Saturday, 30 September 2017

'रोझलँड'वर अभिनंदनाचा वर्षाव

via Sakaal

Roseland Society bagged national level prestigious Swachh Bharat Mission award for category - 'Innovative ideas & practises under RWH'. Award will be given on 2nd Oct, Gandhi Jayanti on the occasion of 3rd Anniversary of SBM in Delhi. From Maharashtra only two - Rosland & Military College will receive Swachhata Award in the hands of PM Narendra Modi

देशातील सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचव्या स्थानी

पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर आहे. आता या शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर सुयोग्य शहराच्या यादीत शहरास पाचवा क्रमांक मिळाला आहे, ही भूषणावह बाब आहे. आपले शहर रहिवाशांसाठी सर्वोत्तम शहर आहे, यावर मोहोर उमटविली आहे. - श्रावण हर्डीकर,
महापालिका आयुक्त

पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच ...

पिंपरी महापालिकेकडून सांडपाणी थेट मुळा नदीत

पिंपरी - शहरातील सांडपाणी पवना आणि इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. मात्र आता मुळा नदीतही सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला आहे. मुळा नदीत आता राडारोड्यासह सांडपाणीही सोडण्यात येत असल्याने तिची गटारगंगा झाली आहे. 

Pimpri Chinchwad civic panel strips garden dept of buying powers

PIMPRI CHINCHWAD: The civic authorities have stripped the garden department of its powers to invite bids to puchase goods, and gave the engineering department the responsibility. The standing committee took this decision as the garden department, ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पाच ठिकाणी पथसंचलन

पिंपरी – विजया दशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शनिवारी (दि.30) शहराच्या विविध भागांत पाच ठिकाणी पथसंचलन होणार आहे.
चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृृहाजवळील धोका मैदान व जीवननगर येथे सकाळी सात वाजता पथसंचलन होणार आहे. आकुर्डीमध्ये छत्रपती शाहू उद्यानासमोर,बिजलीनगर येथील विश्‍वेश्‍वर मंदीराजवळ सकाळी सव्वा सात वाजता पथसंचलन होणार आहे. देहू गटाच्या वतीने म्हेत्रे उद्यान, मोरेवस्ती आणि चिखली येथे सकाळी साडे सात वाजता पथसंचलन केले जाणार आहे.

क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्तांची उचलबांगडी

पिंपरी – महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या जबाबदारीतून सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांना कार्यमुक्‍त करण्यात आले. तर यापुढे क्रीडा विभागाची जबाबदारी सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला.

पिंपरीतील प्रलंबित प्रश्‍नांसाठी पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

चौफेर न्यूज   पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित प्रश्‍नांवर कॉंग्रेसने येत्या लोकसभा व विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे त्यांची भेट घेऊन केली.

विधीमंडळात भ्रष्टाचारावर आवाज उठवू – अजित पवार

पिंपरी – महापालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहारावर भापकर यांनी दिलेल्या सीडी व कागदपत्रानुसार राज्याच्या दोन्हीही सभागृहात आम्ही आयुदांचा वापर करुन आवाज उठविणार आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्‍त केले. सत्ताधारी भाजपच्या सहा महिन्यातील अनेक प्रकरणाबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पंधरा मिनिटे चर्चा केली. गैरकारभारावर विधीमंडळात लक्षवेधी करुन आवाज उठविण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

'सहामाहीत भाजप अनुत्तीर्ण'

'पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गेल्या सहा महिन्यांतील भारतीय जनता पक्षाचा कारभार अपयशी ठरला असून, बहुमताच्या बळावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालू आहे,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम, अजित पवारांचा आरोप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमताच्या जोरावर भाजपाच्या वतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे, एका मिनिटात बजेट मंजूर केले जाते, विरोधकांची कामे होऊ दिली जात नाहीत, विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात ...

दिवस बदलल्यावर ‘ते’ कुठे असतील बघा; अजितदादांचा जगताप-लांडगेंना सूचक इशारा

पिंपरी (प्रतिनिधी):- सध्या राज्यमंत्री मंडळात ‘वर्णी’ लागावी यासाठी एकीकडे शहरातले नेते प्रयत्न करत असताना अजित पवारांनी मात्र या नेत्यांना त्यांची जागा दाखऊन दिली आहे. आता हे नेते मंत्रीपदाची स्वप्ने पाहत आहेत, पण या नेत्यांना ‘मी लहानाचे मोठे केले’, ‘त्यांची ओळख माझ्यामुळे झाली’ ते ‘स्वार्थासाठी’ तिकडे गेले, ज्यावेळी दिवस बदलतील त्यावेळी ते कुठे असतील ते तुम्ही पाहा अश्या शब्दात अजित पवारांनी शहरातील नेत्यांची जागा काय आहे हे दाखवून दिले आहे.

Friday, 29 September 2017

'रोझलॅंड'ला केंद्राचा स्वच्छतेचा पुरस्कार

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीला स्वच्छ भारत दिवस आणि राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर हा पुरस्कार सुरू केला आहे. गांधी जयंतीदिनी (ता. 2 ऑक्‍टोबर) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

PCMC plans insectarium, pheasant unit at Akurdi zoo

The zoo advisory committee of PCMC has approved a resolution for starting insectarium at the Akurdi zoo at its meeting held on Friday. We will soon prepare the plan for it and send it to the Central Zoo Authority of India (CZAI) for its approval. If ...

Patient's relatives go on the rampage in civic-run hospital

He was a resident of Walhekarwadi in Chinchwad. He got a heart attack due to which the family members took him to a private hospital in Chinchwad. Later he was brought to YCM hospital at 9.45 am. He was admitted to the ICU but died around 12.45 pm."

