे
पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेते प्रचाराच्या आखणीत मग्न असताना निवडणूक विभागही व्यस्त झाला आहे. नवीन मतदारांसह पुरवणी याद्या तयार करणे, दुबार नावे काढणे, यासह परिसरानुसार मतदान केंद्रे, स्ट्राँग रूम, त्याचे नकाशे बनविण्याचे काम सुरू आहे. चिंचवड विधानसभा क्षेत्रात ४२३, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४0७ मतदान केंद्र असणार आहेत. नवीन याद्या अपडेट केल्यानंतर ही संख्या वाढेल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
पर्यावरण जागृतीसाठी निगडीत सायकल फ़ेरी
पिंपरी-चिंचवड उद्योगजकता क्लबतर्फ़े पर्यावरण जागृतीसाठी रविवारी (दि. 16) 13 किलोमीटर अंतराची प्रेरणादायी सायकल फ़ेरी काढण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उदघाटन पुणे सायकल प्रतिष्ठानचे संस्थापक जुगल राठी यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात होणार आहे.
ही सायकल फ़ेरी भक्ती-शक्ती चौकातून निघून बिजलीनगर चौक, चापेकर चौक, पिंपरी कँप, डॉ. आंबेडकर चौक पिंपरी, चिंचवड स्टेशन मार्गे परत भक्ती-शक्ती चौकात या फेरीचा समारोप होणार आहे. सर्वांना या सायकल फेरीमध्ये सहभाग घेता येईल. मात्र, त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे अशी माहिती उद्योगजकता क्लबचे अध्यक्ष विनय चंद्रात्रे यांनी दिली आहे.
चिंचवडमध्ये वेल्डिंग तंत्रज्ञान प्रशालेचे उद्घाटन
लॉर्श वेल्डिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व डॉन बॉस्को व्यावसायिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 'लॉर्श-डॉन बॉस्को वेल्डिंग टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ एक्सलन्स' या वेल्डिंग तंत्रज्ञान प्रशालेचे उद्घाटन झाले.
यावेळी इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे सरसंचालक बेर्नहार्ड स्टाईनरूक, लॉर्श वेल्डिंग प्रॉडक्टस्चे व्यवस्थापकीय संचालक इंद्रजीत मुखर्जी, लॉर्श समुहाचे जागतिक अध्यक्ष वुल्फगांग ग्रुब, विक्री संचालक कॅटॅल्डो स्पोसॅटो, मुंबई डॉन बॉस्को डेव्हलपमेंट प्रॉव्हिन्सचे कार्यकारी संचालक फादर सॅव्हिओ सिल्व्हेरा, फादर एल्सन बॅरेट्टो, कोर्लिस गोन्सालविस आदी उपस्थित होते.
निगडी जकात नाक्याजवळ टॅकरमधून अॅसिड गळती
अॅसिड गळती सुरूच, थांबवणे अशक्य
पुणे-मुंबई महामार्गावरून हॅड्रोकोलीक अॅसिड घेऊन जात असलेल्या टॅकरमधून अचानक अॅसिड गळती होऊ लागली आहे. टॅकर मोकळ्या मैदानात उभा करण्यात आला असून गळती थांबविण्यास अग्निशमन दलाला यश आलेले नाही. अॅसिडचा उग्र वास परिसरात पसरल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार निगडी जकातनाक्याजवळ आज (शनिवारी) सकाळी आठच्या सुमारास घडला.
पिंपरीमध्ये बैठकांवरच भर
पिंपरी : राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा घोळ सुरू असताना आणि शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी घ्यायची की नाही, याबाबत लक्ष्मण जगताप यांनी भूमिका जाहीर केली नसताना प्रचार मात्र सुरू केला आहे. जगताप यांनी पिंपरी गावठाणात बैठक घेतली. यामध्ये प्रचार यंत्रणेचे नियोजन केले.
राष्ट्रवादीकडून पानसरे यांची चाचपणी
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर आगपाखड करून दहा दिवसांपूर्वी काँग्रेसवासी झालेले माजी महापौर आझम पानसरे यांच्याशी शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क साधल्याचे वृत्त आहे.
