Sunday, 26 November 2017

सुधारित विकास आराखड्यांसाठी तीन प्रस्ताव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मूळ हद्दीचा सुधारित विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यास दोन खासगी संस्था व बृन्हमुंबई महापालिकेने तयारी दर्शविली आहे. तसा प्रस्तावही बृन्हमुंबई महापालिका पाठवून प्रायोगिक तत्वावर शहराचा विकास आराखडा बनविण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. याबाबत नगरविकास विभागाकडून तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तीन संस्थांचे प्रस्ताव आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ठेवले आहे. याबाबत पालिका पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घेवून चर्चेअंती निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचनाकार प्रकाश ठाकूर यांनी दिली.

No comments:

Post a Comment