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला अखेर गती; आमदार महेश लांडगे यांची ‘वचनपूर्ती’

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात दररोज संकलित होणा-या घनकच-यावर रासायनिक प्रक्रिया करून विद्युत निर्मिती करण्यासाठी (वेस्ट टू एनर्जी) महापालिका प्रशासनाने अखेर निविदा काढली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरूवात झाली असून, लवकरच कचरामुक्त शहराचे स्वप्न साकार होणार आहे.

‘सीएनजी’चे शहरात आणखी पाच पंप

पिंपरी - शहरातील वाहनांच्या सोयीसाठी येत्या वर्षअखेरपर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पाच नवीन पंप सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. हे पंप सुरू झाल्यानंतर सीएनजी पंपाची संख्या ३० पर्यंत जाऊन पोचणार असल्याचे एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला सांगितले.  हिंजवडी, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी या भागात हे पंप सुरू होणार आहेत.

पवनेपाठोपाठ मुळा नदीतही राडारोडा

पिंपरी - मुळा नदीमध्ये भराव टाकण्याचा धक्‍कादायक प्रकार पिंपळे निलख येथे उघडकीस आला आहे. मनुष्यबळ नसल्याचे सांगत महापालिकेच्या पर्यावरण विभागानेही कानावर हात ठेवले आहेत, तर दुसरीकडे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही आपण नवीनच पदभार घेतल्याचे सांगत कारवाईबाबत असमर्थता दर्शविली आहे. यापूर्वी पवना नदीत भराव टाकण्याचा प्रकार ‘सकाळ’ने वेळोवेळी उघडकीस आणला आणला आहे.

‘आंद्रा, भामा’तील पाणी आरक्षण रद्द

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेला आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून पाणी देण्यासाठी ठेवलेले आरक्षण रद्द केल्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीला तोंड देणाऱ्या महापालिकेला या दोन धरणांतून २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार होते. आरक्षण पुन्हा ठेवण्यासाठी महापालिकेला आता सुधारित फेर प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा लागेल.

राष्ट्रवाद्यांनो, भाजपवर भरोसा नाय काय?

पिंपरी - राष्ट्रवाद्यांनो, तुमचा भाजपवर भरोसा नाय काय..., भाजपची आश्‍वासनं कशी गोल...गोल..., सत्ताधाऱ्यांचं काम कसं फोल...फोल... प्रकल्पांचा झालाय पहा बट्ट्याबोळ... राष्ट्रवाद्यांनो, तुमचा भाजपवर भरोसा नाय काय... असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेली विकासाची कामे सत्ताधाऱ्यांनी अडवून ठेवली आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय विकास माझा, असा प्रश्‍न शहरातील नागरिकांना पडला आहे.

'अनधिकृत'वर शास्तीकर; दीड लाख मिळकतधारक रडारवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता द्या, अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर शंभर टक्के माफ करू, असे आश्वासन देणा-या भाजपाने आपला शब्द फिरविला आहे. त्यामुळे सुमारे दीड लाख ...

कारभाराची झाडाझडती, प्रशासनाची तारांबळ, विरोधी पक्षाने पाठविली प्रश्नावली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सपाटून अपयशाला सामोर जावे लागले. महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. सत्ताधा-यांच्या कारभाराची झाडाझडती ...

लष्कराच्या रस्त्यांबाबत आमदार, पक्षनेत्यांचे संरक्षणमंत्री सितारमन यांना साकडे

पिंपरी-चिंचवडमधील लष्कराच्या हद्दीत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या जागांच्या हस्तांतरणाचा प्रलंबित प्रश्न, बोपखेल गावासाठी मुठा नदीवर कायमचा पूल बांधणे आणि पिंपळेसौदागरमधील लष्कराच्या हद्दीतील रस्त्याचा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप व पक्षनेते एकनाथ पवार यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांची गुरूवारी (दि. २८) दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले. येत्या पंधरा दिवसांत पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी बोपखेल आणि पिंपळे सौदागर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री सितारमन यांनी दिले.

[Video] धमकीच्या पत्राला घाबरून निर्णय बदलणार नाही- तुकाराम मुंढे


शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल

सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. ... स्टेशन-हिंजवडी फेज ३, भेकराईनगर-चिंचवडगाव, वज्र २ वारजे माळवाडी-वाघोली, शेवाळवाडी- पिंपरी पालिका, मनपा भवन-कोंढवा गेट, कात्रज-चिंचवड ...

मध्यवस्तीत धावणार मिडी बस

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल होऊ घातलेल्या दोनशे मिडी बससाठी पीएमपी प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याबरोबरच या बस शहराच्या मध्यवस्तीत या बस सोडण्यात येणार असून मार्गांचीही आखणी करण्यात आली आहे.

अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांचा महापालिकेने केला गौरव

पिंपरीपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे.

पानाच्या दुकानावर इतर वस्तू विकण्यास मज्जाव

नवी दिल्ली- पानाच्या दुकानातून इतर वस्तू विकू नयेत अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे या दुकानातून विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या उत्पादकावर काही काळ परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अशा दुकानात एनवेळी लागणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात. त्यात पेस्ट, ब्रश, चॉकलेट, डासाची अगरबत्ती यांचा समावेश आहे.

पेट्रोलियम पदार्थ लवकरच ई-कॉमर्स वेबसाईट्सवर

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
चौफेर न्यूज – लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. ‘सुरुवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असे काही होऊ शकते याबद्दल अनेकांना शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले. मात्र आता ही संकल्पना सत्यात उतरणार आहे,’ असे प्रधान यांनी म्हटले. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते.

