चौफेर न्यूज – यंदाचा श्रीमन श्रीमहासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. समाधी महोत्सवाचे हे 456वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन 27 नोव्हेंबर रोजी परमपूज्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8 ते 9 दरम्यान श्रीमोरया गोसावी चरित्रपठण सतीश कुलकर्णींद्वारे होणार आहे तर चरित्रपठणाचे संयोजक किशनराव पाटील आहेत.
No comments:
Post a Comment