ग्वाही दादांना, पण ओढ भाऊंची
पिंपरी : शेकापच्या पाठिंब्यावर निवडणूक लढण्यास सज्ज झालेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी पेण येथील मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून १२५ आराम बस धावल्या. सुमारे पाच हजार कार्यकर्ते त्या मेळाव्यासाठी रवाना झाले. त्याचा परिणाम थेरगावात झालेल्या पक्षाच्या मेळाव्याच्या उपस्थितीवर जाणवला.
आमदार जगतापांची भूमिका ठरेना
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळ लोकसभा निवडणुकीत बंडाचे निशाण फडकावल्याने राष्ट्रवादीला मोठा ताप झाला आहे. आमदार जगताप शेकापच्या चिन्हावर लढणार की पाठिंबा घेणार? याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. परिणामी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात होणारी चालढकलीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आमदारांचे बंड राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने तर नाही ना? पक्ष चालढकल का करतोय? अशा चर्चेला उधाण आले आहे.
इंटरनेटच्या प्रसारानंतर देश महासत्ता
पिंपरी : जोपयर्ंत संगणक- इंटरनेट सर्वसामान्यांपयर्ंत पोहचत नाही, तोपयर्ंत देश महासत्ता होणार नाही, असे मत आयटी तज्ञ व लेखक डॉ.अच्युत गोडबोले यांनी शनिवारी व्यक्त केले.
निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ‘स्पेक्ट्रम-१४’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उद्योजक दिलीप धोपावकर, पिं.चिं.एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक प्रा.गिरिश देसाई, प्राचार्य अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा.प्रांजल जोग, विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ‘स्पेक्ट्रम-१४’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उद्योजक दिलीप धोपावकर, पिं.चिं.एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक प्रा.गिरिश देसाई, प्राचार्य अजय फुलंबरकर, समन्वयक प्रा.प्रांजल जोग, विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
Saturday, 15 March 2014
Techies, now enjoy a cool ride to work in Hinjewadi
Senior police inspector (planning), Rajendra Kamire said, “This is a positive move and it will resolve the traffic issue in Hinjewadi area to a great extent as majority of them use private vehicles to commute to their offices.” He added, “However, it ...
PCMC chief does rounds of D ward
PIMPRI: The Commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Rajiv Jadhav accompanied by officials in a fleet of 20 vehicles and two police vehicles, inspected D ward, on Thursday, Jadhav found broken chamber covers on Kaspatewasti Kalewadi roadand reprimanded the local PCMC officials.
प्लॅस्टिक कचरा दिसता कामा नये
पिंपरी : शहरातील रस्ते व मोकळया जागांवर प्लॅस्टिकचा कचरा दिसता कामा नये. याबाबत आवश्यक ती कार्यवाही अधिकार्यांनी करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या. आगामी महिन्यात प्रभागनिहाय पाहणी करून कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा कर्मचार्यांनी केला ‘लिंगाणा’ सर
पिंपरी : लिंगाणा सुळका जवळपास १000 फुटांचा भेदक सुळका म्हटले की लिंगान्याचे रौद्र रूप समोर येते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील हजार फूट उंच असलेला लिंगाणा सुळका पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचार्यांनी सर केला.
पुणे जिल्ह्यातून ‘बोराट्याची नाळ’ आणि ‘सिंगापूरची नाळ’ या जुन्या घाटवाटा लिंगाण्याच्या कुशीतून कोकणात उतरतात. त्यासाठी ‘वेल्हा’ तालुक्यातल्या ‘मोहरी’ या गावी जावे लागते. मोहरीतून रायलिंग पठार गाठलं की लिंगाण्याचे दर्शन घडते. या बाजूला लिंगाण्याची चढाई करावी लागते. चढाई करण्यासाठी १८ जणांचे पथक या गावी पोहोचली. मोहिमेचा नेता अनिल वाघ (फायरमन), उपनेता गौतम इंगवले (फायरमन), संदीप केंजळे, महेंद्र शिंदे, राजेश राऊत, गिरीश कुलकर्णी, ईशा कुलकर्णी, शिवकुमार काकडे, स्नेहल शिंगारे, प्रमीत नाईक यांचा त्यात समावेश होता. समवेत अभिषेक वाघ, ओम काकडे, साक्षी जाधव, आदिती डोंगरे हे बालचमूही होते.