Thursday, 28 September 2017

जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा ५ वा क्रमांक

जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवण्यात आले होते. त्यामध्ये नियोजन, कनेक्टिव्हीटी, सोयी सुविधा व दैनदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार/दृष्टीकोन हे निकष ठेवण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवडमधील अपहरणांच्या घटनांतून 'हे' मुद्दे आले पुढे

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा सात वर्षीय मुलाचं घरासमोरून अपहरण, दोन रात्र तीन दिवस नजरकैदेत अन ५० तासानंतर सुटका…. अगदी चित्रपटाला साजेसं हे अपहरणनाट्य पिंपरी-चिंचवडमध्ये घडलं. त्यातून ...

महापालिकेत लवकरच मेगा भरती?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील जुन्या आकृतीबंधानुसार आवश्‍यक मंजूर पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सुरुवातीला अत्यावश्‍यक आरोग्य, वैद्यकीय, अग्नीशामक यासह अन्य विभागातील वर्ग 1 ते 4 पर्यंतची सुमारे 250 पदे भरण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ग 1 व 2 मधील 37 मंजूर पदे भरण्यात येणार आहेत. त्यानंतर वर्ग 3 व 4 मधील उर्वरित 220 पदे भरली जाणार आहेत. मात्र, सर्वच विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा असून, रिक्‍त पदामुळे अतिरिक्‍त कामाचा ताण येवू लागला आहे. याकरिता प्रशासन विभागाने आवश्‍यक पदाची भरती काढली आहे.

Track survey for Pune-Lonavla suburban belt in four months

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)'s ruling party leader Eknath Pawar had said in April that the corporation had decided to give its share of Rs275.23 crore for laying the two tracks. The length of the railway route in PCMC limits is 16 ...

Worms in drinking water at Pimpri-Chinchwad corporation building

... about in the glass of water served to ward number 10 corporators, Keshav Gholve and Tushar Hinge of BJP, by the peon on Monday turned out to be an 'eye-opener' for the two public representatives of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

Protests over Sunburn Festival venue - The Asian Age

Even other organisations like the Warkari Sampraday, Maratha Seva Sangh and Sambhaji Brigade have come forward to oppose the event.

Locals oppose fest's Moshi venue as it's on Warkari route

The Sunburn Festival's tryst with the state never seems to be on a smooth note. Last year, it had to endure the wrath of locals when Asia's largest festival was ...

वृक्षगणनेस अखेर मंजुरी


पिंपरी - शहरातील सर्व वृक्षांची गणना भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करून केली जाणार आहे. त्याशिवाय वृक्षगणनेसाठी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली जाणार आहे. या प्रणालीच्या वापरामुळे लावलेल्या आणि तोडलेल्या झाडांची नेमकी संख्या समजणार आहे. तसेच झाडांच्या अवैध कत्तलीलाही लगाम बसणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 27) महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली.

तुकाराम मुंढेंना पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र

पुणे (प्रतिनिधी):- पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. यापूर्वी नाव असलेल्या भुजंगराव मोहिते याच व्यक्तीच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. मागील पत्रापेक्षा आज पाठवलेल्या पत्रातील भाषा ही अधिक तीव्र स्वरूपाची असून, मुंढे यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंदी आणि मराठी मिश्रित भाषेतील हे पत्र पोस्टाद्वारे पीएमपीएमएल कार्यालयात पोचले. या विरोधात पीएमपीएमएल प्रशासनाने स्वारगेट पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.

शाळेतील 'लालबत्ती' खेळ ठरतोय धोकादायक

पण गंमत म्हणून खेळला जाणारा हा खेळ सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महाविद्यालयात विद्याथ्र्याचा छंद होऊ लागला आहे. हा विद्यार्थ्यांचा खेळ तुमच्या पाल्याच्या जीवावरही बेतू शकतो. त्याविषयीची घटना नुकतीच कुदळवाडीतील एका ...

पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेवक आपल्याच पक्षावर नाराज

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. त्याच्या कामालाही सुरूवात केली आहे. मात्र प्रभागातील बोपखेल गावाला वगळले आहे, या गावाला कायम ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, अधिका-यांना आरोग्यासाठी मिळाला वेळ

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिका-यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी देणे घेणे नसून अधिका-यांच्या पदोन्नतीतच रस आहे, यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांना वेळ मिळाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने दिलेला शब्द फिरविला, शास्ती करात नाही मिळणार माफी

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर शंभर टक्के रद्द करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. अनधिकृत बांधकामांवरील शास्ती माफ करता येणार नाही, असे पत्रे राज्य ...

नवरात्रीनिमित्त यमुनानगर प्रभागात ‘झाडे लावा झाडे जगवा’चा जागर

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या नवरात्र उत्सवात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत परंतु निगडीतील भाजप नगरसेवक उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी महिला मंडळांना ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देत प्रभागातील महिलांना रोप वाटपाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आ

महापालिकेच्या निविदेलाही “जीएसटी’चा बसला फटका

चौफेर न्यूज-  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सुरक्षा रक्षकांचा कंत्राट कालावधी संपुष्टात आल्यानंतर नव्याने सुरक्षा रक्षक आणि वॉर्डन नेमण्यासाठी पालिकेने राबविलेल्या निविदेला “जीएसटी’चा फटका बसला आहे. “जीएसटी’चा अंतर्भाव करून सुरक्षेसाठी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. तोपर्यंत जुन्याच कंत्राटदाराला चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पदोन्नतीधारक शिक्षकांचा बळी!

पिंपरी – पटसंख्या खालावल्याचा कयास बांधून शाळांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतल्यामुळे पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या मुख्याध्यापकपदास पात्र शिक्षकांच्या पदोन्नीवर गंडांतर आले आहे. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासामुळे शिक्षण मंडळ प्रशासन पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांचा हाकनाक बळी जात आहे. बढती प्रक्रियेला तत्त्वत: पूर्णविराम मिळाल्याने सेवाज्येष्ठता व अर्हताधारक शिक्षकांवर अन्याय झाला आहे.

विठ्ठल मूर्तींचे अखेर बील निघणार!

पिंपरी –जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना पालिकेतर्फे विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती भेट देण्यासाठी रितसर मूर्ती खरेदी करणाऱ्या ठेकेदाराची बिले सव्वा वर्षापासून अदा केली नाहीत. त्यामुळे ठेकेदाराने पालिकेसमोर उपोषण करण्यासाठी विठ्ठलाची पाच फूट उंचीची मूर्ती आणली होती. मात्र, आयुक्‍त हर्डिकर यांच्या चार दिवसांत बील देण्याच्या आश्‍वासनानंतर उपोषणाचा निर्णय ठेकेदाराने मागे घेतला.

Wednesday, 27 September 2017

Locals oppose fest's Moshi venue as it's on Warkari route

Maruti Bhapkar, a former corporator from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) area, told Mirror, “Pimpri-Chinchwad is the land of saints. Two of the prominent ones are Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi, whose temple is at Alandi, and ...

Ajit Pawar to meet PCMC chief to review projects

Pimpri Chinchwad: Former deputy chief minister Ajit Pawar will head a delegation of Nationalist Congress Party (NCP) corporators on Friday morning to meet ...

मेट्रोकामांमुळे मंदगती

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पिंपरीत अतिशय वेगाने सुरू आहे. मात्र, या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने व रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याने पिंपरी ते नाशिक फाटा या तीन किलोमीटर अंतरावरील वाहतूक खूपच ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : संशयास्पद आगीचे सत्र अन् 'लाभार्थ्यां'चे अर्थपूर्ण मौन

फरार आणि अट्टल गुन्हेगारांचे 'आश्रयस्थान' मानल्या जाणाऱ्या चिखली कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांची बहुतांश दुकाने व गोदामेही बेकायदा आहेत. या भागात आगीच्या घटना नेहमी घडतात. मात्र, आगी लागतात की विशिष्ट हेतूने लावल्या ...

अप्पर पोलिस आयुक्तांचे पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यालय

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यासाठी आता अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे स्थलांतर शहरात होणार आहे. सध्याच्या उपायुक्त कार्यालयातील एका मजल्यावर अप्पर आयुक्तांचे कार्यालय आणि स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून, सहायक पोलिस आयुक्तांचे कार्यालय एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात स्थलांतर करण्यात येणार आहे. सोमवारी (२५ सप्टेंबर) याबाबत आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

Seven-year-old boy released by kidnappers - fullstory

Pune, Sep 25 (PTI) A seven-year-old boy, who was allegedly kidnapped for ransom from his housing society in Chikhali in Pimpri Chinchwad area two days back, was released by his kidnappers this evening as they developed "cold feet", police said.

महामार्गांवरील मद्यविक्रीची एक हजार दुकाने बंद

पुणे - महापालिका, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातील मद्यविक्री बंदी उठविण्याबाबतच्या न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 619 मद्यविक्री आस्थापनांपैकी राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरावरील एक हजार आस्थापना बंद असल्याचे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी केले. तसेच आदेशाचा चुकीचा अर्थ लावत सर्व मद्यविक्री आस्थापना सरसकट सुरू झाल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ई-टॉयलेटचे निगडीत उद्‌घाटन

निगडी - स्मार्ट आणि स्वच्छ शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पहिल्या ई टॉयलेटचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २५) निगडीत झाले. शहरात अजून चार ठिकाणी अशी ई टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.
महापालिका आणि सॅमटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ई टॉयलेटची गरज, किफायतशीरपणा यावर उपस्थित मान्यवरांनी मते मांडली. स्वच्छता अभियानात ई टॉयलेटची गरज असून, या अभियानाला यामुळे अधिक चालना मिळेल. अशा टॉयलेटच्या उभारणीसाठी अधिक पुढाकार घ्यावा; तसेच स्वच्छ शहरासाठी पालिकेने अशा टॉयलेटची संख्या वाढवावी. प्रसंगी अधिक आर्थिक भार पेलावा, अशीही सूचना वक्‍त्यांनी या वेळी केली.

बिल थकल्याने गॅस शवदाहिनी बंद

पिंपरी - नेहरूनगरमधील प्राण्यांच्या गॅस शवदाहिनीला लागणाऱ्या सीएनजीचे आठ महिन्यांचे एक लाख ६९ हजार ४६९ रुपयांचे बिल थकल्याने गेल्या चार दिवसांपासून गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीने महापालिकेकडे पाठपुरावा करूनही बिल मिळाल्याने गॅसपुरवठा थांबविण्याचा निर्णय कंपनीने घेतला. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आल्यावर थकीत बिल देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भंगारच्या गोदामाला भीषण आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत गोदामाला लागलेल्या आगीची झळ परिसरातील चार गोदामे आणि इतर दहा दुकानांना बसली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी ...

पिंपरी चिंचवडच्या वेगवान विकासासाठी अजितदादा मैदानात..!

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातून सत्ता गेल्यानंतर एका मेळाव्याच्या निमित्ताने शहरात आलेले अजित पवार पुन्हा शहरात येत आहेत. पण अजित पवारांची ही भेट महापालिका अधिकाऱ्यांच्या झाडाझडतीसाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली असली तरी राष्ट्रवादीने मंजूर केलेले अनेक प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांची कामे झाली, पण सत्ता परिवर्तनानंतर मात्र ही सर्व कामे रखडली आहेत. त्याच बरोबर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागात कामे होत नसल्याची तक्रार ही आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी दि.२९ रोजी अजित पवार सकाळी साडेनऊच्या सुमाराला महापालिकेत येणार आहेत. या भेटीत ते आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मिळकत कर भरा अन्यथा कारवाई

पिंपरी – शहरातील मिळकत धारकांनी 30 सप्टेंबरपर्यंत कर भरणा करावा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
मिळकत कर भरणा करण्यासाठी महापालिकेची सर्व कर संकलन विभागीय कार्यालये दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत खुली ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या संकेत स्थळावरून ऑनलाईन कर भरणा करता येईल. मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्यास सामान्य करात दोन टक्के सवलत देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेकांनी लाभ घेतला आहे. आजअखेर ऑनलाईनद्वारे 91 हजार 142 मिळकतधारकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतला आहे. ऑनलाईन गेट-वेद्वारे 96.80 कोटी रुपये कर संकलीत झाला आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

“स्वच्छता ही सेवा’ मोहिमेअंतर्गत 60 टन कचऱ्याचे संकलन

चौफेर न्यूज – स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील आठ क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत सुमारे 60 टन कचरा जमा केला आहे.

पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या विकासाचा भार महापालिकेवर

राज्य सरकारच्या ३१ मार्च २०१७च्या अधिसूचनेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भागातील काही नगरपालिका व महानगराभोवतीच्या गावांसाठी प्रादेशिक विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास ...

स्वस्त धान्यासाठी ‘आधार’ सक्ती!

पुणे - केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वस्त धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडणी बंधनकारक आहे. त्यानुसार एक ऑक्‍टोबरपासून आधार कार्ड नसेल, त्या लाभार्थींना स्वस्त धान्य दिले जाणार नाही. याबाबत राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिला आहे. 

टाटा मोटर्सतर्फे कामगारांना २९ हजारांचा बोनस जाहीर

पिंपरी (प्रतिनिधी):- टाटा मोटर्सतर्फे आज (मंगळवारी) टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता बोनस व २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदान रकमेसाठी करार झाला. ज्यामध्ये कंपनीने एकूण २९ हजार इतकी रक्कम करारानुसार देण्याचे मान्य केले आहे.

Tuesday, 26 September 2017

निगडी-दापोडी बीआरटीला प्रतीक्षाच

पिंपरी - पिंपरी चिंचवडकरांना निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग सुरू होण्यासाठी आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. या मार्गावरील अनेक कामे अजूनही अपूर्ण असल्यामुळे ही ‘डेडलाइन’ महिन्याभराने वाढली आहे. 

जादा ट्रॅकचे सर्वेक्षण चार महिन्यांत - श्रीरंग बारणे

पिंपरी/कामशेत - पुणे-लोणावळादरम्यानच्या प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे सर्वेक्षण येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रकिया काढण्यात येईल, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कामशेत येथे पत्रकारांना दिली; तसेच पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेसाठी (लोकल) स्वतंत्र कॉरिडॉर करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केलेले आहे. येत्या दोन वर्षांत या कामाला प्रत्यक्षात सुरवात होण्याची शक्‍यता आहे.

नव्या गृहबांधणी प्रकल्पांमध्ये भरीव वाढ

पुणे - परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना पायाभूत सुविधांचा दर्जा मिळाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उभारणे सोपे झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक बिल्डरांकडून वाढली असल्याचे आढळून आले आहे. परिणामी बांधकाम व्यावसायिकांनी आता अशा सदनिकांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती –अंत्योद्य दिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिका भवनात फिल्टरमध्ये सापडल्या आळ्या

पिंपरी-चिंचवड पालिका भवनातील तिस-या मजल्यावर पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत. नगरसेवकांनीच हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दखल घेतली.

प्रत्येक किलोमिटरवर अँटोमॅटीक टॉयलेट बसवावेत – लक्ष्मण जगताप

शहरवासीयांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शहरात स्वच्छता गरजेची आहे. शहरात प्रत्येक किलोमिटरवर अशा प्रकारचे अँटोमॅटीक टॉयलेट बसविण्यात यावेत. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

‘सिमॅसेस’ अभ्यासक्रमातून मिळणार नवी दिशा

पिंपरी - येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रिसर्च महाविद्यालयात ‘सिमॅसेस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे नवी दिशा मिळणार असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

अपहरण झालेल्या ओम खरातची सुखरूप सुटका

पुणे - निगडी येथून दोन दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण झालेल्या ओम मोहन खरात (वय, ९, रा. पूर्णानगर, चिखली) याची सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास सुखरूप सुटका करण्यात आली. 

पांरपरिक वाद्यांचा तालघोष व ढोल-ताशाच्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या ढोल-ताशा आणि पांरपरिक वाद्यांचा तालघोष या तबला समूहवादनाच्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक कलाकरांनी एकाचवेळी एकत्र अगदी सुरात ढोल-ताशाचे वादन केले. ढोलताशाची पाच पथके सहभागी झाले होती. ढोल-ताशा पथकांनी सादर केलेल्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली.

स्वप्नातून ‘ध्येय’ ठरते, ध्येयातून ‘दिशा’ सापडते – तुकाराम मुंढे

पिंपरी (प्रतिनिधी):- स्वप्नातून ध्येय ठरतात आणि ध्येयातून दिशा सापडत असते, असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी येथे केले. आपण निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक असतात. असे सांगून स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जीवनातील कोणत्याही परीक्षेत निश्चितपणे यशस्वी होतोच असेही ते म्हणाले.

खेळाचे मैदान झाले गायरान; नगरसेवक विक्रांत लांडे यांचे अनोखे आंदोलन

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करून त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात क्रीडा संकुलात म्‍हशी सोडून राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अनोखे आंदोलन करून सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा निषेध केला.

Monday, 25 September 2017

आदिशक्‍ती – तळवडेची ग्रामदेवी घारजाई माता

पिंपरी – जगदंबेची विविध रूपं सर्वांनाच मोहीत करतात. कुठे दुर्गा तर कुठे चंडी लक्ष्मीचे रूप धारण करणारी ही कुलस्वामीनी सर्वत्र वसलेली आहे. फक्त तिचे नाव, रूप वेगळे असले तरीही, तिच्यावर प्रत्येकाची असलेली भक्ती काकणभर जास्तच. म्हणून प्रसिध्द असणारी रूपीनगर -तळवडे गावची ग्रामदेवी घारजाई माता.