पुणे जिल्ह्यातून ‘बोराट्याची नाळ’ आणि ‘सिंगापूरची नाळ’ या जुन्या घाटवाटा लिंगाण्याच्या कुशीतून कोकणात उतरतात. त्यासाठी ‘वेल्हा’ तालुक्यातल्या ‘मोहरी’ या गावी जावे लागते. मोहरीतून रायलिंग पठार गाठलं की लिंगाण्याचे दर्शन घडते. या बाजूला लिंगाण्याची चढाई करावी लागते. चढाई करण्यासाठी १८ जणांचे पथक या गावी पोहोचली. मोहिमेचा नेता अनिल वाघ (फायरमन), उपनेता गौतम इंगवले (फायरमन), संदीप केंजळे, महेंद्र शिंदे, राजेश राऊत, गिरीश कुलकर्णी, ईशा कुलकर्णी, शिवकुमार काकडे, स्नेहल शिंगारे, प्रमीत नाईक यांचा त्यात समावेश होता. समवेत अभिषेक वाघ, ओम काकडे, साक्षी जाधव, आदिती डोंगरे हे बालचमूही होते.
भाजपचे संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांना पोलिसांकडून धक्काबुक्की
जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेश फी वाढीसंदर्भात शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी गेलेले भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने वादावादी झाली. याचे रुपांतर धक्काबुक्कीत झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार भोसरी येथील इंद्रायणीनगर मधील प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकनाथ पवार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले.
‘दादा, आता तरी चुका सुधारा’
‘बाहेरून पाठिंबा आणि आतून घात’ असे घाणेरडे राजकारण करू नका. दादा, तुम्ही काहींचे खूप लाड केलेत. आता तरी चुका सुधारा, अशा स्पष्ट भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (१४ मार्च) व्यक्त केल्या.
लक्ष्मण जगताप अखेर ‘शेकाप’कडून लढणार
मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार लक्ष्मण जगताप उमेदवार राहणार आहेत, परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतील, असे शुक्रवारी (१४ मार्च) स्पष्ट झाले. याबाबतची घोषणा पेण येथे आयोजित मेळाव्यात करण्यात आली.
जगतापांना माझा पाठिंबा या वावड्याच
पिंपरी : ‘‘अतिशय व्यस्ततेमुळे मला दोनवेळा दौरा रद्द करावा लागला. यातूनच अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असावा, अशा वावड्या येथे उठल्या. मात्र, पक्षातर्फे लवकरच उमेदवारी जाहीर होईल आणि हा उमेदवार पिंपरी चिंचवडमधीलच असेल, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेरगावातील मेळाव्यात केली.
सांस्कृतिक भवनावर खासगी मालकी?
किवळेतील ग्रामस्थांची तक्रार : आयुक्तांना निवेदन
किवळे : येथील महापालिकेच्या सांस्कृतिक भवनाचा गेल्या काही वर्षांपासून एक व्यक्ती खासगी वापर करीत असून, भाडे वसूल करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने हे सांस्कृतिक भवन कार्यक्रमासाठी नाममात्र भाड्याने किंवा मोफत देत असल्याचे सांगितले.
किवळे : येथील महापालिकेच्या सांस्कृतिक भवनाचा गेल्या काही वर्षांपासून एक व्यक्ती खासगी वापर करीत असून, भाडे वसूल करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने हे सांस्कृतिक भवन कार्यक्रमासाठी नाममात्र भाड्याने किंवा मोफत देत असल्याचे सांगितले.
पाणीपट्टी भरण्यास नागरिकांची गर्दी
रहाटणी : सध्या शहरात पाण्याचे बिल भरण्यासाठी नागरिक धावपळ करताना दिसून येत आहेत. मार्च महिन्यात पाण्याचे बिल भरण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही ठिकाणी बिल भरणा स्वीकारण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने नागरिकांना उन्हात तासंन्तास ताटकळत उभे रहावे लागते.
Friday, 14 March 2014
Get LPG cylinders at subsidized rate again
Consumers' confusion over the market rate of the LPG cylinder is finally over as the direct benefit transfer of LPG subsidy (DBTL) scheme has been officially withdrawn with effect from March 10.
..काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवू! - अजितदादांच्या बालेकिल्ल्यात पानसरे यांची गर्जना
आझम ‘भाई’ पानसरे यांनी काँग्रेस प्रवेशानंतरच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांच्या पिंपरी बालेकिल्ल्यात काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मावळचा आज फैसला
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंडाच्या झेंड्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेला घोळ निस्तरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी थेरगाव येथे मेळावा घेणार आहेत. मावळमधून ‘डमी उमेदवार शोधला जाणार का? की जगताप यांचीच समजूत काढली जाणार याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या बहुतांश जणांनी पक्षाच्या बळाशिवाय ‘डमी’ म्हणून लढण्यास नकार दिला आहे.
तीस लाखांची डी सेल्टर मशिन पडून
पिंपरी : गटारांच्या सफाई कामासाठी खरेदी केलेल्या लाखो रुपये किमतीच्या चार ‘डी सेल्टर मशिन’ सहा वर्षांपासून वापराअभावी पडून आहेत. त्यास कारणीभूत असलेल्या अधिकार्यांकडून मशिन खरेदीसाठी व्यर्थ गेलेला खर्च वसूल करावा, अशी मागणी नगरसेविका वर्षा मडिगेरी यांनी केली आहे.
Thursday, 13 March 2014
सत्ताधाऱ्यांचा बाहुला होणार नाही- राजीव जाधव
‘‘लोकप्रतिनिधींचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या विधायक व नियमानुसार असलेल्या सूचनांचा विचार केला पाहिजे. मात्र, आपण सत्ताधाऱ्यांचे बाहुले म्हणून काम करणार नाही, आपले कार्यच योग्य ते उत्तर देईल,’’ असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी ठामपणे सांगितले.
नागरिकांमुळे स्वच्छ, सुंदर शहर शक्य
पिंपरी : शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाही सहभाग आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले. बुधवारी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या भागाची पाहणी आयुक्तांनी केली. त्यानंतर झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शहर अभियंता एम. टी. कांबळे, विकास अभियंता अशोक सुरगुडे, कार्यकारी अभियंता शरद जाधव, मकरंद निकम, जयंत बरशेट्टी, संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी दत्तात्रय फुंदे, सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे उपस्थित होते.
वीज यंत्रणेसाठी आरक्षित जागेची मागणी
वेगाने वाढणा-या पुणे व पिंपरी - चिंचवड शहरात नवीन निवासी, व्यापारी संकुलाच्या जागेत महावितरणच्या वीज यंत्रणेसाठी जागा आरक्षित करावी व त्याचप्रमाणे नकाशा मंजूर करावा अशी मागणी महावितरणच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड शहराचे आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
मतदानादिवशी परीक्षा घेऊ नका
लोकसभेच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असल्यामुळे त्या दिवशीच्या परीक्षा घेऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी पुणे विद्यापीठास दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या स्पष्ट सूचनांमुळे अनेक विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मतदारजागृतीसाठी ‘परिवर्तन’ची मोहीम
येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. अठरा दिवसांच्या मतदार जागृती मोहिमेत पुण्यातील अनेक ठिकाणी विविध माध्यमांचा वापर करून ‘मतदान करा’ असा प्रचार केला जाणार आहे.
‘ते’ लोकसभेत जाऊन काय करणार?
पिंपरी : विधानसभेत प्रश्न सोडवू शकले नाहीत, ते लोकसभेत जाऊन काय करणार, असा सवाल करीत चिंचवड येथे झालेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीबरोबरच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंडखोरीवरही टीका करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडकरांच्या समस्या मांडण्यासाठी मेळावा झाला. यामध्ये शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विनोद नढे, नगरसेवक गणेश लोंढे, अँड. संदीप चिंचवडे, आरती चोंधे, विमल काळे, राजू गोलांडे, ज्योती भारती, बाबू नायर, विनायक रणसुभे, बाळासाहेब वाल्हेकर आदींनी मते मांङली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडकरांच्या समस्या मांडण्यासाठी मेळावा झाला. यामध्ये शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विनोद नढे, नगरसेवक गणेश लोंढे, अँड. संदीप चिंचवडे, आरती चोंधे, विमल काळे, राजू गोलांडे, ज्योती भारती, बाबू नायर, विनायक रणसुभे, बाळासाहेब वाल्हेकर आदींनी मते मांङली.
निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी "बॅकफुट'वर
पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)