Regularize illegal water lines: Savale

There are over 10,000 illegal water connections in the civic limits, which should be regularized to fetch additional revenue for the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Savale said during a discussion on issues pertaining to water supply at ...

मी आयुक्त बोलतोय । स्वच्छ पिंपरी चिंचवड मिशन

मी आयुक्त बोलतोय । स्वच्छ पिंपरी चिंचवड मिशन: 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसर हागणदारी मुक्त घोषित करण्यासाठी महत्वाच्या सूचना आपल्यासमोर मांडत आहे. Important instructions to make Pimpri Chinchwad 100% Open Defecation free. Please hear my appeal


PCMC's 'JetPachter' brings pothole saga to an end

On one hand, PMC was not following the standard procedure, while on the other, neighbouring Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) showed the way by following the guidelines. Aiming to accelerate road repairs for this rainy season, PCMCon ...

पहिले मेट्रो स्टेशन मोरवाडी चौकात

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे पहिले स्टेशन हे पंधरा मीटर उंचीवर (सुमारे पाच मजले) असणार असून, त्यासाठी मोरवाडी चौकात इमारत बांधण्यात येणार आहे. ट्रॅक कनेक्टर (ट्रॅक चेंजर) हा मोरवाडी चौकापासून २०० ...

पाणी पुरवठा विभागाला चुना?

52 लाखांचे धनादेश वटलेच नाही : वसुली पथकाचे दुर्लक्ष
पिंपरी – शहरातील नळजोड धारकांनी पाणीपट्टी थकबाकी पोटी दिलेले सुमारे 52 लाख 70 हजार 613 रुपयांचे धनादेश वटलेले नाहीत. महापालिका पाणी पुरवठा विभागातील वसुली पथकानेही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये “पाण्यात’ गेले आहेत. धनादेश न वटलेल्या ग्राहकांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्वसूचना न देताच महापालिकेची शाळा बंद

पिंपरी - पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने ३९ शाळांचे एकत्रीकरण करून १९ शाळा बंद केल्या. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा महापालिकेच्या उरो रुग्णालय शाळा क्र. १००ला कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारपासून (ता. २५) शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी विद्यार्थी, पालक व शिक्षक धास्तावले आहेत. शाळा अचानक बंद झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर दुसरी शाळा शोधण्याची वेळ आली आहे. 

शिवसेना शहरप्रमुख ठरणार दसऱ्यानंतरच

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शिवसेना शहरप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी हा निर्णय दसरा मेळाव्यानंतरच होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाल्यानंतर संपर्कप्रमुखांबरोबरच शहरप्रमुख बदलाचीही चर्चा सुरू झाली होती. आता दसरा मेळाव्यानंतर त्याला पूर्णविराम मिळेल, असे संकेत आहेत.

पिंपरीत गवार, काकडीची आवक वाढली

पिंपरी – पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्या व पालेभाज्यांची आवक घटली आहे. सलग दोन आठवडे आवकेत घट होत असताना गवार व काकडीची आवक मात्र वाढली आहे.
भेंडीची आवक एक क्विंटलने घटली असून, सरासरी भाव 3100 रुपयांवर स्थिरावला. टोमॅटोची सहा क्विंटल आवक झाली असून, भावात 200 रुपयांची वाढ झाली. मिरचीची आवक स्थिर राहूनही भावात 1000 रुपयांची वाढ झाली. तर फ्लॉवरची आवक तीन क्विंटलने घटली. मक्‍याची आवक दोन क्विंटल झाली आहे. याशिवाय घोसावळेची सात क्विंटल तर भूईमुग शेंगांची एक क्विंटल आवक झाली आहे.

पिंपरी शहरात नवरात्रोत्सवाची वाढती रंगत, दिघीत नवदुर्गा महात्म्य

सांगवी : सांगवी परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, महिला मंडळ आणि विविध मित्र मंडळांच्या विलोभनीय मूर्तींचे परिसरात भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे़ परिसरातील कीर्तीनगर, त्रिमूर्तीनगर, काटेपुरम चौक, 

मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता: दिलीप कांबळे

जुनी सांगवी : मी सर्वसामान्य कुटुंबात वाढलोय. इतरांसारखा गुंठामंत्री किंवा वारसाने झालेला राजकारणी नाही. मी आज मंत्री असलो तरी आज ही मी झोपडपट्टीत राहतो. मी कुणाला घाबरत नाही. कारण मी कधी चुकीच करत नाही. मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता आहे, असे पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सुप्रिम कोर्टाने दिलेल्या जागेच्या निकालाबाबत विजयी मेळाव्यात समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळ यांनी म्हटले आहे.

दिवाळी पर्यटनाला “अच्छे दिन’

परदेशी पर्यटनाचा ओघ वाढला : महागाई, जीएसटीचा परिणाम नाही

पुणे – दिवाळी सुटीत पर्यटनाला जाण्याची “क्रेझ’ मागील काही वर्षात वाढली आहे. यातही नावीन्य शोधले जात आहे. पूर्वी पर्यटनाचा एक ठराविक साचा असायचा. यामध्ये निसर्गसौंदर्य किंवा देवदर्शन या दोनच गोष्टींना महत्त्व दिले जायचे. सध्या मात्र नाईटलाईफ, कॅसिनो, क्रूझ सफर, हनिमून, पर्यटन आणि “हटके डेस्टिनेशन’ असे पर्याय निवडले जातात. यातही परदेशी पर्यटनाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Sunday, 24 September 2017

PCMC bars contractor for 10 years for shoddy work

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has barred a contractor from participating in bids related to sewage treatment plants' ...

पिंपरी-चिंचवडला पाच ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहे सुविधा

पिंपरी-चिंचवड शहरात पाच ठिकाणी 'अ‍ॅटोमॅटिक पब्लिक टॉयलेट' बसवण्यात येणार आहेत, यासाठी 'सॅमटेक क्लिन अ‍ॅन्ड केअर' या कंपनीने पुढाकार घेतला आहे. सर्वसोयींयुक्त तसेच महिला व पुरूष असे दोघांनाही वापरता येतील, अशा प्रकारची ही ...

तळवडे ‘सफारी पार्क’च्या जागेची पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डिकर यांचेकडून पाहणी

रेन फॉरेस्ट, नाईट पार्क की बर्ड पार्क: पालिकेकडून सर्वेक्षण सुरु 
तळवडे येथील मोकळ्या जागेत डिअर सफारी पार्क उभारण्याची संकल्पना महापालिके आहे. मात्र, त्याबरोबर रेन फॉरेस्ट, नाईट पार्क आणि बर्ड पार्क यापैकी काही करता येईल का, याचाही विचार पालिका करत आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू असून ऑनलाईन पध्दतीने नागरिकांचे अभिप्राय घेतले जात आहेत. दरम्यान, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नियोजित सफारी पार्कच्या जागेची शनिवारी (दि. २३) पाहणी केली.

कचरा व्यवस्थापन न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका – आयुक्‍त हर्डीकर

चौफेर न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, घरोघरचा कचरा गोळा करुन डेपोपर्यंत वाहून नेणे आणि शहरातील रस्ते व गटर्स साफसफाई आठ प्रभागात प्रत्येकी एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्यामुळे त्या सर्व कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत पूर्वीच्या ठेकेदारांना मुदतवाढ देणे आवश्‍यक होते. जर मुदतवाढ दिली नसती तर शहरातील सगळा कचरा जागोजागी ठप्प होवून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले असते, अशी कबुली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

..तर 'रिलायन्स'चे काम काढा

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव,पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य ...

हिंजवडी मेट्रो कुणाकडे?



पुणे शहरात मेट्रो प्रकल्पांतर्गत दोन मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यापैकी शिवाजीनगर ते िहजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी- पीएमआरडीए) करण्यात ...

अवैध धंद्यांत पोलिसांची भागीदारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बसेल चाप

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परिसर येतो. पोलीस मुख्यालयापासून हे अंतर ३० ते ३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून या भागातील पोलिसांवर पूर्ण नियंत्रण ...

“रेन्ट टू ओन’ धोरणाचे अनेक फायदे

फ्लॅट भाड्याने दिल्यास भाडेकरूच्या बाजूने कायदा असल्यामुळे मालक फ्लॅट भाड्याने देत नाहीत. याचा सुवर्णमध्य साधणारी “रेन्ट टू ओन’ ही योजना सरकारने तयार केली असून, त्याअंतर्गत भाड्याने घर घेणारा काही कालावधीनंतर घराचा मालकही होऊ शकेल. तसेच भाडेकराराच्या अटी दोघांनाही मान्य असतील याची काळजी सरकार घेणार आहे. शहरात यामुळे कुणी बेघर राहणार नाही. 
– कमलेश गिरी 

नोकरीसाठी फोन आलाय? जरा जपून...

खोट्या आमिषाने अनेक बेरोजगारांची फसवणूक
पुणे: ऑनलाइन नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने काही संस्था बेरोजगार तरुणांना लुबाडून पसार होतात. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर नव्या नावाने संस्था सुरू करून पुन्हा बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. पोलिसांनी अशा सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांमधून केली जात आहे.

स्वप्नातील घरकुलासाठी तुडुंब गर्दी, 'लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७'मध्ये शेकडो गृहप्रकल्पांचा सहभाग

एकाच छताखाली पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रॉपर्टीचे पर्याय नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी 'लोकमत'च्या वतीने आयोजित केलेल्या 'लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७' या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली ...

चिंचवडमध्ये घुमणार ताल घोष

पिंपरी – चिंचवड नवरात्र महोत्सावअंतर्गत उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड येथे पारंपारीक वाद्यांच्या महावादनाच्या ताल घोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी दिली.
चिंचवड बस स्टॉप जवळील चापेकर चौकाजवळील प्रांगणात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता वादनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, पुण्यातील नुमावि वाद्यपथक, श्री शिव दुर्गा ढोल-ताशा पथक, एक दिल ताशा पथक सहभागी होणार आहेत.

शिवसेनेत शहर प्रमुख बदलाच्या हलचाली?

सोमवारी मातोश्रीवर बैठक : उबाळे, आल्हाट, चिंचवडे, भापकर चर्चेत
पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच शिवसेनेचे विद्यमान शहर प्रमुख राहुल कलाटे यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपत आल्याने शिवसेनेकडून नवीन शहर प्रमुखाची निवड केली जाणार आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी (दि. 25) मातोश्रीवर बैठक होणार आहे. या पदासाठी शहर महिला संघटक सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मारुती भापकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे यांचे नाव चर्चेत असून शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उबाळे यांचे नाव आघाडीवर आहे.

भाजपा कामगार आघाडीचा अभ्यास वर्ग

चौफेर न्यूज –  भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने कामगार प्रतिनिधींकरीता रविवारी (दि.24)अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोरवाडी येथील हॉटेल घरोंदा येथे हा अभ्यास वर्ग आयोजित केला आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या अभ्यास वर्गाचे उद्‌घाटन होणार असून यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित राहणार आहेत.

चिंचवड ते राजगुरूनगर बस सुरू करण्याची मागणी

चौफेर न्यूज –  ‘पीएमपी’ची चिंचवड ते राजगुरूनगर बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून राजगुरूनगर या ठिकाणी कामासाठी जाणारा नोकरदार वर्ग जास्त आहे. राजगुरूनगरपर्यंत जाण्यासाठी दोन बस बदलून जाव्या लागतात. त्यासाठी चिंचवड ते राजगुरूनगरपर्यंत बस सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अण्णा भाऊ साठे स्मारक समितीवर गोरखे

पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून घाटकोपर परिसरातील चिरागनगरात लोकशाहिरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या समितीत पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Saturday, 23 September 2017

तळवडे ५८ एकर जागेत तुम्हाला कोणते उद्यान पहायला आवडेल? पालिकेची ऑनलाईन सर्वेक्षण मोहिम!

पिंपरी चिंचवड शहरात मौजे तळवडे येथील सुमारे ५८ एकर जागेत प्राणिसंग्रहालय (डीयर सफारी / झू पार्क) करण्याचे नियोजन आहे. सदर संदर्भाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरीकांचे अभिप्राय जाणुन घेऊ ईच्छीते. सर्व नागरीकांना आपले अभिप्राय नोंदवुन मनपास सहकार्य करण्याची विनंती. Pimpri Chinchwad Municipal Corporation earmarked an area of 58 acres in Village Talawade for development of a zoo / safari park. PCMC wish to understand a citizen’s opinion for the proposed project and is appealing to all citizens to participate

 Online Link - goo.gl/8WDCW3

पहिल्या अँटोमॅटीक टॉयलेटचे उद्घाटन

शहरात निगडी बसस्टॉप येथे सॅमटेक क्लिन अँड केअर कंपनीच्या खर्चातून अँटोमॅटीक टॉयलेट बसविण्यात आले आहे. या टॉयलेटचे उद्घाटन सोमवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे.

‘समरसता’ गुरुकुलम आर्थिक अडचणीत

पिंपरी - चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेतर्फे वंचित समाजातील ३२९ विद्यार्थ्यांना निवासी शाळेत शिक्षण दिले जाते. विनाअनुदानित असलेल्या या संस्थेला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, राष्ट्रीय नेत्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुकही केले आहे; मात्र सध्या ही संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. वीजबिल न भरल्याने येथील विद्यार्थी १५ दिवस अंधारात होते. आजही लाखो रुपयांचे वीजबिल, मिळकतकर आणि शिक्षकांचे पगार थकले आहेत.

[Video] खड्डे बुजविण्यासाठी पिंपरी पालिका वापरणार 'जेट' पॅचर यंत्रणा

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्डयामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पालिका आता शहरातील खड्डे बुजविण्यासाठी 'जेट' पॅचर पोथॉल मशिनचा अवलंब करणार आहे. या आधुनिक मशिनद्वारे खड्डे बुजविण्यास शुक्रवारी नाशिक फाटा येथून सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मान्सूनपूर्व डागडुजी करण्यात न आल्याने उद्योगनरीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविताना पालिकेकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलंब केला जात नाही. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दिवसें-दिवस उग्र बनत आहे. खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित केले आहे

[Video] कुदळवाडीत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग; चार बंब घटनास्थळी

कुदळवाडी येथील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे नेमके समजू शकली नाही. आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागली आहे. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची गोडावून आहेत. या गोडाऊनला अनेकदा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. गुप्ता वजन काटा येथील भंगाराच्या गोडाऊनला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली आहे. धुराचे लोट बाहेर येत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी, संत तुकारामनगर अग्निशामक दलातील चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

15 scrap shops gutted in Chikhali, none injured

According to the information provided by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) fire brigade department, around 3.30 pm some welding work was going on when fire broke out at Gupta Wajan Kata godown shop. The flames spread rapidly in ...

‘बोचलं म्हणून’ सोशल मीडियावर व्हायरल झाली कविता

पिंपरी -  महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी येथील कार्यक्रमात एका तरुणाने शेतकऱ्याची व्यथा आणि देशातील राजकारणावर सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. या कवितेला खूप लाइक मिळत असून ती शेअरदेखील केली जात आहे.

पवना जलवाहिनीला विरोध कायम

पिंपरी -  ‘‘पवना धरणापासून निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या नियोजित जलवाहिनीला आमच्या संघटनेचा आणि मावळवासीयांचा ठाम विरोध आहे,’’ असे भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार यांनी गुरुवारी ‘सकाळ’ला सांगितले. नदीचा प्रवाह वाहता राहिल्यास जलप्रदूषण होणार नाही, तसेच शेतकऱ्यांनाही पुरेसे पाणी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

'संस्कार ग्रुप'च्या पदाधिकाऱ्यास पोलिस कोठडी

पिंपरी - करोडो रुपयांच्या ठेवी गुंतवणूकदारांना परत न दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता.21) ठोस कारवाई सुरू केली. संस्कार ग्रुप महिला बचत गटाच्या उपाध्यक्षा कमल ज्ञानेश्‍वर शेळके यांना दिघी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. 

पत्रकबाजीपेक्षा खुल्या चर्चेला या!

– खासदार बारणे यांचे जगतापांना आव्हान 
– “सोशल मीडिया’तून भंपकबाजी बंद करा
पिंपरी – पत्रकबाजी करुन शहरवासीयांची करमणूक करण्यापेक्षा शहर विकासात काय दिवे लावले? याचे उत्तर देण्यासाठी खुल्या व्यासपीठावर चर्चेला या… असे आव्हान खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना दिले आहे. “सोशल मीडिया’तून भंपकबाजीपेक्षा विकासकामांकडे लक्ष द्या…अन्यथा वाल्हेकरवाडीतील रिंग रोड बाधितांनी पिटाळून लावल्याच्या घटनांची पुनरावृत्ती शहरभर होईल…असा खोचक सल्लाही खासदार बारणे यांनी दिला आहे.